Skip to main content

मुक्तक

(दाराआडचा यजमान)

लेखक नाखु यांनी शुक्रवार, 26/04/2019 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
एक यजमान दाराआडून (नेत्रछिद्रातून)बाहेर बघतो किती बाहेर? दाराच्या बाहेर, जिन्याच्या पार जिथे एक अनाहुत आला असेल बहुदा .... असेल का तो अनोळखी, का बघून ओळख न दाखवणारा ? येत असेल का तो ही आप्तांच्या घरी , बिनकामाचा कुणाकडे? यजमान दाराआडून बाहेर येऊ शकत नाही... (पेपरातील बातम्या आणि माणसूकीची फसवणूक मानेवर जख्ख बसलेली असते) मग तो कल्पनेचे पंख पसरतो, त्या पंखावरुन अलगद फिरुन लेकरांना, मित्रांना भेटून येतो डोळे मिटून घेऊन यजमान शांतपणे खुष राहतो.... दूरदेशी लेकरे आपल्याच जगात पाक्षिक आठवणीत ठेवून जमेल तसं (तर) चिमुकल्यांच्या हट्टाने दृकश्राव्य माध्यमातून (च) भेटत राहतात...

माणसे कविता होऊन येतात.....

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 26/04/2019 03:22 या दिवशी प्रकाशित केले.
माणसे कविता होऊन येतात एकएक हट्टी कडवे लाडाकोडाने घालून ठेवतात, दोन कडव्यांमध्ये एक जीवघेणी कळ विसावा म्हणून ठेवून जातात... माणसे कविता होऊन येतात अलंकार भिरकावून केवळ अर्थ होऊन रात्रभर उशाशी बसतात उजाडताना परत पुस्तकाच्या अंधारात गुडूप होतात...... माणसे कविता होऊन येतात.... -शिवकन्या

ऍव्हेंजर आणि मी..

लेखक चिनार यांनी सोमवार, 22/04/2019 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
ऍव्हेंजर फॅन कोणी आहे का ? एक प्रश्न आहे गरिबाला... तो ऍव्हेंजर्स एन्ड गेम सिनेमा आलाय तो एकदम फायनल म्हणायचा का? म्हणजे विषय संपला का एकदाचा? पुढचं लिहीण्याआधीच सांगतो, वर्षभराने 'ऍव्हेंजर्स उरलंसुरलं' नावाने सिनेमा येणार असल्यास माझी काहीही हरकत नाही. मी ऍव्हेंजर्स विरोधी नाही. आणि मार्व्हल व्हर्सेस डीसी वगैरे फंदात तर मला मुळीच पडायचं नाही. आमच्यालेखी मार्व्हेल, डीसी म्हणजे शिवसेना-मनसे आहेत. म्हणजे एकाला झाका दुसऱ्याला काढा फरक नाही.

(तू मतदार माझा)

लेखक नाखु यांनी रविवार, 21/04/2019 07:29 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेर्ना - विळखा पाहू तू मतदार माझा भोट, भोंगळ अजीजी तुझे मत मागण्या तुलाच नादी लावणारा मस्तवाल नेता मी .... घेऊन जमेस तुला निव्वळ उगी तुंबडी भरावी बोभाटा करावा मी एव्हढा की लाभावी मज(समोरची) वाटणी सर्व अडेल,पडेल,चढेल, संधिसाधू,भूछत्री उमेदवारांना समर्पित. वाचकांचीच पत्रेवाला नाखु बिनसुपारीवाला

किरमीजी शिडे

लेखक अभ्या.. यांनी गुरुवार, 18/04/2019 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
उपकार त्या युट्युबाचे. काय नाही दिले त्याने? जगाच्या कोपर्‍यात कुणा हौशाकडे असलेल्या क्लिपा, व्हिडिओ अपलोड केल्या जातात, दुसर्‍या कोपर्‍यात कुणाच्या तरी आठवणीत त्या पुसट झालेल्या पुन्हा ताज्या होतात. काय, कुठे, कसे मिळून जाईल सांगणे मुश्कील. कलर कोड चेक करताना अचानक एका रंगाचे नाव दिसले क्रिम्सन. कोण जाणे पण क्रिम्सन नावाची आठवण ताजी झाली. नुसत्या क्रिम्सन शब्दाने किती मोठी सफर घडवली. क्रिम्सन सेल्स. शाळेतला मी उन्हाळ्याच्या सुट्टीत हमखास मोठ्या आत्याकडे राहायचे वेध लागलेले. मोठ्या आत्याचे यजमान एअरफोर्स रिटायर्ड. कुटुंबाचा बराचसा काल पठाणकोट, अंबाला अशा ठिकाणी गेलेला.

पण तू येणार नाहीस..

लेखक सिक्रेटसुपरस्टार यांनी सोमवार, 15/04/2019 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
मला तुझी आठवण यायला कारण लागत नाही, झोप लागावी म्हणून दिवसभर केलेल्या दगदगीचा शीण, पाठ अंथरुणाला टेकताच वैरी होतो, मी त्याला धरून ठेवायचं म्हटलं तरी निसटून जातो, डोळ्यांच्या कडा ओल्या होणं, मग जरा कमी कमी आवाजातले हुंदके, मग उशीत डोकं खुपसून हमसाहमशी रडणं, असे सगळे सोपस्कार पार पडल्यावर गोठलेली बोटं लिहू लागतात..

(जळवे)

लेखक नाखु यांनी रविवार, 14/04/2019 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
तमाम मिपाकरांच्या (माझ्या सहित) ,भोचक व वरकरणी मदतीआड त्रस्त पिडणार्या नातेवाईकांना समर्पित ********** हेच ते पिडणारे पळवे जळवे ज्यां(च्या)मुळे तुझे जगणं काळजीने पोखरून ठेवलेस!! पाठिंबा वा संमती असती तर हे जळवे शक्तिने तांडून लगेच दृष्टी आड घालून विस्मृतीत टाकले असते... ना ही कुतरओढ कसोटी भाळी असती... ना भोचक डोळे खुपसून (देत) न संपणार्या टिकेलासुद्धा सोसत राहिले असते.... ना टोमण्यातून तुझ्या भळजखमा टोकरत राहिले असते.... नाहीतर, माझ्या प्रिया, सगळ्यांना आप्त ( नातलग) निवडायची संधी पसाभर देता, तर विधात्याचे काय जाते?

तळवे

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 13/04/2019 23:56 या दिवशी प्रकाशित केले.
हेच ते जीवघेणे हळवे तळवे ज्यावर तू तुझे काळीज काढून ठेवलेस!! शक्य वा हिंमत असती तर हे तळवे बाजूला काढून फोटोत घडी घालून पुरून टाकले असते... ना ही असोशी असली असती... ना अंधारात डोळे खुपसून न उजळणार्या पूर्वेकडे पहात राहिले असते.... ना रक्तातून तुझे भिरभिरणे ऐकत राहिले असते.... नाहीतर, माझ्या दोन्ही तळव्यांना पंख व्हायची शक्ती घटकाभर देता, तर विधात्याचे काय जाते? -शिवकन्या

विराट, आयपीएल आणि वर्ल्डकप

लेखक चिनार यांनी मंगळवार, 09/04/2019 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिकेट वर्ल्डकप तोंडावर आले असताना आयपीएलला प्राधान्य देऊन ती स्पर्धा आयोजित केल्याबद्दल बीसीसीआयचे हार्दिक अभिनंदन ! अर्थात कितीतरी धनाढ्यांचे हितसंबंध आयपीएलमध्ये गुंतले असताना वर्ल्डकपसारख्या टुकार स्पर्धेचे शुल्लक कारण देता येत नसते ह्याची मला कल्पना आहे. तर आयपीएल आता रंगात आलेली आहे. आता आमच्यासारखे पूर्वग्रहदूषित आणि प्रतिगामी लोकं आयपीएल बघत नाहीत त्याचा आयपीएलच्या लोकप्रियतेवर घंटा फरक पडत नाही.

(बंद कळफलकामागचा वाचक)

लेखक नाखु यांनी रविवार, 07/04/2019 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
एक वाचक कळफलकाबरोबर बघतो आहे मिपा कसले मिपा ? स्वत:च्या कक्षेत, जालजंजाळाच्या पार जिथे हर एक लेखकू बसला आहे क्षुब्ध.... करत असेल का तो ही (कधीकधी)वाचकाचा विचार? वाचत असेल का तो ही इतरांचेही आहेर, विरोधाच्या (चष्म्या) पलीकडे? वाचक त्याच्या वाचनदुनियेतून बाहेर येऊ शकत नाही... मग तो त्याचे मूक प्रतिसाद पाठवतो, ते प्रतिसाद डोक्यात (न)घेऊन लेखक निवांतपणे मख्ख राहतो.... मिपा हरवलेला वाचक जुन्या उस(व)लेल्या धाग्यातून मिपा चाचपडत राहतो, पुन्हा पुन्हा चाचपडत राहतो... वाचकांचीच पत्रेवाला नाखु