Skip to main content

मुक्तक

टिनपाट

लेखक नाना चेंगट यांनी शुक्रवार, 17/08/2012 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
टिनपाट हा शब्द फार लहानपणी कानावर पडला आणि मनात घर करुन बसला. बिनकामाची, क्षुल्लक असलेली वस्तुचा उल्लेख करायला टिनपाट हा शब्द वापरला जातो हे कळालं. बरेच दिवस तो शब्द तोंडात घर करुन होता. मधल्या काळात आय असेल ते असो पण तो शब्द काही कानावर आला नाही. काही शब्द नंतर कधीतरी आठवतात आणि आपल्याच आयुष्यातले काही संदर्भ जागे होतात. दहावीच्या सुट्टीत सहज शाळेजवळून चक्कर मारत चाललो होतो. परिक्षा संपलेल्या होत्या त्यामुळे शाळा रिकामी पडलेली होती. आत डोकावून पाहिले तर कुणी नाही. आत जावे की नाही अशा विचारात असतांनाच ती दिसली.

शापित गंधर्व

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 11/08/2012 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
अनिल परांजपे नावाच्या असामीचं वर्णन एवढ्याच शब्दांत करता येईल. गंधर्व म्हणण्याएवढा तो देखणा नव्हता, पण व्यवस्थित राहिला तर बरा दिसेल, असं नक्कीच वाटायचं. स्वर्गीय सौंदर्य नसलं, तरी स्वर्गीय बुद्धिमत्ता त्याच्याकडे होती. मी बारावीनंतर पत्रकारितेत (धड)पडलो, तेव्हा अनिल परांजपेच्या नावाची रत्नागिरीत जोरदार हवा होती. रत्नागिरी टाइम्समध्ये तो नोकरी करायचा. तेव्हा फक्त त्याच्या टिंब टिंब स ्वरूपातील लिखाणाच्या शैलीवरून आणि आक्रमक, थेट बातम्यांवरून तो माहिती होता. 1993 मध्ये मी दै. सागर साठी रत्नागिरीत काम करू लागलो, तेव्हा पत्रकार परिषदेत कधीतरी त्याची भेट झाली असावी.

तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है !

लेखक नाना चेंगट यांनी शनिवार, 04/08/2012 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
आभाळ भरुन येतं. काळेकुट्ट ढग चहूबाजूंनी घेरुन टाकतात. कधी अचानक हलका वाहणारा वारा उग्र रुप धारण करतो तर कधी स्तब्ध बनून कोंडून टाकतो. वार्‍याने तोंडावर सगळीकडे पसरलेले काळेभोर केस सावरणारी ती अशीच दिसायची. मग मी हलकेच तिला काहीतरी चिडवायचो. बघता बघता तिचे डोळे भरुन यायचे. कधी कधी शिडकावा पण व्हायचा. माझी त्या शिडकाव्यात भिजायची लगबग पाहून ती खुदकन हसायची. श्रावणात उनपावसाचा खेळ कसा असतो हे तेव्हा मला कळलं. भादव्याचं ऊन अजून लांब होतं. चिंब धारांनी भिजणं चालू होतं. तिची आणि माझी पहिली भेट सुद्धा पावसातलीच. तसं तिला मी पहात होतो. ती मला पहात होती. कधी तरी एका रस्त्यावर नजर भेट होत होती.

मी,मी,मी,म्या,म्याउ!!!

लेखक कवितानागेश यांनी गुरुवार, 26/07/2012 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
मी माऊ. मी फार फार हुशार आहे. आणि मुख्य म्हणजे मी प्रचंड लाडावून ठेवलेली आहे. कुणी म्हणून काय विचारता? मी स्वत: मी इतकी स्वयंपूर्ण आहे की माझे लाड मी स्वत:च करत राहते. सतत मी फक्त माझेच लाड करते आणि माझेच गुणगान गाते.आता ज्यांना मुळात गाणंच समजत नाही त्यांना माझे गाणं बेसूरच वाटतं. जाऊ दे. तसे माझ्या आजूबाजूला अनेक प्रकारचे प्राणी राहतात. पण माझी बातच काही वेगळी. मी काही कुठल्या इतर तुच्छ प्राण्यांकडे लक्ष देत नाही. मी आपली स्वत:च्याच आनंदात मग्न घुर्र घुर्र करत बसते. काही प्राण्यांना कळते काहींना नाही. त्यांना मी पुन्हा तीच घुर्र घुर्र ऐकवते. शेवटी त्यांना मी काय बोलतेय ते कळतेच.

निशाण

लेखक मनीषा यांनी बुधवार, 25/07/2012 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
२५ जुलै - कारगिलच्या विजयी वीरांना आदरपूर्वक ... हिमगिरीच्या धवल शिखरावर फडफडणारे तिरंगी निशाण ... त्याच्या वाटेवर शिंपले आहेत रक्ताचे सडे .. उधळले गेले आहे सुवासिनींचे कुंकु ... त्याचा लालस केशरी रंग जाणवतो अजून नजरेला मरणाची भिती , शिकवलीच नाही कुणी बर्फाच्छादित वाटांवरुन चालताना आठवले नाहीत कधीच आपले संसार मातृभूमिच्या काळजात खुपसलेल्या खंजिराची कळ उठते आहे मस्तकात तळपत्या तेगीचा निर्धार रुतला आहे मनामनात कुठुन, कधी आणि किती येतील ते आणि पडेल काळाचे जाळे सांगता येत नाही काहीच समोरुन येतील , कि पाठीवर करतील वार हे ही ठाऊक नाही अंतरी आहे फक्त एकच जाणीव जपायचे आहे ह

पत्र

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी मंगळवार, 24/07/2012 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
तुला पत्र लिहिताना 'काय' लिहावं असा प्रश्न कधी पडला नाही आणि 'किती' लिहावं याचं भान कधी राहिलं नाही आज मात्र नेहमीपेक्षा वेगळंच घडलंय...... अजून कागदावर एकही अक्षर उमटलं नाहीये हे...... पानभर लिहून झाल्यावर लक्षात आलंय ...आणि तू हे न लिहीलेलं पत्र पोहोचलं म्हणालीस? ------------------------------------------------------------------------ ब्लॉगवर पूर्वप्रकाशित ------------------------------------------------------------------------

दाराज कट्टा...लाईव्ह..

लेखक गवि यांनी रविवार, 22/07/2012 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
मी आणि रामदासकाका वेळेतच दाराज च्या दिशेने निघालो.. वेटिंगमधे गप्पा सुरु.. तेरा जण जमा झालेत..

मी आहे!!

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी शुक्रवार, 20/07/2012 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
तुझा निरोप घेऊन तीनदा 'येतो गं' म्हणून जड पावलांनी मी निघालो हळूच माझ्या मागे येऊन खांद्यावर हात ठेऊन म्हणालीस... "मी आहे!" पाठ वळताच भयाण पोकळी जाणवू लागली तुझ्याविना जगाची तसवीर मला भिववू लागली जलतरंगाचा नाद व्हावा असा तुझा आवाज पुन्हा कधी ऐकायला मिळेल असं वाटू लागलं, तेव्हा फोन आलाच तुझा, म्हणालीस... "मी आहे!" घरी आलो, अगतिकपणे बसलो खिडकीत गाडी सुटली असेल का तुझी, असा खिन्न विचार करत श्रावणातला ऊन-पावसाचा खेळ चालला होता बाहेर धावत येऊन तुला भेटण्याची ओढ दाटून आली तुझा मेसेज आलाच, "मी निघालीये रे..." वाटलं कळवावं का तुला, गर्दीत आहे, सार्‍यात आहे...

वारूळ

लेखक पेशवा यांनी गुरुवार, 19/07/2012 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
पावलांचे मुंगळे निघाले त्या वारुळातील योगी मंत्रामागून मंत्र उसवत राहील तर नागवे होणाऱ्या शरीराची कुठली असेल पोळणारी जात? मांडी घालून म्हणता येतात सहिष्णू शब्दरचना त्याच वेळी निराकार जनावर वेटोळे (? ) घालून रचत असते जहरोत्तम द्वंद्वगीत... सहज मनाच्या गाभाऱ्यातील समईची जखम रुंदावायला लागली की एखादी पालखी हमखास येते भोयांच्या खांद्यावरून अनेक समाप्तीच्या कथा पायउतार होतात पाठ वळवून, ती धून ऐकण्यासाठी देवळे मिटून घेतात शयनगृहाचे दरवाजे असहायपणे हेलकावे घेत राहते बाहेर कडी एक... दोन...