Skip to main content

मुक्तक

राधा

लेखक रेशा यांनी मंगळवार, 08/01/2013 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
मोरपीस जणू फिरते तनी, वेणू नाद हा पडता कानी, काहूर मनात, अन हुरहूर आगळी मोहरते आठवता, छबी सावळी थरथरते अधर, लाली गाली किंचित लाज, अधीर नयनी ललना साजिरी, नटली सजली शाम सख्यावर, आणिक भाळली बावरे मन, अन आशा कोवळी मिलनास आसुसली, राधा भोळी पाहून अधीर राधा, बोले सखी "होईल बोभाटा ग गोकुळी!", नयनी पाणी, मिटे पापणी अस्वस्थ राधा,आजही नंदनवनी!!! ... रेघोटी

अंतू बर्व्याचं अर्थशास्त्र - १

लेखक आदूबाळ यांनी मंगळवार, 01/01/2013 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक वर्षं मिपावर "मुखस्तंभ रहाणे" ही महत्त्वाची जबाबदारी पार पाडल्यानंतर लेखनाचा पहिलावहिला प्रयत्न. दिग्गजांनी पहिलटकरणीला सांभाळून घ्यावे, ही विनंती! -----------------------------------------------------------------------------
उन्हाळ्यात कुठली तरी मुंबईची दुय्यम नाटक कंपनी झापाच्या थेटरात 'एकच प्याला' घेऊन आली होती. संच जेमतेमच होता. पहिला अंक संपला. बाहेर सोड्याच्या बाटल्यांचे चीत्कार सुरू झाले. किटसनच्या प्रकाशात अंतूशेटची मूर्ती दिसली. अंतूशेट फरक्यापवाल्या मॅनेजरशी चर्चा करत होते. "कशी काय गर्दी ?" "ठीक आहे !" "प्लान तर मोकळाच दिसतोय.

स्वप्नातल्या देशा

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 01/01/2013 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
"सपने मे देखा एक सपना, वो जो है ना अमिताभ अपना..............." ऐकत होतो आणि खरोखरच अमिताभ आला. सुरुवातीच्या चहापाण्याच्या चार गप्पा झाल्यावर (म्हणजे फक्त गप्पाच झाल्या. पुणेकर आहे म्हटले मी. साले लोक न बोलावता घरी येणार वर यांच्यासाठी चहा करा हे कोणी सांगितले आहे?" ) अमिताभन्ने चाचरत मुद्द्याला हात घातला. पिक्चर काढतो आहे म्हणाला. मला हिरो होण्यासाठी गळ घालत होता. आधी ष्टोरी विचारायच्या बेतात होतो पण मग साशंक मनाने आधी उरलेली स्टारकास्टच विचारली. तर म्हणाला तुम्ही हिरो, अभिषेक साइड हिरो, ऐश्वर्या हिरोइन, जया तुमच्या आईचा रोल करेल आणी मी खलनायक. नाही म्हणले तरी मला ठसका लागला.

विखुरलेला चंद्र - अंतिम

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 31/12/2012 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
तिला माहीत होते तिला जावेच लागेल ति थांबली नाही अन् मीही अडवू शकलो नाही तू गेल्यानंतर इथे फार काही बदलले नाही मीही तसाचं, तो शिकाराही तसाचं, अन् हा किनाराही तसाचं ---- अजूनही शिकारा पाण्यावर तसाचं डुलतोय शिकार्‍याची वल्हे तशीचं पाण्यावर लपलपतायत तश्याचं छोटुल्या लाटा पसरवतायत पाण्यावर झुलणार्‍या तार्‍यांचे ते शेपूट ते अजूनही तसेच मोहक आहे ----- पण तो चंद्र, तो बिचारा नभाच्या त्या मागच्या कोपर्‍यातून ठिकर्‍या ठिकर्‍या होऊन पाण्यावर वाहत वाहत किनार्‍याला लागतोय ------ जातांना तेवढे चांद्रकण घेऊन गेली असतीस... ~~~(समाप्त)~~~ |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (३१/१२/२०१२)
काव्यरस

निरोपाचा क्षण

लेखक नाना चेंगट यांनी सोमवार, 31/12/2012 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
जपून जा. पोचल्यावर पत्र पाठव, गाडीतून उगाच उतरु नकोस. वेळच्या वेळी जेवत जा. जीवाला घोर लागेल असा वागू नकोस. अभ्यास नीट करत जा. खुशाली कळवत जा. रात्री लवकर झोपत जा. तुला भान रहात नाही. वाचत तर वाचत बसतोस. सकाळी लवकर उठत जा. अंघोळ नीट करत जा. दोन मिन्टात पाणी अंगावर घेऊन बाहेर पडू नको. आईच्या सुचनांचा भडीमार चालू होता. आणि मी हसत हसत अग हो आई किती काळजी करतेस. मी आता मोठा झालो आहे. आई म्हणायची असू दे माझ्यासाठी लहानच आहेस. पहिल्यांदा इतक्या लांब चालला आहेस. काळजी वाटते. आईच्या डोळ्यात पाणी तरारले होते आणि मी हसत होतो. हसु नको. जे सांगितलं ते नीट लक्षात ठेव.

एक अध्यात्मिक संवाद

लेखक धन्या यांनी रविवार, 30/12/2012 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
"धन्या, अध्यात्मात खरंच ईतकी ताकद असते का रे?" ध्यानीमनी नसताना हा प्रश्न धाडकन कानावर आदळला आणि मी गोंधळून गेलो. "किस्ना, फोकन्या कोण चावला बे तुला? मी केव्हाचा वाट पाहतोय की हा वल्ली आता काहीतरी या लेण्यांमधील चित्रांबद्दल माहिती सांगेल, नंतर काहीतरी बोलेल. पण हा बावा केव्हापासून त्या क्यामेर्‍याच्या लेन्समध्ये डोळा मारत बसला आहे. देव जाणे कधी काही उघडया डोळयांनी पाहतो की जे पाहायचं ते क्यामेर्‍याच्या लेन्समधूनच असं ठरवलं आहे." "अबे मी आधी मी उघडया डोळ्यांनीच पाहतो आणि मग क्यामेर्‍याने टीपतो ते". वल्लीचं वाक्य कानावरुन निसटतं गेलं.

अपने होने पे मुझको यकीन आ गया...

लेखक मोदक यांनी बुधवार, 12/12/2012 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
********************************************************************************* सदरचा लेख मिपावर प्रकाशित करण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल सुचेता कडेठाणकर यांचे खास आभार. "महा अनुभव" या मासिकामधून साभार. ********************************************************************************* चीनच्याही पलिकडे आहे मंगोलिया. या देशातल्या गोबीच्या वैराण वाळवंटातून तब्बल सोळाशे किलोमीटर चालून आलीय सुचेता कडेठाणकर. सलग ५२ दिवस चाललेल्या या कष्टप्रद पायपिटीतून ती तावून सुलाखून निघालीय. गोबी हे आशियातलं सर्वाधिक लांबीचं वाळवंट. ते अंतर पायी पार करणं म्हणजे भल्याभल्या गिर्यारोहकांनाही आव्हान वाटतं.

मिट्टी के रंग

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी मंगळवार, 11/12/2012 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
दुनिया बदल गयी, इंसान बदल गये, बदले नही है कभी भी, मिट्टी के रंग.. मिट्टी के रंग.. १९८०-१९९० च्या दशकात जन्माला आलेल्या आणि दुरदर्शन पाहिलेल्या बहुतेकांना ही चाल ओळखीची वाट असणार ह्याची मला खात्री आहे. निखळ 'करमणूक' हा एकमेव 'क' कारान्त उद्देश घेऊन जन्माला आलेल्या दूरदर्शन चा हा सुवर्ण काळ म्हणायला काहीच हरकत नाही. दर्जेदार आणि बालिश कट-कारस्थान रहित मालिका ह्यांचा हा काळ.