Skip to main content

मुक्तक

डोक्याला शॉट

लेखक चाफा यांनी बुधवार, 16/05/2012 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
"हॅलो, बीएसएनएल का ? " " हो, बोला " " अहो ब्रॉडबँड बंद पडलेय " " तुमचंच नाही, सगळीकडेच बंद आहे" " का हो ? " " टेक्निकल प्रॉब्लेम" खाSSड फोन बंद ***** " हॅलो, बीएसएनएल ? " " दोन दिवस झाले नेट बंद आहे हो, कामं अडलीयेत " " काय करू साहेब ? सगळ्यांची तीच बोंब आहे" " नक्की काय प्रॉब्लेम आहे हो ? " " एक्चेंजमधे उंदराने केबल खाल्ल्यात " " काय सांगता ? तरी किती वेळ लागेल चालू व्हायला ? " " काही सांगता येत नाही केबल शोधायला वेळ जाणारच " खाSSड फोन बंद ***** "हॅलो बीएसएनएल ?" " बोला " " तुमच्या एक्चेंजमधे प्रॉब्लेम आहे ना " " हो ना साहेब, केबल खाल्ल्या उंदरांनी " " मी तुमची काही मदत करू शकतो का ?

नाजूक - साजूक

लेखक तिमा यांनी मंगळवार, 15/05/2012 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
एका लग्नाला नुकताच गेलो होतो. संध्याकाळी ७ ते १० अशी वेळ दिली होती म्हणून साधारण पावणेआठ वाजता पोचलो. तरीही प्रथेनुसार नवरा-नवरी स्टेजवर आलेच नव्हते. यजमान सर्वांना आधी जेवून घ्या असा प्रेमळ आग्रह करत होते. पण माझे दुसरे एक मित्र यायचे होते त्यामुळे त्यांची वाट पहायची ठरवून एका पांढर्‍याशुभ्र कव्हराच्या गुबगुबीत खुर्चीवर विसावलो. आजुबाजुला सुंदर सुंदर ड्रेसेस व साड्या नेसलेल्या (पाण्याला 'अ‍ॅव्ह' म्हणतील अशा) ललना विहरत होत्या. अनेक संभाषणे कानावर पडत होती. पण एका वैशिष्ठ्यपूर्ण बोलण्याने माझ्या कानांचा ताबा घेतला. " हाय,... अगं किती दिवसांनी भेटतोय आपण!

इतिहास

लेखक नाना चेंगट यांनी सोमवार, 14/05/2012 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
इतिहास म्हणजे असे असे घडले असे सांगणारी कथा. इतिहास आपल्यापर्यंत अनेक मार्गांनी येतो. लहानपणी आजीने, आईने सांगितलेल्या कथा. ज्यात भुते असतात, राक्षस असतात. चेटकीणी असतात. राजकुमारी असते. राजकुमार असतो. शेवटी लग्न होऊन ते सुखी होतात. प्रत्यक्ष आयुष्यात मात्र लग्न झाल्यावर कथा अशी सहजासहजी सुखी होत संपत नसते. वाढणारे आयुष्य त्याची जाणीव करुन देते. मग लग्न झाल्यावर पुढे काय झाले हा विचार मनात येत रहातो. कल्पनाशक्ती सुसाट धावत सुटते आणि आपल्या स्वतःच्या, आजुबाजुच्या परिस्थितीशी साधर्म्य असणारी कथा आपलेच मन तयार करुन पुढे असे झाले असावे असा आपल्या मनाचा समज करुन देते.

...तू कुठे आहेस गालिब?...

लेखक चाणक्य यांनी मंगळवार, 08/05/2012 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी 'सकाळ' मध्ये सौमित्र ची 'तू कुठे आहेस गालिब?' ही कविता वाचली होती. खूपच आवडली होती. पण कात्रणं वगैरे करून ठेवायचा आळस आणि रद्दी टाकायची घाई या नादात ती पुरवणी गेली कुठेतरी. पुरवणी तर गेली पण कविता मनात घर करून बसली होती. युट्युब वर सौमित्र चे कविता वाचनाचे व्हिडिओ वगैरे धुंडाळले पण नाही सापडली. आणि परवा नकळत पणे हातात आली. झालं असं की घराजवळंच पुस्तक प्रदर्शन लागलं होतं, तिथे पुस्तकं बघता बघता सौमित्रचंच एक पुस्तक हाती आलं. अधाश्यासारखी झडप घातली आणि त्यात ही कविता कुठे आहे आहे का ते शोधायला लागलो. आणि काय सांगू महाराजा...चक्कं सापडली.

एक रस्ता असाही ...

लेखक निश यांनी गुरुवार, 03/05/2012 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
एका गजबजलेल्या रस्त्यावर एक पोर भिक मागत आपल्याकडे, भुकेने व्याकु़ळ असुनही आपल्या नजरेतील हेटळणीचा विखार त्यालाही उमजतो व तो रडवेला होतो.

ठाणे कट्टा लाईव्ह.. पॉप टेट्सवर स्वारी.

लेखक गवि यांनी रविवार, 29/04/2012 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
पॉप टेटस ठाणे.. कट्टा सुरु झालेला आहे.. प्रास, विमें,चतुरचाणक्य,जयपाल, वरुण मोहिते,कस्तुरी,गवि,मन्या फेणे,सुहास झेले हे नग आत्तापर्यंत जमा झालेले आहेत. ठाण्याची स्कायलाईन सुंदर दिसते आहे. पॉप टेट्सचे हॅपी अवर्स चालू आहेत.. कॅमेरामन मन्या फेणे के साथ गवि, ठाणे से.. देखते रहिये आप तक..