Skip to main content

मुक्तक

पारिजातक

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी मंगळवार, 10/07/2012 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
आठवतं तुला? दोन वेगळ्या वाटांवर चालता चालता एका वळणावर आपण अवचित भेटलो होतो तेव्हा तू हातात हात गुंफुन थरथरत्या ओठांनी मला म्हणालीस एकत्र चालायचं का रे? "अगं पण......" पण काय?

"कोणाचा रे तू?"

लेखक चिगो यांनी सोमवार, 09/07/2012 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
"कोणाचा रे तू...?" गावात बालपण गेलेल्या कुणालाही हा प्रश्न नवीन नसावा. ह्या प्रश्नाच्या उत्तरावर तुम्हाला मिळणारी वागणूक ठरत असे. वाटलं होतं, की शहरे, उच्च शिक्षण संस्था, उच्च पदस्थ नोकर्‍या इ. मध्ये कुठल्याही व्यक्तीला मिळणारी वागणूक कदाचित त्याच्या/तिच्या बौद्धीक प्रतिभेवर निर्धारीत असेल. पण काल "सत्यमेव जयते" बघितल्यावर कळले, की भारत असो वा इंडीया, अजूनही "कोणाचा रे तू" ह्याच्या उत्तरावर बरंच काही निर्भर आहे.. "सत्यमेव जयते" च्या बर्‍याच आधी, लाबशाराप्र अकादमीमध्ये, "इंडीया अनटच्ड" ही डॉक्युमेंटरी बघितली होती. खरे तर स.ज. पेक्षाही ही फिल्म जास्त सत्यदर्शी आहे.

टप टप टप...

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शुक्रवार, 06/07/2012 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस थांबून खरं तर बराच वेळ झाला घराचे छत अजूनही गळतेय टप टप टप... --------------- तुला निरोप देऊन परतलो तसाचं बसून आहे बराच वेळ चंद्राने आपले साम्राज्य वाढवायला सुरवात केली टिपूर चांदणे पसरत गेले ते डोळ्यात उतरतांना कां कुणास ठाऊक पण एक आवाज कानात घुमतोय टप टप टप... -------------- बाजुच्या खोलीतला तुझा वावर तसा अजुनही तस्साचं बुद्धीचे मनाशी वाद सुरु झाले एक म्हणे तु नाहीस, अन् एक तु आहेस.. खिडकीच्या काचेवर परत तोच पाऊस.. टप टप टप... -------------- तुझा आवाज घरभर दाटून राहीलाय कोपर्या-तल्या उदबत्तीच्या सुवासासारखा जाणवतोय..
काव्यरस

कुत्रं...

लेखक गवि यांनी बुधवार, 04/07/2012 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
मी लहानपणापासून राजीखुषीने, विशेषतः आईबापांच्या राजीखुषीने आणि नशापाणी न करता कुत्री आणि मांजरं पाळत आलो आहे. मांजरांची पिल्लं बिल्ल्यांसारखी शर्टावर लटकावून मी लहानपणी हिंडायचो. ती नखांनी शर्टला घट्ट पकडून असायची.. पण असं जास्त वेळ करता यायचं नाही. लटकता लटकता ती पिल्लं हळूहळू वर चढत जायची..मग खांद्यावर चढून कानाशी कापसाचे मांजरगोळे हुळहुळायला लागले की मी परत त्यांना पकडून शर्टाला अडकवायचो. मांजरांना मी सुकी कोळंबी आणून घालायचो. कोळंबीचा पुडा घेऊन घरात शिरलं की जिथ्थे कुठे मांजरं बसली असतील ती हर्षवायूने ओरडत पायात यायची.

आपण पहिला घोट कधी घेतला ?

लेखक कुंदन यांनी रविवार, 01/07/2012 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
"सत्यमेव जयते" मधली दारु बद्दल ची चर्चा वाचुन हा धागा काढण्याची प्रेरणा मिळाली. माझ्याबद्दल सांगायचे तर , आमच्या शेजारचे काका रोज प्यायचे , कधी कधी मला त्यांचा चखणा आणायला पिटाळायचे. एकदा त्यांचा ग्लास भरुन ठेवलेला होता अन ते जाग्यावर नव्हते तेंव्हा मी "पहिला घोट " घेतला होता. चव काही विशेष आवडली नाही, त्यामुळे मग कधी पुन्हा त्या वाटेला गेलो नाही. पुढे मग इंजिनियरींग करताना पहिल्यावर्षी चा निकाल लागण्यापुर्वी "निकालच" लागण्याच्या भीतीने २-३ दिवस झोप लागली नव्हती , त्यातुन सर्दी- खोकल्यामुळे जाम झालो होतो.

प्रणाम अनाम वीरांना...

लेखक सुधांशुनूलकर यांनी गुरुवार, 28/06/2012 18:32 या दिवशी प्रकाशित केले.
|| श्री गुरवे नम: || शुक्रवारी (२२ जून) मंत्रालयाला भीषण आग लागली. ती विझवायला अनेकांनी जिवाचं रान केलं आणि स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता मंत्रालयाच्या कर्मचार्‍‍यांचे आणि अभ्यागतांचे प्राण वाचवले. काही जण यात जखमी झाले. मात्र, नेहमीप्रमाणे हे वीर अनामच राहिले. त्यांच्या शौर्याची कुठेही दखल नाही, कौतुक नाही.

वाडा

लेखक पेशवा यांनी बुधवार, 27/06/2012 02:30 या दिवशी प्रकाशित केले.
जुन्या वाड्यांच्या दारावरील सायकलींच्या ढिगासारखे एकात एक गुंतून पडलेले विचार घेऊन बसलो आहे... अर्गोनोमिक साहित्य लिहिण्याच्या आजकालच्या विनंत्या 'मान द्या (नाहीतर कापून घेईन)' अशा जाड अक्षरांनी पार वाकलेल्या नवी कल्पना निसर्गत:च वस्त्रविरहित की बघितल्यावर विसरता विसरत नाही शब्द विस्फारण्या साठी करेक्ट फॉन्ट अशावेळी कधीही सापडत नाही... वापरलेल्या वस्तू विकणारे दुकान डोक्यात उघडून बसलो आहे आजची जाहिरात - ' लाज वापरून झाली असेल तर आणून द्या टॅक्स मध्ये सूट किंवा लंगोटी तरी मिळवा ' हा कुणाचा तरी वापरलेला जोक; पुन्हा वापरला तुम्ही वापरलेलं हसणं; पुन्हा वापरलंत? जुन्या वाड्याच्या अंगणांसारखं का

बोगदा

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 26/06/2012 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
बोगद्यामध्ये कितीही अंधार असला तरी त्याच्या दोन्ही तोंडाशी उजेड असतोच एकाबाजूने येणारा अन् दुसर्‍याबाजुने जाणारा . मी बर्‍याचदा जाणार्‍या उजेडाकडे उभा राहतो विरुद्ध दिशेला . येणार्‍या उजेडाचा अवखळपणा सोसत नाही आजकाल नाही, अजून काही मी वयोवृद्ध वगैरे नाही झालोय बरगड्यांच्या सापळ्यात धडधडणारे हृदय अजूनही न करकरता बिनविरोध चालू आहे . पण तरी जाणा-या उजेडाचे मृदुमुलायम अस्तर अंगावर वाहण्याची चटक लागलीये आता . बोगद्यातील कळकभिन्न अंधार अन् डोळ्यांपुढे काजवे चमकवणारा "येणारा उजेड" या दोघांना ओलांडून येणारा अनुभवाची शाल पांघरलेला "जाणारा उजेड" तसे खूप काही शिकवून जातो, नाही? |- मिसळलेला काव्यप्रेम
काव्यरस

तगमग

लेखक नाना चेंगट यांनी गुरुवार, 14/06/2012 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
कधी समुद्रावर उगवणारा चंद्र पाहिला आहेस? अलगद लाटांवर स्वार होत त्याचे पाउल पडतांना दिसते हळू हळू चंद्र वर वर सरकत जातो... टक लावून पाहिले तर असे वाटते की जणू लाटाच त्याला ह्ळू हळू आकाशात ढकलत आहेत मग हलकेच तो वर वर सरकत जातो पिवळसर फिकट दिसणारा मग सतेज कांतीने न्हाऊन निघतो आणि आनंदाने लाटा चित्कार करु लागतात डूलत डूलत चंद्र वर आकाशात येऊ लागतो आणि मग सरळ किनार्‍यावर बसल्या बसल्या त्याला पहाता येत नाही हलकेच आपण मागच्या मागे लवंडतो आणि केवळ एकटक त्याच्याकडे पाहू लागतो तो पण आपल्याकडे पहात असतो त्याला काही तरी सांगायचे असते असेच नेहमी वाटते पण तो काय सांगतो हे कळत नाही कधी समुद्रावर उगवणारा चंद