पुलंचं व्यक्ती आणी वल्ली वाचतोय. कितव्यांदा? माहीत नाही, खरच. पुलं वाचतो, भीमसेन ऐकतो नेहमी. आणी कधी कधी वाटून जातं- आपण कालचक्रातील एक चुक ठरलो आहोत. आम्हाला ना पुलं ना प्रत्यक्ष अनुभवता आलं ना भीमसेन जोशींच्या मेहेफीलीं मधे दैवी सुरांच्या पावसात भिजता आलं.
आपला सभोवताल किती बिघडलाय. काहीही चांगलं किती दुर्मिळ झालय. जगण्याच्या 'बेसिक नीड्स' पूर्ण करण्यातच आम्ही इतके दमतोय की साधं पुस्तक वाचण्यासाठी 'वीकेंड' ची वाट बघावी लागते.
पर्याय मिळाला तर कधीही सवाई मधले भीमसेन, निवेदक पुलं निवडीन. एफबी, मोबाइल पेक्षा.
वाचने
2114
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
पर्याय मिळाला तर कधीही सवाई
(No subject)
गेले ते जाऊद्या
खरय ... वेळ मिळत नसतो , तो
सहज सुचलं म्हणून सहज सुचल
अंतु शेठ