Skip to main content

मुक्तक

दुपार

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 21/10/2022 08:13 या दिवशी प्रकाशित केले.
झोपली होती दुपार घेऊन कोवळ्या उन्हाला आवाज शांत स्पंदनांचा ऐकू येई मनाला तिरीप कोवळ्या उन्हाची जणू दुपारची एकदाणी झोपण्या आधी दुपारं गात होती बडबड गाणी पहुडली सुखाने अलवार पांघरून पदर थंडगार विसरून मध्यान्हीचा ताप निष्पाप सवे जीवाच्या झोपली दुपार....

वाचु आनंदेे!

लेखक Bhakti यांनी बुधवार, 19/10/2022 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
आज(१५ आक्टोबर) वाचन प्रेरणा दिन!

भाव तिथे देव

लेखक मालविका यांनी मंगळवार, 18/10/2022 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
सायकलिंगला बाहेर पडते तेव्हा रस्त्यावर रोज नवीन गमती जमती दिसतात. आपल्याकडे एकूणच देवदेवतांचं आणि देवळांचं प्रमाण खूप आहे. इथेही तेच आहे. जागोजागी छोटी मोठी देवळं आहेत. नवीन नवीन बांधली जात आहेत. जात येता ट्रक दिसतात त्यांच्यावरची नावं वाचून तर ज्ञानात भरच पडते. खरंच अशा नावाचा देव आहे ? असा प्रश्न मनात येतो. रस्त्याच्या कडेची छोटी छोटी देवळं असतात ना त्यात लोकांची मजेशीर गोष्ट अनुभवयाला मिळते. बरेचदा हि हद्दीवरची किंवा वेशीवरची देवळं असतात. फार मोठी नसतात. अगदी छोटंसं देऊळ असत. पण एका गावाची हद्द संपून दुसर्या गावाची हद्द सुरु होते तिथे हि देवळं असल्याने याना महत्व असत.

Sports Diplomacy means क्रीडा राजनय

लेखक पराग१२२६३ यांनी मंगळवार, 18/10/2022 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
यंदाच्या क्रीडा हंगामाचा शेवट नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कतारमध्ये होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनं होणार आहे. कतारमध्ये होणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या माध्यमातून तो देश आपली प्रतिमा उंचावण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे. या वर्षी ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा, बीजिंग हिवाळी ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक, बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, महिला क्रिकेट विश्वचषक यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या. मात्र चीनमध्ये अजूनही COVID-19 ची स्थिती गंभीर असल्यामुळं सप्टेंबर 2022 मध्ये होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा एक वर्ष पुढं ढकलण्यात आली आहे.

Sports Diplomacy means क्रीडा राजनय

लेखक पराग१२२६३ यांनी मंगळवार, 18/10/2022 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
यंदाच्या क्रीडा हंगामाचा शेवट नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कतारमध्ये होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनं होणार आहे. कतारमध्ये होणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या माध्यमातून तो देश आपली प्रतिमा उंचावण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे. या वर्षी ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा, बीजिंग हिवाळी ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक, बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, महिला क्रिकेट विश्वचषक यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या. मात्र चीनमध्ये अजूनही COVID-19 ची स्थिती गंभीर असल्यामुळं सप्टेंबर 2022 मध्ये होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा एक वर्ष पुढं ढकलण्यात आली आहे.

मेषपात्र

लेखक मालविका यांनी बुधवार, 28/09/2022 08:52 या दिवशी प्रकाशित केले.
Being मेष मी आणि श्रीनिवास योगायोगाने मेष रासवाले. त्यामुळे अनेकदा दोघांचं अनेक बाबतीत एकमत होत. मेष असण्याचे फायदे तोटे दोघानाही भोगावे लागतात. कुठल्याही गोष्टीवर भावनिक रित्या व्यक्त होण्यापेक्षा प्रॅक्टिकली विचार करतो. त्यामुळे कधीतरी आम्ही फारच कोरडे आहोत का असा विचार येतो. फेसबुक वरचे reels बघताना किंवा अगदी एखादा शो म्हणा, पिक्चर म्हणा, आम्ही असं डोकं बाजूला ठेवून बघूच शकत नाही. हे अस कुठे असतं का? अस वाटत राहतं.

खरचं गरज आहे का?

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 26/09/2022 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा कोण शिकवते कळ्यांना कसे, केव्हां उमलायचे कोण शिकवते पानांना केव्हां कसे गळायचे ऋतुराज वसंत येता झाडे बहरून येती निसर्ग चक्र फिरता होती फुले कळ्यांची श्वानास कसे कळते मास भादव्याचा आला खरचं गरज आहे का? हे सर्व शिकवावयाची बुद्धिमान मानवाला!!! जानुके आपुली आदम आणी ह्व्वाची स्वर्गातूनच शिकून आली कला फळे चाखायची धन्वंतरी कशाला हे सर्व शिकवण्यास मग मित्र मैत्रिणीं कशाला? फक्त पार्टी झोडण्यास!!!!!

वेडा वेडा पाऊस..

लेखक प्राची अश्विनी यांनी शनिवार, 24/09/2022 08:07 या दिवशी प्रकाशित केले.
वेडा वेडा पाऊस.. वेडा म्हणजे वेडा म्हणजे किती वेडा पाऊस? काळ वेळ नाही, नुसती पडायची हौस.. छत्री विसरून निघाले तुझ्याकडे यायला, होतं असं चुकून, कळावं ना पावसाला? वेडाच तो, आला धावत, धो धो बरसला. म्हणून भिजले, नको ना रे भलता अर्थ लावूस! भिजून बिजून आलं असं तर चहा कुणी करतोच ना? बिनसाखर असला तरी गोड आपण म्हणतोच ना? घोट घोट पिता पिता गप्पा छाटत बसतोच ना? म्हणून थांबले, नको की रे भलता अर्थ लावूस! बरं, पडायचं तर गुपचूप पडावं नं पावसानं? कशाला त्या विजा बिजा आणि वर गडगडणं? घाबरेल कुणीही, असलं वेडं याचं वागणं! म्हणून बिलगले, नको हो भलता अर्थ लावूस! तूही वेडा, मला म्हणतोस, नको आता जाऊस.. वेडा
काव्यरस

लद्दाख

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 22/09/2022 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
भूशास्त्राच्या अंकलिपीची पाने इथली उलटी रंगभारले पहाड, अवघड रस्त्याची वेलांटी रण वाळूचे पायतळी अन् हिमकण माथ्यावरती किती विरोधाभास पचवुनी फुलते इथली सृष्टी रंग नभाचे प्राशुनी वाहे निवळशंख हे पाणी रौद्र नि प्रशांत उभय रसांचे मिश्रण केले कोणी (नुकत्याच केलेल्या लद्दाख वारीदरम्यान रेखाटलेले शब्दचित्र)

कण अमृताचे......

लेखक कर्नलतपस्वी यांनी बुधवार, 21/09/2022 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याच्या सहाणेवर चंदन उगाळत नाही भूतकाळा वरती, दोष मी उगाच मढत नाही पांघरून भुतांच्या झुली ,वर्तमानात जगत नाही उघडून चिंध्याचे गाठोडे, मी उगाच चिवडत नाही करूनी पाटी कोरी, जुने हिशोब मांडत नाही कर्जमुक्त मी आता, कुठलेही व्याज भरत नाही झाली दृष्टीपटले साफ,लक्ष धुसर दिसत नाही अमृत कणांचे आता, विष मी बनवत नाही