मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

साद

अनन्त्_यात्री · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
कुठून येते हे धुके अन् वेढते भवताल सारे फिकटल्या चंद्रासवे मग हरवती अवघेच तारे कोन ढळती दशदिशांचे वाट बिनचुक सांगणारे अन् तमाच्या खोल डोही वितळती दिग्बंध सारे गडद ह्या छायेतळी जरी उमगती गूढार्थ न्यारे मर्म कोड्यांचे कळे परी प्रश्न उरती टोचणारे या धुक्याच्या पार वाहे कोणती सरिता बरे? त्या प्रवाही वाहताना साद घाली कोण रे?

वाचने 1693 वाचनखूण प्रतिक्रिया 5

कर्नलतपस्वी Tue, 02/14/2023 - 06:55
लईच डेंजर प्रतिसाद &#129315 बहरहाल कविता आवडली. सळसळते पिंपळ-पान, वाऱ्यात भुताची गाणी । भिंतीवर नक्षत्रांचे, आभाळ खचवीले कोणी ॥

चित्रगुप्त Wed, 02/15/2023 - 20:08
कवितेतले एकंदरीत गूढ भयकारी वातावरण बघता एकादी हडळ, जाखीण, चुडैल वगैरे पिशाच्च योनीतील कुणीतरी साद घालत असावे. किमान ती मेणबत्ती घेऊन फिरणारी बाईतरी असावी, असे 'ह्यांचे' मत. -- अक्कासाहेब पिशाच्चपुरीकर.