Skip to main content

मुक्तक

ती खोली

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 29/01/2013 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
माजघराच्या डाव्या बाजूची ती खोली बंदच असते आजकाल खूप वर्ष झाली त्या खोलीत डोकावून ------- त्या खोलीत एक टोपली आहे जुन्या खेळण्यांनी भरलेली डालडाच्या मोठ्ठ्याश्या डब्यात काठोकाठ भरलेल्या गोट्या आहेत मी जिंकून आणलेल्या फक्त त्यांचे रंग धुसर झाले आहेत आता आरपार रंगीत जग दिसायचे तसे दिसत नाही आताशा ------- बरीच धूळ जमलीये त्या टोपलीवर धुळीखाली ते गर्द निळ्या रंगाचे विमान आहे खर तर एक पंख तुटलाय त्याचा पण जरा जोरात धक्का दिला तर खुरडत खुरडत चालते कधी कधी ------- एक माकडही आहे चावी दिल्यावर इवलासा ढोल वाजवणारे आताही चावी दिल्यावर हातातल्या इटुकल्या काड्या वरखाली करते पण आता काड्यांखालचा तो ढोल तेवढ
काव्यरस

सिद्धोबा

लेखक विसुनाना यांनी शुक्रवार, 25/01/2013 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
मुख्य रस्त्यावर तो कधीच नसतो. थोडं आत वळल्यावर - भर दुपारी अचानक एक हिरवाकंच पाचू सामोरा येतो. मूळ खोड नसणाऱ्या पारंब्यांच्या वडाखाली मोरांचा एक थवा केकारवत फिरतो इकडेतिकडे. तहानलेल्या डोंगराच्या पायथ्याशी एक नितळ झरा आहे, थंडगार! वेळू आणि आमराई वगैरेही- निळंशार आकाश, स्वच्छ मन, निवलेले डोळे, अक्षय शांती- तोच सिद्धोबा! पण थोडं आत वळावं लागतं - स्वतःच्या. कारण मुख्य रस्त्यावर तो कधीच नसतो - तिथे रहदारी असते फक्त. .
काव्यरस

मनमुक्त

लेखक समयांत यांनी मंगळवार, 22/01/2013 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
परिधान केलेला घनक्लांत तो, मनमुक्त बोल उधळत आहे.. जीवाच्या काहिलीने मी शोधत राहतो त्याच्या घनविभोर परिश्रांतीसाठी युगुल युक्त नजारा.... पण दाटून येतो निव्वळ विरहनियुक्त किनारा.. ;) त्याच्या भेटीच्या असोशीने..... n
काव्यरस

आनंदसागर

लेखक श्रिया यांनी मंगळवार, 22/01/2013 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
आपला परमात्म्याशी नित्य आणि शाश्वत संबंध आहे.तो धूसर होऊन ह्या जगातील जीवनास प्रारंभ ती "सुरूवात" आणि परमात्म्याशी पुन्हा नित्य,आनंददायी संबंध प्रस्थापित होणे हा "शेवट" किंवा "मोक्ष".ह्या संकल्पनेवर आधारीत ही रचना आहे. कशी वाटली जरूर सांगा!

सखे ...

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शुक्रवार, 18/01/2013 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
वळणांवळणांवरती सखे तव आठवणींची भरती सखे कसे विस्मरू सांग तुला मी हे श्वास श्वास तुज स्मरती सखे | पाऊस हा घनगर्द सखे अन् तुझ्या मिठीचा गंध सखे कसा सुटावा असा रेशमी तव बाहुंचा बंध सखे रक्तवर्णित तव लज्जित चर्या श्वासा श्वासांवरि भीति सखे अनामिकशा त्या ओढीने रोमांचित तव कांती सखे चिंब चिंब ही तुझी कुंतले चेहर्‍यावरी मम रुळती सखे थेंब थेंब हा तुला स्पर्षता न कळत होई मोती सखे थरथरत्या तव अधरांची मग पडे घट्ट ती मिठी सखे असे गुंतलो एकामेकीं जणु जन्मांतरीची भेटी सखे श्रावणातल्या सायंकाळी मला गवसले मीच सखे विरुन गेले तुझ्यात अलगद सायुज्यता का हीच सखे ही भोगाची उर्मी म्हणु की तल्लीनतेची समाधी सखे
काव्यरस

निरक्षर

लेखक संजय क्षीरसागर यांनी गुरुवार, 17/01/2013 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
कधीही न भेटणार्‍या, पण जिवलग मित्रांची ही स्टोरी. न भेटता (किंवा भेटण्याची शक्यता नसताना) ते जिवलग कसे झाले? ...असले प्रश्न विचारायचे नाही. तो भेटणारच नाही म्हटल्यावर ‘मी येड्यासारखा चालतोय कशाला’? नाही, नाही ते पण विचारायच नाही.... फक्त वाचायच. _________________________________ मुक्कामाचं ठिकाण ठाऊक नाही पण चालयच,... वेड्यासारखं चालायच. आजूबाजूच्या गर्दीला जुमानतय कोण? उन्हातान्हातून वणवण त्यात सावली कुठली बोंबलायला ? आपलीच पावलं म्हटल्यावर झक मारत चालणारच आणि पावलं चालतायत म्हटल्यावर रस्ता न सरून सांगतोय कुणाला? अरे एक सांगायच राहिलं, वाळवंटातनं चालायच....फार मजा येते.

अक्षर

लेखक इनिगोय यांनी शुक्रवार, 11/01/2013 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
मुक्कामाचं ठि़काण ठाऊक नसतानाही चालत होते. आजूबाजूला सगळी अनोळखी गर्दी असतानाही चालत होते. सावलीचा स्पर्श तर कोण जाणे अखेरचा कधी झाला होता! पावलांनी चालायचं इमान सोडलं नाही म्हणून वाट सरत होती. इतकंच. आणि अचानक वाळूत अक्षरं उमटलेली दिसली. ती लिहिणारा हात कोणाचा आहे, हे उरलीसुरली ताकद एकवटून पाहायचा यत्न केला. पण दिसलं काहीच नाही. तरी कुणीतरी आहे असं भासलं. वाळूवरच्या अक्षरांची का होईना सोबत तर लाभली. तळावलेले डोळे कितीतरी काळाने किंचित शांत झाले. नजरेला काहीतरी वेगळं दिसलं. त्या लिहित्या हाताला आपसूकच उत्तर दिलं गेलं. तसंच. वाळूत अक्षरं रेखाटत. आह..!

राधा

लेखक रेशा यांनी मंगळवार, 08/01/2013 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
मोरपीस जणू फिरते तनी, वेणू नाद हा पडता कानी, काहूर मनात, अन हुरहूर आगळी मोहरते आठवता, छबी सावळी थरथरते अधर, लाली गाली किंचित लाज, अधीर नयनी ललना साजिरी, नटली सजली शाम सख्यावर, आणिक भाळली बावरे मन, अन आशा कोवळी मिलनास आसुसली, राधा भोळी पाहून अधीर राधा, बोले सखी "होईल बोभाटा ग गोकुळी!", नयनी पाणी, मिटे पापणी अस्वस्थ राधा,आजही नंदनवनी!!! ... रेघोटी