सहा एक महिन्यापूर्वीची गोष्ट आहे.
मी सकाळी साधारण १० वाजण्याच्या सुमारास दवाखान्यातून जवळच्याच बँकेत चाललो होतो. आमच्या इमारतीला लागून असलेल्या शेजारच्या इमारतीच्या भिंतीच्या लोखंडी जाळीच्या समोर एक गरिबांचे गोंडस मूल बसलं होतं. त्याच्या कडे पाहिलं तर ते मतिमंद( मंगोल) आहे हे जाणवलं. साधारण दोन वर्षाच्या आसपास वय असेल त्याचे. त्याच्याकडे पाहत असताना ते मूल उठलं आणि समोर चालायला लागलं तर त्याच्या कमरेला एक नायलॉनची दोरी बांधलेली होती. त्या दोरीमुळे त्या मुलाला ४ फुटाच्या पलीकडे कुठेही जात येत नव्हतं.
एखाद्या बकरीला बांधावं तसं बांधलेलं होतं. ते दृश्य बघवेना म्हणून मी मान वळवून घाईघाईने बँकेत गेलो. जाताना डोक्यात विचार हाच होता कि कोण याची आई आहे जी मुलाला असं जनावरासारखं बांधून गेली आहे. मूल मतिमंद आहे म्हणून असं बांधून जावं अशी निर्दय आई कोण असू शकेल.
बँकेतून परत येताना पाहिलं तर ते मूल तिथेच होतं. पण ते मूल परत उठून पुढे जाणार होतं तर दोरीमुळे जाऊ शकलं नाही. आणि त्याच्या पुढे दीड फूट खड्डा खणलेला होता. आणि तेथे रिलायन्सची पाटी लावलेली होती
दवाखान्याच्या समोरच्या रस्त्याच्या कडेला रिलायन्सच्या ऑप्टिकल फायबरची केबल टाकण्याचे काम चालू होते. त्यासाठी फूटभर खड्डा खणण्याचे काम चालू होते. त्यात काम करणारी मजूर बाई असावी जिने आपले मूल असे बांधून ठेवले होते.हा खड्डा लांबपर्यंत खणणे चालू होते.
साडेबारा वाजता दवाखान्याची वेळ संपली म्हणून घरी जाण्यासाठी मी परत बाहेर आलो तेंव्हा या खड्ड्याच्या पुढे ते मूल त्याची मोठी बहीण जी साधारण ४ वर्षाची होती हे आपल्या आईच्या बरोबर हसत खिदळत जेवण जेवत होते. पोळ्या होत्या, कसलातरी लाल भडक रस्सा होता आणि एक हिरवी भाजी होती.
मुलगी टिवल्या बावल्या करून मुलाला दाखवत होती. ते मूल छान हसत होतं आणि त्याच्याकडे आई कौतुकाने बघत त्याला आणि त्याच्या बहिणीला अन्नाचा घास भरवत होती.
थोड्या वेळापूर्वी किती निर्दय बाई म्हणून विचार करणारा मी, मला एकदम लखकन प्रकाश पडल्यासारखं जाणवलं. मुलगी शहाणी होती त्यामुळे ती आईच्या आसपास होती. खड्डा खणत खणत पुढे जाणाऱ्या आईला मूल खड्ड्यात पडेल किंवा चालत चालत रस्त्यावर येईल म्हणून अपघात होईल हि काळजी असल्यामुळे मुलाला तिने नाईलाजाने बांधून ठेवले होते. मी बाजूला पडलेल्या दोरीकडे पाहिले ती दोरी नायलॉनची होती पण तिच्या टोकाला मुलाच्या कमरेला बांधायचं वेटोळं मात्र मऊ साडीचं होतं ज्यामुळे मुलाच्या कमरेला काचू नये.
हातावर पोट आणि आभाळाचे छप्पर असलेल्या घरात राहणारी आई अजून काय करू शकेल?
आई गरीब असली किंवा मूल मतिमंद असलं तरी वात्सल्य हि निसर्गाची देणगी आहे. ती काही कमी होत नाही
वाचने
12393
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्रुदयस्पर्शी
+१
मन भरून आले
चला, चित्तमंथन तुम्ही
In reply to मन भरून आले by chittmanthan.OOO
+१
In reply to चला, चित्तमंथन तुम्ही by श्वेता२४
चांगला लेख.
+ १
हृदयस्पर्शी !
हृदयस्पर्शी !
बाप कुठे होता?
अत्यंत विचारप्रवण प्रतिसाद...
In reply to बाप कुठे होता? by एमी
आपण म्हणताय ते मान्य आहे कि
In reply to बाप कुठे होता? by एमी
अतिशय टचिंग अनुभव. मोजक्या
ह्रूदय हेलावून टाकणारं
अवघड आहे सगळं. आपली सुरक्षित
अशा चुका आपणही करत असतो..
बापरे
लहान मुलाला बांधून ठेवणे
लहान मुलाला बांधून ठेवणे
In reply to लहान मुलाला बांधून ठेवणे by मराठी कथालेखक
फार गैर वा टत नाहीय लहान
In reply to लहान मुलाला बांधून ठेवणे by सुबोध खरे
आई स्वयंपाक करत असेल तर जरा
आमच्या मुलीचा बेबी वोंकर होता
In reply to आई स्वयंपाक करत असेल तर जरा by कंजूस
हृदयस्पर्शी अनुभव
फार यातना देणारा प्रश्न
चार वर्ष झाली असतील आता,
सुन्दर लिहिले आहे.
त्या माउलीला भर रस्त्यावर लेकराला वाढवणे किती कठीण जात असेल
खरे आहे . +१००