कधी कधी,
सैरभैर, प्रश्नांकित होऊन,
शरिर स्वतःला हरवुन बसतं
गर्दीत लहान मुलासारखं
आणि कधी आपण
मनाला हरवु देतो
कधीकधी वेगळं जगता यावं
म्हणुनसुद्धा....
पण नियती कधीच
हरवुन बसत नाही स्वतःला
ती आंधळ्या डोळ्यांनी
नी बांधलेल्या हाताने
धापा टाकत,
मूकपणे चालत रहाते.
तिच्यात
सापळ्याआड धडधडणारं
असं काहीच नसतं.
कुण्याच्याही स्पर्शाने
उभे रहाणारे किंवा सुटणारे
प्रश्न नसतात.
भंगणारी आकांक्षा,
फाटलेलं ह्र्दय
शोकाचे सुर
पश्चातापाचे निश्वास
जखमा आणि सारं काही
असतं शवपेटीत बंद.
आणि चालताना सोबत असते फक्त
एक न संपणारी शवयात्रा
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1766
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
हरवलेल्या जहाजा... साहेब, कविता उत्तम आहे.
नियती
धापा टाकत,मूकपणे चालत
होय, बरोबर आहे तुमचं. माझ्या
In reply to धापा टाकत,मूकपणे चालत by गवि
ही कविता समजली आणि आवडलीही.