आणि बाकी शून्य...
लेखनविषय:
तुझा फोन आला ना की,
चेह-यावर molar to molar हसू उमटतं..
हातातलं काम तिथंच थांबवत मी तव्याखालचा विस्तव विझवते.
केसांची बट मागे सारत स्वतःला उगा आरशात निरखते.
मग फोन घेऊन मी कोलाहलापासून दूर बाल्कनीच्या कोप-यात जाते.
आणि रिंग थांबायच्या जssस्ट आधी हॅलो म्हणते.
सुरवातीची औपचारिक चौकशी आटपून तू पटकन कामाकडे वळतोस.
माझं हसू तीन चतुर्थांश होतं..
ते बोलणं पण म्हणता म्हणता संपून जातं.
आता हसू बरोब्बर निम्मं...
मग तू म्हणतोस, "बाकी काय म्हणतेस?"
आवडलेली कविता, नावडलेलं गाणं..
पाहिलेली वाट, तुझं न येणं..
दाटलेला हुंदका, तुला न कळणं...
माझे वेडे हट्ट, तुझं शहाणं वागणं...
बाकी किती नी काय काय असतं.
पण फोनमधून ऐकू येतो reverse horn चा, गाडी पार्क केल्याचा वगैरे आवाज.
तुझ्या आवाजातली आवराआवर पण ओळखू येतेच की मला.
"बाकी काही नाही, ठीक." म्हणून मी गुपचूप फोन ठेवते.
हसू आता डायरेक्ट मायनस मध्ये पोचलेलं असतं.
..
आणि इथं बाकी असतो पोळपाटावर अर्धवट लाटलेला शून्य ....
वाचने
2855
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
भारी!
मस्त.
कविता अनेकदा वाचली. बाकी
In reply to कविता अनेकदा वाचली. बाकी by विवेकपटाईत
:-)
In reply to :-) by राघव
:)
भलतीच त्रासदायक कविता आहे!!
एक गीत, सौ अफसाने.
In reply to एक गीत, सौ अफसाने. by चित्रगुप्त
चित्रगुप्तजी _/\_
In reply to एक गीत, सौ अफसाने. by चित्रगुप्त
लई डेंजर...
अरारारा . कवितेचा बाजार उठवला
वाह :)