कोसला २.०
पुण्यात शिकायला आल्यावर होणारा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे पाठीमागे लागणार व्यक्तिमत्व विकास किंवा पर्सनॅलिटी डेवेलपमेंट नावाच प्रकरण. कुठल्याही ब्राम्हण मध्यमवर्गीय घरातून आलेल्या पोराप्रमाणे माझया पण आजूबाजूला असलेल्या लोकांमध्ये शाखेवर जाणार्या, गर्व से कहो हं हिंदू है वाल्या, आय टि त करीयर करून फॉरिन ला जायची आकांक्षा बाळगणार्या आणि जगातील कुठल्याही सर्व चांगल्या गोष्टींबद्दल अपराध गंड बाळगणार्या मुलांचा भरणा होता. मी एकंदरच या सगळ्यांनमध्ये मिसफिट होतो.
हिंदू असण्याची लाज जरी नसली तरी अभिमान त्याहून पण नव्हता. आय टि मध्ये जायची इच्छा आणि कुवत पण गैरहजर होति.
मिसळपाव