मुक्तक
मुक्त मी!
"जग म्हणजे तुमचा शिंपला आहे! प्रयत्न कराल तर तुम्हाला हवे तसे मोती तुम्ही त्यातून काढू शकाल."
शाळेच्या दीक्षान्त समारंभाच्या वेळी आमच्या मुख्याध्यापिका हे वाक्य म्हणाल्या, असं की जणू काही हे शेक्सपियरचं नव्हे, त्यांचं स्वत:चं वाक्य होतं. तिथे बसून ते ऐकतांना मला त्यांची कीव वाटली.
पण आजकाल मला त्यांची कीव नाही येत, माझी स्वत:ची येते, माझं जग माझा शिंपला नाही झालं. आयुष्य खेकड्यासारखं झालंय, थोडं चुकीच्या दिशेने पकडलं की चावतंय, आणि मग खूप ठणकून दुखतं.
ते दीक्षान्त समारंभाचं भाषण वर्षापूर्वी झालं.
गीत -संगीत- पाऊस पाऊस
उन्हाच्या झळा धरतीला, आसमंताला अन आपल्याला सर्वाना नकोनकोसे करून सोडतात. " ओहोट कधी घेईल हा तीव्र उन्हाळा देईल कधी पाणकळा सुख जिवाला " अशी तगमग मग लागून रहाते. देवाजीने करुणा केली अशी आकाशातील बापाची मग कृपा होते व मग नभ मेघानी आक्रमिले तारांगण सर्वही व्यापुनी आले असा साक्षात्कार अस्मानातून चहूबाजूनी होउ लागतो. मग कवि लिहून जातात " भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे दावीत सतत रूप आगळे...
नैतिकता
नैतिकता.
स्वतःच्या वागण्यावर स्वतःच घालुन घेतलेले किंवा अमुक गोष्ट अशीच केली पाहीजे अशा अर्थाचा समाजाचा आग्रह.
सध्या आपण समाजाच्या आग्रहाचा विचार न करता फक्त स्वतःच स्वतःवर घालुन घेतलेल्या बंधनाबद्द्ल बोलु.
अमुक एक गोष्ट करणे अथवा न करणे माझ्या तत्वात बसते असे आपण सांगतो. हे नक्की काय असते? तर आपण आपल्या बुद्धीनुसार अमुक एक पद्धतीने वागण्याचे ठरवतो. तसे वागणे हे आपल्या दृष्टीने नैतिकतेने वागणे असते. त्या तत्वाविरुद्ध आचरण करण्याची कल्पना आपल्याला सहन होत नाही. तसे वागणे हे आपल्याला अनेकदा अनैतिक वाटते.
आमचा दुष्काळ
आताशा साला पाऊस बरोबर सुरू होतो
उगाचच आपला टँकरचा हप्ता चुकतो.
या वर्षीदेखील पाऊस वेळेवर सुरू होईल.
चार्यासाठी अनुदान, दुष्काळी मदत,
दुष्काळग्रस्त भागाला भेटीची बिले
हे सारे बंद होईल;
अन वरकमाईदेखील चुकेल
इतरांचा पाण्याचा दुष्काळ संपेल
पण आमचा पैशांचा दुष्काळ आता सुरू होईल.
पावसा, का रे बाबा तू वेळेवर येतोस
अन आम्हाला दुष्काळात लोटतोस?
नियती ? नाय नाय टेंपोवरती!
प्रेरणा : नियती ( http://www.misalpav.com/node/21857)
रक्ताळलेल्या प्रार्थना या अत्यंत प्रभावी कवितेतून इथे पदार्पण करणार्या हजाक या कविश्रेष्ठांची ही दुसरी कविता
नक्की कोणत्या त्रासामुळे अशी निर्मिती होते?
मृत्यु
मृत्यु.
जीवनातील एक सत्य.
कधी हलक्या पावलांनी दबकत दबकत येत हलकेच झडप घालणार तर सुसाट वेगाने येऊन पाचोळ्यासारखा उडवुन लावणार. कधी तो यावासा वाटते तर कधी त्याने येऊ नये असे वाटते. पण तो येणार नक्की येणार हे प्रत्येकाला ठाऊक असते. प्रश्न असतो तो फक्त कधी येणार आणि कसा येणार? मृत्यु म्हटले की अनेक कल्पना मनात दाटुन येतात. जीवनाचा शेवट. जगाचा अंत. पण नक्की तो असत्तो का? आपण मेल्यावर जग चालूच रहाणार असते. अगदी मानव वंश निर्वंश होऊन गेला, मानव प्राण्याचा अंत झाला तरी जीवन चालूच राहील. कदाचित रुप बदलेल. पण आपल्या दृष्टीने जीवन संपले असेल. आपल्याला जाणीव सुद्धा होणार नाही.
...... तेथे तुझी मी वाट पहातो!
आज खूप दिवसांनंतर जाणं झालं. तिथेच जिथे दोन दादरांची भेट होते. तिथे पोहोचल्यावर मनात लगेच तुझं गुणगुणणं गुंजन घालू लागलं. तू म्हणायचीस, "जिथे दादरा दादर मिळते, तेथे तुझी मी वाट पहाते, वाट पहाते," आणि तसंच कानात शिरल्यासारखं वाटलं त्यानंतरचं तुझं खळाळतं हसू. किती दिवस होतील आता ते हसणं ऐकून. कल्पना नाही. शेवटचं ते ऐकल्यालाही बहुदा खूप कॅलेंडरं मागे जावं लागेल. तू असंच सांगायचीस आणि मी माझ्या सवयीप्रमाणे तू सांगितलेल्या वेळेच्या दहा मिनिटं आधीच जाऊन उभा असायचो. तुला ते माहितही असायचं. म्हणून मग बर्याचदा तू उशीराची वेळ सांगायचीस मला.
सहज सुचलं म्हणून
पुलंचं व्यक्ती आणी वल्ली वाचतोय. कितव्यांदा? माहीत नाही, खरच. पुलं वाचतो, भीमसेन ऐकतो नेहमी. आणी कधी कधी वाटून जातं- आपण कालचक्रातील एक चुक ठरलो आहोत. आम्हाला ना पुलं ना प्रत्यक्ष अनुभवता आलं ना भीमसेन जोशींच्या मेहेफीलीं मधे दैवी सुरांच्या पावसात भिजता आलं.
आपला सभोवताल किती बिघडलाय. काहीही चांगलं किती दुर्मिळ झालय. जगण्याच्या 'बेसिक नीड्स' पूर्ण करण्यातच आम्ही इतके दमतोय की साधं पुस्तक वाचण्यासाठी 'वीकेंड' ची वाट बघावी लागते.
पर्याय मिळाला तर कधीही सवाई मधले भीमसेन, निवेदक पुलं निवडीन. एफबी, मोबाइल पेक्षा.
काय चुकतंय ?
हि कायाच नकोशी झालीये आता.. वाटतंय सगळी काढून टाकावी ह्या मनावरून..
तसंच हे आयुष्य!! ह्यात नेमका कसूर तो कुणाचा ??
आज काढला राग त्या आईन्यावर.. माझी मीच नावडले मला..
आज परत वाटून गेलं.. कि काहीतरी चुकतंय..
मिसळपाव