Skip to main content

मुक्तक

लिही रे कधीतरी...

लेखक प्राची अश्विनी यांनी मंगळवार, 24/01/2023 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
लिही रे कधीतरी. काहीही, अगदी काहीssही चालेल. पत्र, कविता, दोनोळीची चिठ्ठी पण पळेल. पण कागदावरच्या शाईला हुंगता आलं पाहिजे. शब्दांवर बोट अस्संss फिरवता आलं पाहिजे. मग कान्याच्या मागे खांब खांब खेळेन, वेलांटीच्या तळ्यात डुबकी मारेन. अनुस्वाराच्या डोक्यावर हलकी थाप.. मात्रेवर चढताना लागेल धाप.. खोडलेलं अक्षर पाहून विचारात पडेन, काय बरं लिहाताना अडखळलं पेन? पण "माझ्यासाठी" लिहिलंस! हे खासंखास जणू प्रत्यक्ष भेटीचाच होईल भास. ....म्हणूनच म्हटलं, लिही की रे कधीतरी....

अशीच एक धुंद, गुलाबी सकाळ

लेखक चित्रगुप्त यांनी गुरुवार, 19/01/2023 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
"ए, परीक्षेनंतर आपण लग्न करूयात ? " "काय म्हणतेस सुले ?" "होय रे माझ्या राजा " -- असं म्हणत ती आवेगाने धावत येऊन त्याला बिलगते. -- मंचावरचे लाईट फेड होऊन पडदा पडतो. टाळ्यांचा कडकडाट विरतो न विरतो तेवढ्यात - 'आटो-प्ले' मोडमुळे पुढला व्हिडियो सुरु होतो.... कुठलेतरी कविराज कवत असतात -- "अशाच एका धुंद सकाळी - मनात माझ्या स्फुरती ओळी - जरतारी तो शालू आणिक - धुंद मखमली नाजुक चोळी " -- तिच्यामारी हे कवी पण फालतूमधे तंग करत असतात ... 'तंग' वरून मला आठवतं, "तंग आ चुके हे कश्म-कशे जिंदगी से हम" हे गाणं - आपण बरेच दिवसात बघितलेलं नाही.

विसरून जाऊ सारे.....

लेखक कर्नलतपस्वी यांनी रविवार, 15/01/2023 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
गुलाबी थंडी हवेत गारवा अंगावर रग शेकोटीची धग संक्रातीचा सण सुगडाचं वाण सवाष्णी सोळा काळी चंद्रकळा तीळाचा हलवा हलव्याचे दागिने तीळाचं दान बाळाचं बोरन्हाण बाजरीची भाकरी तीळाची पेरणी लोण्याचा गोळा खिचडीचा मान गुळाची पोळी तीळाची वडी हलव्याचा काटा वाढवतो गोडी तीळगुळ घ्या गोड बोला
काव्यरस

पूर्वसंचित

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 12/01/2023 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
होत खळाळता प्रवाह नदीच्या अंगा खांद्यावर इवलेसे मुलं होऊन खेळावं होत चमचमता प्रकाश रात्रीच्या नभ अंगणात शुभ्र टिपूर चांदणं व्हावं घेत मखमल अंगावर घुटमळत मनाच्या पायरी लाडकी मांजर व्हावं मांडावं, पुसावे कागदावर पुढच्या वळण वाटेचे जुळवत हिशोब राहावं पूर्वसंचित फुलपाखरे बसता कमल मनी गहिवर ऊतू जावा... -भक्ती १२/०१/२०२३

खजिना

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 07/01/2023 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
होतात निरुत्तर प्रश्न त्या तिथे अचानक जावे शब्दांचा मांडुनी खेळ तर्कास जरा डिवचावे तर्काचे पडतील मोडून मग सुघड, नेटके इमले पडझडीत येईल हाती शब्दांच्याही पलिकडले तो अनवट खजिना येता हातात क्षणार्धापुरता मागणे अधिक ना उरते चांदण्यात सचैल भिजता

परदेशस्थ भारतीय

लेखक पराग१२२६३ यांनी शुक्रवार, 06/01/2023 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
लोगो इंदोरमध्ये 8 ते 10 जानेवारी 2023 दरम्यान पार पडत असलेल्या 17व्या प्रवासी भारतीय दिवसाच्या #pravasibharatiyadivas संमेलनात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

व्यसन

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 21/12/2022 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
व्यसन माझ्याकडे एक ४८ वर्षाच्या बाई आल्या होत्या. त्यांचा डावा हात दुखत होता. त्यासाठी त्यांच्या डॉक्टरांनी त्यांच्या डाव्या खांद्याची सोनोग्राफी करायला सांगितली होती. सोनोग्राफी करण्याच्या अगोदर त्यांच्या आजाराची माहिती असावी म्हणून आणि मध्यम वयीन, डावा हात दुखतो आहे म्हणून मी त्यांना विचारले कि त्यांच्या हृदयाची तपासणी झाली आहे का? त्यावर त्यांनी आपली फाईल दाखवली.

व्यासपर्व (ऐसी अक्षरे मेळवीन-७)

लेखक Bhakti यांनी सोमवार, 19/12/2022 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
व्यासपर्व –लेखिका दुर्गा भागवत A काही पुस्तकं मनमुराद अनुभवण्यासाठी मनाचं क्षितीज विस्तारलेलं पाहिजे. व्यासपर्व मनाचं कवाड विस्तारल्यावर हातात पडलं. धर्मग्रंथाला कलाकृती म्हणून अनुभवताना वीण घट्ट झालीये. मराठी साहित्यातील व्रतस्थ दुर्गा भागवत यांनी केवळ ११० पानांमध्ये महाभारताचे व्यासांच्या मांडणीनुसार केलेले विश्लेषण शब्द सौंदर्याने सुशोभित आहे. महाभारत-गीता ही ज्ञान, कर्म, भक्ती यांची वात तेजोमय करतात. तेही जगासाठी, केवळ भारतापुरते नाही.

पुन्हा

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 17/12/2022 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
कालचक्र उलटे फिरले अन् पुन्हा जन्मलो जुन्या चुका विसरून नव्याने करून बसलो काचपात्र भंगले तरीही जोडत बसलो मुखवट्यांस समजलो चेहरे तिथेच फसलो अढळपदी उल्का बघताना जरी कोसळलो डोळे कितिदा आले भरूनी तरीही हसलो बेचिराख होता होता मग पुनश्च रुजलो

खंडाळ्याच्या घाटासाठी...

लेखक पराग१२२६३ यांनी सोमवार, 28/11/2022 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
Rajmachi point यावेळी प्रत्यक्ष खंडाळ्याच्या घाटामध्ये वेळ काढायचा असं ठरवलं होतं. अचानक निघालो आणि पटकन शिवाजीनगर गाठलं. खंडाळ्यापर्यंत जायचं असल्यामुळं सकाळच्या शेवटच्या लोकलशिवाय पर्याय नव्हता. सध्या लवकर अंधार होत असल्यामुळं दुपारची लोकल पकडून खंडाळ्याला पोहोचणं सोयीचं वाटत नव्हतं.