Skip to main content

मुक्तक

कॉफी आणि बरच काहि .

लेखक लौंगी मिरची यांनी शनिवार, 02/02/2019 05:38 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळच्या थंडगार वार्यासोबत तुझा “दहा वाजता भेट “ मेसेज वाचुन नाजुकसं हसु आलं ( नेहेमीप्रमाणे) सवयीनेच , तेच ठिकाण वाट बघणं आलं . कपाळावर आठ्या पाडत विचाराधीन होणहि झालं .भेटतोय यासारखं सुख कोणतं ?बघितली थोडी वाट , तर कुठे बिघडलं डोळ्यासमोर राहिल थोडावेळ ,ओंजळीत असतिल क्षण अधिकार गाजवु थोडा , थोडा हट्ट पूरवुन घेऊ . त्याला नाहि आवडत माझं रुसणं.हसणं आवडतं.हसतानाच मला चोरुन पहाणंहि आवडतं . त्याच्यासाठी आज रेड कुर्ता घालु व्हाईट रंगाचा पायजमा न व्हाइटच स्कार्फ घेऊ . गाडीवरुन जाताना , थोडी बोलण्याची उजळनी करु. नेहेमीप्रमाणेच असेल सगळं .हो ! माहित आहे मला.. तरिहि . तरिहि सगळं नव्यानं अनुभवु .

वजनाचा काटा --भाग १०

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 30/01/2019 13:03 या दिवशी प्रकाशित केले.

वजनाचा काटा --भाग १०

झटपट चरबी कमी करण्याचे लोकप्रिय उपाय आता पर्यंतच्या एकंदर चर्चेवरून बऱ्याच जणांना एक गोष्ट लक्षात आलेली आहे कि वजन कमी करणे हि अतिशय सोपी गोष्ट आहे आणि बऱ्याच लोकांनी आपले वजन अनेक वेळेस कमी केलेले आहे. दुर्दैवाने ते काही महिन्यात परत येतेच यामुळे काटा हलेना काटा चालेना (अशी कुणाची तरी सुंदर कविता मिपावर प्रसिद्ध झाली होती) हि स्थिती येते. म्हणजेच एकंदर वजनाचा काटा-- ९ भाग होऊन आपण जेथे आहात तेथेच आहोत.

टोळीगीत इ.स. २०५०?

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 29/01/2019 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच्या पिढ्यांच्या अक्षम्य चुकांचे पातक अम्हाला रोज भोगायचे रोज बघायचे भेसूर रुपडे भकास पृथ्वीचे अभद्र कार्बनी पाऊल ठशांचे विटल्या फाटल्या ओझोन थराचे गटारगंगांचे विखारी धुराचे अवकाळी वृष्टीचे जखमी सृृृष्टीचे सिमेंटी जंगलांचे भेगाळ भूमीचे मरणपंथाच्या हरितवनांचे थांबा थांबा ऐका चीत्कार कुणाचे? पाण्याचा टँकर पळवून आणल्या मरणासन्नांच्या आमच्या टोळीचे!
काव्यरस

क्रश !

लेखक लौंगी मिरची यांनी शनिवार, 19/01/2019 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
“ बघ हं .. वाटतं तितकं सोप्पं नसतं सगळं , नाई ! आत्ता हो म्हणशिल पण नंतर मन खाइल तुझं तुलाच .“ ह्यावर दरवेळेला माझं “बघु तेव्हाचं तेव्हा “ एवढच उत्तर असायचं . भरकटत चाललेय हे जाणवत असतानाहि स्वताहाला वाहवुन जाउ देत होते मी . तो माझी वाट बघायचा एवढं एक कारण पूरेसं होतं माझ्या बेताल वागण्याला . त्याला कळायचं , माझं जरा जास्तच मागे लागणं वगैरे , मला काहि फरकच पडत नव्हता . जेव्हा , जसं जमेल तसं भेटायचो . व्यसनाधीन झाल्यासारखं . त्याच्यासोबत रहाणं , वेळ घालवणं , हिंडणं , फिरणं .

मी का तुला पाहतो रे?

लेखक चिनार यांनी गुरुवार, 10/01/2019 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तुत लिखाण झी मराठीवर रोज रात्री साडे आठ वाजता दाखवण्यात येणाऱ्या "तुला पाहते रे" ह्या मालिकेवर आधारित आहे. ही मालिका न बघणाऱ्यांना कदाचित लिखाणाचा संदर्भ लागणार नाही. ऐकलंत का ? ईशा निमकरच्या मावशीला हव्या असलेल्या एका विशिष्ट साडीसाठी विक्रांत सरंजामेंनी दोन मिनिटात आणि तेही एका फोनवर ती साडीची अख्खी कंपनी विकत घेतली... झालं काय की, ईशाच्या मावशीला एका साडीचा रंग, दुसऱ्या साडीचं डिझाईन, तिसऱ्या साडीचा पदर, चौथ्या साडीचा पोत आणि पाचव्या साडीचं ब्लाउज पीस आवडलं. आता तिला हे सगळं एकत्र करून एका साडीत हवं होतं.एवढी साधी सरळ मागणी हो तिची. तर तो मुजोर सेल्समन चक्क नाही म्हणाला तिला.

घोटाळा

लेखक चिनार यांनी शनिवार, 05/01/2019 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
मी आणि माझ्या पत्नीने काहीतरी मोठा घोटाळा केला आहे असा आरोप करण्यात आला. आरोप करणाऱ्याने आम्हाला फेस टू फेस येण्याचे चॅलेंज दिले. आमच्यात झालेला संवाद खालीलप्रमाणे.. प्रश्न १. तुमचे आडनाव जोशी का आहे? माझे उत्तर : कारण माझ्या वडिलांचे आडनाव जोशी आहे. तो: माझा प्रश्न नीट ऐका. तुमचे आडनाव जोशी का आहे? उत्तर: कारण माझ्या वडिलांचे आडनाव जोशी आहे. आणि मी त्यांच्यापोटी जन्म घेतला. तो : "तुम्ही प्रश्नाचे उत्तर देत नाही आहात. काहीतरी लपवण्याचा डाव दिसतोय. मी असा सोडणार नाही तुम्हाला." "बरं" आता तो माझ्या पत्नीकडे वळला. प्रश्न: साल २०१३ चे कागदपत्रं माझ्या हातात आहेत.

जनुक जिन्याची सर्पिल वळणे

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 03/01/2019 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
जनुक जिन्याची सर्पिल वळणे अणुगर्भातिल अदम्य लवथव सूक्ष्माच्या प्रत्येक विभ्रमीे कल्पिताहुनी अद्भुत वास्तव अथांगासही क्षुद्र ठरविते असीम व्याप्ती विश्वाची प्रकाशवर्षे मोजुनी थकती स्थलकालाच्या थिट्या मिती शून्यस्पर्शी अन् अपार- व्यापक ताणे-बाणे गहनाचे तरल तलम सूक्ष्माचे तंतू विणती वस्त्र विराटाचे
काव्यरस

मुंबईचे धडे - ३

लेखक मालविका यांनी गुरुवार, 03/01/2019 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
मी ठाण्याला राहत होते. माझी आत्या पार्ल्याला राहायची. तिच्याकडे तिची जाऊ दीर एकत्र राहायचे.त्यामुळे आत्याची दोन शिवाय जावेची दोन अशी ४ साधारण माझ्याच वयाची मुलं तिच्याकडे होती. त्यात माझा कोकणातला चुलत भाऊ नोकरीसाठी तिच्याकडे येऊन राहिलेला. त्यामुळे तिकडे मजा यायची. वेळ मजेत जायचा. म्ह्णून मला तिकडे राहायला जायला खूप आवडायचं. पण लोकलने फक्त विद्याविहारला जायची सवय होती. दुसरीकडे कधी गेले नव्हते. अशीच एकदा शनिवार रविवार क्लासला सुट्टी मिळाली म्हणून आत्याकडे जायची जाम इच्छा झाली. पण जाणार कसं? आत्याला फोन केला कि यायचंय पण कशी येऊ? तिने सोप्पा उपाय सांगितला.

आरंभशूर

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 02/01/2019 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
``तूच ठरवतेस, आज व्यायाम सुरू करायचा. आज डायरी लिहायला सुरुवात करायची, आजपासून कामात जास्त लक्ष द्यायचं, टाइमपास करायचा नाही, सोशल मीडिया कमी वापरायचं, व्हर्च्युअल जगात जास्त वावरायचं नाही, सकाळी लवकर उठायचं, माती नि मसणं करायचं!`` ``मग?`` ``मग` काय `मग`? तू मागचापुढचा विचार न करता संकल्पांना होकार देऊन टाकतेस आणि आम्हाला ते पाळत बसावे लागतात ना!``

Catharsis - 1 घालमेल

लेखक अमलताश_ यांनी मंगळवार, 01/01/2019 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
तर आडवी आली ती जात. म्हणजे कसं, तो एक राजा नाही का जो जन्माला यावा पण शेजाऱ्याच्या घरी असं सगळ्यांना वाटत असतं? तस्साच attitude . पण इथे झाला घात. सोयी-सुविधांनी सज्ज असं समुद्रा - काठचं राज्य. त्यात गाई गुरं , कुत्रे मांजरं , असलेलं , हसतं खेळतं घर. अश्या घरावर स्वारी केली आंतरजातीय विवाहाने. मग राजे लढले. लढाईच्या गोष्टी तेवढ्याच मधुर असतात हं , बाकी सगळं कडू. म्हणजे कल्पना करा , तुम्ही ज्या मुलांना कष्टाने वाढवलं , आपल्या पायावर उभं राहायला शिकवलं , ती मुलं चक्क त्या ज्ञानाचा वापर करू लागली ? काय ते संकट. निर्णय काय घेतात, तार्किक उत्तरं काय देतात ....