नैतिकता.
स्वतःच्या वागण्यावर स्वतःच घालुन घेतलेले किंवा अमुक गोष्ट अशीच केली पाहीजे अशा अर्थाचा समाजाचा आग्रह.
सध्या आपण समाजाच्या आग्रहाचा विचार न करता फक्त स्वतःच स्वतःवर घालुन घेतलेल्या बंधनाबद्द्ल बोलु.
अमुक एक गोष्ट करणे अथवा न करणे माझ्या तत्वात बसते असे आपण सांगतो. हे नक्की काय असते? तर आपण आपल्या बुद्धीनुसार अमुक एक पद्धतीने वागण्याचे ठरवतो. तसे वागणे हे आपल्या दृष्टीने नैतिकतेने वागणे असते. त्या तत्वाविरुद्ध आचरण करण्याची कल्पना आपल्याला सहन होत नाही. तसे वागणे हे आपल्याला अनेकदा अनैतिक वाटते. कळत न कळत आपल्या नैतिकतेचा आग्रह इतका वाढतो की समोरच्याने सुद्धा तसेच वागावे असे आपण ठरवायला लागतो. तर कित्येकदा ज्यांना आपण आदर्श मानतो त्यांच्या नैतिकतेच्या कल्पना आपण अंगिकारतो. हे अंगिकारणे जर बुद्धीचा वापर करुन असेल तर त्यात गैर काही नाही परंतु कुठलाही विचार न करता केवळ ते तसे वागतात म्हणून आपण तसे वागावे ही आंधळा प्रवास होय. ज्यात कदाचित भविष्यात नैराश्य पदरी येण्याची शक्यता असते.
पण नैतिकतेने वागणे म्हणजे नक्की काय? कित्येकदा नैतिक वागणे हे कायदेशीर असेल असे नाही आणि कायदेशीर वागणे हे नैतिक असेल असे नाही. मग महत्व कशाला द्यायचे ? कायदेशीर वागण्याला की नैतिकतेने वागण्याला? कायद्याचे राज्य, कायदेशीर वर्तणुक याला लोकशाहीमधे महत्व आहेच त्याचबरोबर समाजासाठी ते आवश्यक आहे हे आपल्यावर बिंबवले आहे. त्यामुळे कित्येकदा आपण आपली वर्तणूक केवळ बेकायदेशीर होत नाही ना हे पहातो. त्या साठी मग नैतिकतेचा सुद्धा बळी जातो. पण आपण ही तडजोड सहज करतो. मात्र आपण अनैतिक वागत आहोत असे कधीच मान्य करत नाही. कारण बेकायदेशीर आणि अनैतिक यात प्रचंड फरक आहे हे आपण जाणतच नाही.
कायदा झाला की कायदेशीर काय आणि बेकायदेशीर काय यात फारसा संभ्रम रहात नाही. परंतु नैतिक काय आणि अनैतिक काय याचा क्षणोक्षणी संदर्भ बदलत असतो आणि आपण तेवढा विचार करण्याची तसदी घेत नाही. सोईस्कर रित्या कायदेशीर तेच नैतिक आणि बेकायदेशीर तेच अनैतिक अशी समजुत करुन घेत आपल्या दृष्टीने आपला तिढा सोडवतो. पण तो सुटलेला असतोच असे नाही.
वाचने
12360
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
?
+१ परा
In reply to ? by परिकथेतील राजकुमार
सहमत.
In reply to ? by परिकथेतील राजकुमार
<<नैतिक आणि अनैतिक असले काय
In reply to ? by परिकथेतील राजकुमार
जय मल्हार
माझा एक विचार!!
नैतिक आणि अनैतिक हे समाजाने
In reply to माझा एक विचार!! by Maharani
अबे
In reply to नैतिक आणि अनैतिक हे समाजाने by परिकथेतील राजकुमार
ररा शेठ
In reply to अबे by रमताराम
सहमत फक्त खिसा भरलेला असो
In reply to ररा शेठ by परिकथेतील राजकुमार
आई ग्ग !
In reply to सहमत फक्त खिसा भरलेला असो by निनाद मुक्काम …
ते कळले हो (त्याच्याशी सहमत
In reply to आई ग्ग ! by परिकथेतील राजकुमार
छान लिहलं
आधी मृत्यु, आता नैतिकता, नंतर
एके काळी मोजून पन्नास
In reply to आधी मृत्यु, आता नैतिकता, नंतर by बॅटमॅन
ऐला खरंच? बघूच मग
In reply to एके काळी मोजून पन्नास by बिपिन कार्यकर्ते
मस्त
लेखाचा विषय उत्तम आहे नाना
उत्तम लेख
नैतिकता ह्या बद्दल अमेरिकन
//आपल्या पुढे नेहमीच
माझे ४ आणे
च्यायला !
नैतिकतेच्या नावाखाली जो
सरळ आरशासमोर उभे
नानाला चेंगटपणा करायला बराच