Skip to main content

मुक्तक

खस्स्स्स्स् स्स्कन्..

लेखक अन्नू यांनी गुरुवार, 12/04/2012 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
अंधारात खस्स्स्स्स् स्स्कन् चादर ओढल्याचा भास झाला... कोणाचतरी कारटं चादरीवर पसारलं असणार... डोळ्यात धगधगीत आग आणि मनात कचकचीत शिव्या आल्या... दारात उघड्यावर झोपलो होतो म्हणून त्या नुसत्या मनातच बरळल्या.. पुन्हा पुन्हा तिडीक उठवणारा तोच चादर ओढल्याचा भास... कोण तडमडतोय रे चादरेवर... मरतोय नुसता **चा.. असशिल कोणाचा लाडाचा कारटा म्हणून झोपेचं खोबर का करतोय.. वात्रट मेलं नालायक कारटं कुणाच... तोंडावरची चादर सारुन हळूच डोकावून बघितल तर ते गल्लीतल शेफारलेलं कुत्र होतं... मग मी त्याच्या कंबरट्यात कच्चकन लाथ मारुन गप गुमान मुस्कटून झोपलो... (आमचे प्रेरणास्थान फस्स्स्स्स्स्स्कन् ;) )

(फस्स्स्स्स्स्स्कन)

लेखक आदिजोशी यांनी गुरुवार, 12/04/2012 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
अंधारात सोडा उघडल्याचा फस्स्स्स्स्स्स्कन आवाज आला... कोणाची तरी बायको माहेरी गेली असणार... डोळ्यात चळचळीत पाणी आणि मनात कचकचीत शिव्या आल्या... आमची बायको घरी आहे म्हणून त्या नुसत्या कानात खळखळ वाजल्या.. पुन्हा पुन्हा डोक्यात घुसणारा तो बूच उघडल्याचा आवाज... कोण ढोसतोय इतकी... मजा मारतोय **चा.. असशील सद्ध्या एकटा म्हणून आमची का जळवतोस... हलकट टेंपररी बॅचलर सारे... शेजारच्या घरी डोकाऊन बघितलं तर तो *म्या होता... मी मान खाली घालून ज्यूस पिऊ लागलो...

तो आणि ती

लेखक चाफा यांनी मंगळवार, 10/04/2012 04:36 या दिवशी प्रकाशित केले.
तो आला, नेहमी प्रमाणेच धाड धाड करून शूज रॅकमध्ये ठेवले आणि घरात आला. धडामकन सोफ्यावर पडला, त्याच्या गाडीच्या आवाजानं मी बाहेर आले, पण नेहमीसारखी नव्हे. माझ्याकडे पाहताच त्याचा भडका उडाला, तो उडणारच होता हे मला माहीत होतं. "आशु, अजून सकाळचाच ड्रेस अंगावर ? " " हो ! काय वाईट आहे त्यात ? " " तुला माहीताय मला आवडत नाही " " नसू दे आवडत, मी काही बाउंड्रीवर फिल्डिंग करत नसते की डाइव्ह मारून चेंडू अडवताना कपडे खराब होतील " " तू रैनासारखी फिल्डिंग कर, किंवा द्रवीडसारखी बॅटींग कर पण जरा टापटीप राहायला काही प्रॉब्लेम आहे का तुला ? " " हे 'तू' मला सांगतोयस ?

चांदण्यांची धार

लेखक पेशवा यांनी मंगळवार, 10/04/2012 04:06 या दिवशी प्रकाशित केले.
शांततेवर लोंबणारा हा दोर कसला? ज्याचा पीळ ओळखीचा आहे भास ओळखीचा आहे माने भोवतालीचा पेड माझा आकांत भोवरा आहे ?
काव्यरस

विडंबना..

लेखक ajay wankhede यांनी सोमवार, 09/04/2012 01:29 या दिवशी प्रकाशित केले.
भयाची सुरवात झाली ग्रिष्माच्या शुक्ल पक्षात.... थांबली दाराशी रुग्नवाहिका दिव्याचि निळ्या अल्पतात, चार पाऊंड घेउन अधिकचे उतरली विव्हळंत माय माझी.... सुखद, दुखद, वेदनेचि ति बळी, सोबतीला गनगोत माझे फक्त सुखद वेदनेचेच सोबती... निघाले सारे प्रसुतीग्रुहाकडे तयारी जन्माची, मरणाची.. लागला दिवा लाल बंद दारावर... स्मशान शांतता.. चालले आत, काही केल्या कळेना वेदनेच्या आंर्त हाकि काही केल्या उमजेना टवकारले काने ,सारीच रडण्याच्या त्या मंगल वाटेवर पण, आज अगा घडले असे नवलंच नि मी जन्मलो हसत,हसतच... ऐकता आवाज ,भांबवले सारेच माय वेदनोत्तर झाली शांत, बाप झाला घामाघूम...
काव्यरस

स॑ध्याकाळ आणि आठवणी!!

लेखक प्रीती यांनी बुधवार, 04/04/2012 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
किती सु॑दर स॑ध्याकाळ होती आजची!!! निळ्या आकाशात पसरलेले ते गुलबी केशरी ढग , त्यातून किलकिलाट करत आपापल्या घरी परतणारे पक्षी , धु॑द करुन सोडणारा वारा आणि त्या वार् यासोबत येणारया आठवणी!!!!! मनाला हुरहुर लावणार॑ पण एकदम मस्त वातावारण!!! सोबत कोकीळेच॑ गाण॑ ! वस॑ताची आतुरतेन॑ वाट पहाणारा पक्षी म्हणुन त्याची ओळख! पण खर॑तर आपल्या सोबतीदारास , आपल्या जोडीदारास दिलेली ती साद!! या मूक भाषा!!

प्रार्थना

लेखक पेशवा यांनी बुधवार, 04/04/2012 02:22 या दिवशी प्रकाशित केले.
प्रार्थनेचे हात जुने होत नाहीत, विटत नाहीत, विरत नाहीत धोकादायक वस्तूंची विल्हेवाट कशी लावतात? चंद्र उगवलेल्या रात्रीत मल्हार ऐकताना पाऊस बनून कोसळावेसे वाटते आहे माझी म्हणावी अशी जमीन उरलेली नाही माझे म्हणावे असे आकाश उरलेले नाही वीजा, ढग, सोसाट्याचा वारा ह्यांचा वरखर्च... रकाने मारलेल्या मन-देहाला झंकारणे झेपणार की नाही?
काव्यरस

आयुष्य

लेखक विदेश यांनी सोमवार, 02/04/2012 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य मी चालत आहे , सोबतीला चंद्र चांदण्या - मी नाही कंटाळलो, बिचारा चंद्र मूक राहिला ! पाठवून दिले त्याने माझ्या सोबतीला - विनातक्रार शांतपणे किरणांसवे सूर्याला ! ...आता मला सोबत करताना

जीवन, भाषा, साहित्य वगैरे वगैरे

लेखक यकु यांनी रविवार, 01/04/2012 06:20 या दिवशी प्रकाशित केले.
हे लिहायला बसण्‍यामागे माझ्या मनात अधून मधून पडत असलेलं प्रतिबिंब शब्दरुपात ठेऊन ते स्वत:साठी पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घेण्याचा उद्देश आहे. एरव्ही क्षणभर क्षणभर झरणार्‍या काळाच्या मंद गतीने आयुष्‍य उलगडत जाते; आणि आयुष्‍याचं सुस्पष्‍ट नखशिखांत जसं आहे तसं रुप त्या क्षणभरात पहायला मिळत नाही.

एप्रिल फूल -

लेखक विदेश यांनी शनिवार, 31/03/2012 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
रंग नाही, रूप नाही, सुगंध नाही पान नाही, पाकळी नाही, देठही नाही - अजबसे फूल, देते हूल, कुठे दिसेना आकर्षण आहे तरी तयाचे सर्वांना ; फजितीत फसवते, स्वत:लाच हसवते एप्रिलमध्येच कसे नेमके बघा उगवते - एक तारखेचे "एप्रिल फूल" भारी जीव जडवते, मी मी म्हणणाऱ्याची खिल्ली पाहता पाहता उडवते !