Skip to main content

मुक्तक

देवाला रिटायर करण शक्य नाही

लेखक राजघराणं यांनी गुरुवार, 15/11/2012 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
कोणी तरी म्हटलं देवाला आता रिटायर करा मी म्हणालो नस्त्या भानगडी कशाला ? रिटायर करायला आधी त्याला कामावर कोण ठेविल ? अन्स्किल्ड लेबर ला अजकाल जॉब नाय भेटत भाउ. साधे भुकंप आणी वादळ ज्याला थांबवता येत नाहीत. आपत्ती देवाच्या कोपाने होते हे भाव थोपवता येत नाहीत त्याच्याविरुद्ध कोणी वागला तर ज्याच्या भावना काबूत रहात नाहीत असल्या मत्सरी देवाला आपण नाय कामावर ठेवणार माणुसकीच ग्रॅज्युएशन नापास झालेल्याला कोण दील काम ? त्यात पास व्हायला आधी तर्काची शाळा पास व्हावी लागते भौ दोन जमातींचे देव वेगळे असू शकत नाहीत एव्हढही त्याला कळत नाही काफिर आणी दलितांना जन्म देणारा तो महामूर्ख स्वतःच्याच हाताने हीन द
काव्यरस

उडत्या तबकड्यांचे गूढ आणि सैन्य दलातील भोळसटपणा

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 06/11/2012 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
चीनच्या सरहद्दीजवळ उडत्या तबकड्यांचे गूढ आणि सैन्य दलातील भोळसटपणा उडत्या तबकड्या किंवा आकाशात (बातमी नुसार) 3 ते 5 तास तरंगत राहणाऱ्या त्या अज्ञात वस्तू वस्तुतः मानवी मनाचे खेळ असतात. अशा खोट्या वस्तूंचे अस्तित्व भारतीय लष्कराने मान्य करणाऱे रिपोर्ट्स वरिष्ठांना पाठवले ही बातमी वाचून भारतीय सैन्य दलात अजूनही किती अंधश्रद्धा आहेत याचे प्रत्यक्ष प्रमाण मिळते. बातमी नुसार संरक्षण खात्यातील वैज्ञानिक संशोधन करणाऱ्या संस्थांना देखील 'काय आहे काही सांगता येत नाही' असे म्हणावे लागणे म्हणजे विज्ञानिक दृष्टीला आव्हान आहे.

त्याचीच.. अटॅचमेंट (नवी बाजू).

लेखक इनिगोय यांनी गुरुवार, 01/11/2012 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
गुंतून राहणं चांगलं की गुंतल्यानंतरही वेळ येईल तेव्हा शांतपणे विलग होणं चांगलं यावर जे बोलणं झालं त्यातून त्याची डिटॅचमेंट हे प्रकटन याआधी लिहिलं गेलं. निसर्ग हा इतका जिवंत, इतका व्हर्सटाईल आहे, की प्रत्येकाला तो वेगळा दिसतो, नवं काही देतो. लेखावर आलेल्या प्रतिसादांमधूनही हेच जाणवलं. अनेकांनी त्यांना जाणवलेल्या - पटलेल्या आणि न पटलेल्या - गोष्टी तिथे मांडल्या. ही मूळ चर्चा ज्यांच्याशी झाली, त्यांनाही तो जसा जाणवला तसा..

शुक्रतारा ....मंदवारा ... नाबाद ५० वर्षे

लेखक चौकटराजा यांनी बुधवार, 31/10/2012 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
शुक्रतारा मंदवारा या गाण्याला जन्मून ५० वर्षे झाली. आज ही हे गीत आजच्या तरूण पिढीत लोकप्रिय आहे. आणि आठवण म्हणून म्हातार्‍या-कोतार्‍यातही. एक समर्थ भावगीत गायक म्हणून या गीताने अरूण दाते ( खरे अरविन्द दाते ) याना ओळख मिळवून दिली.सुधा मलहोत्रा यांचा मधाळ आवाज मराठी गानससिकाना परिचित झाला तो ही याच गाण्याने. त्यावेळी आकाशवाणी मुंब्ई केंद्रावर जे लोक नोकरीस होते त्यांची सांस्कृतिक चंगळच होती. नीलम प्रभू.

मनास वाटे -

लेखक विदेश यांनी बुधवार, 31/10/2012 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
. . मनास वाटे उगाच वाटे उदास वाटे भकास वाटे मनात वारे उगाच सारे भलते सारे गोळा सारे मनात काय उगाच काय भलते काय वाटते काय मनास नाही उमगत काही भलते प्रवाही वहातच राही ! .
काव्यरस

त्याची डिटॅचमेंट

लेखक इनिगोय यांनी सोमवार, 29/10/2012 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तरार्ध काही दिवसांपूर्वी "अटॅचमेंटमधली वेदना आणि डिटॅचमेंटमधला आनंद" याबद्दल झालेली चर्चा या छोट्याशा स्फूटाला कारणीभूत ठरली. ---------------------------------------------------------------------------- प्रिय, निसर्गाचा सगळा प्रवास डिटॅचमेंटकडे सुरू असतो, नाही का? वाळलेली पानं, फळलेला मोहोर, निगुतीने बांधलेली घरटी, मोठी झालेली पिल्लं, बरसून रिकामे झालेले ढग, कशातही गुंतून राहत नाही तो. आणि तरी सतत नव्याने प्रसन्न दिसत राहतो. 'समर्पयामि' हे माणसाला म्हणावं लागतं. तर कधी 'पुरे झालं आता' असं बजावायला लागतं.

इतकच!

लेखक जेनी... यांनी बुधवार, 24/10/2012 02:47 या दिवशी प्रकाशित केले.
भावनांच्या आधारे केलेले वार सगळेच रिकामे नव्हते, जखमा भरुन यायला वेळ लागला इतकच ! 'हळव्या' शब्दालाहि हसण्यामागे अर्थहिन बनवलं, हसरि म्हणुन मिरवलं इतकच! मनात का कोण जाणे, बरच दडलं होतं ,लाव्हाच थोडक्यात, कधीतरी आसवानी मदत केली इतकच! नातं काहिच नव्हतं, तरिहि आपल्यात बरच काहि, मी बहुतेक जपलं इतकच!
काव्यरस

खबरदारी -

लेखक विदेश यांनी मंगळवार, 09/10/2012 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
तुला असे मुळूमुळू रडतांना पाहून, मी थोडातरी विरघळेन, असे वाटले असेल तुला - माझ्या य:कश्चित जिवासाठी तू तुझे हे अनमोल अश्रू ढाळतेस... माझ्या रुक्ष चेहऱ्यावर जाऊ नकोस माझ्या कठोर काळजातही ते अश्रू जपून साठवताना - माझी किती तारांबळ होत आहे हे तुला न दिसण्याची मी खबरदारी घेत आहे ! .
काव्यरस

देव नाही देवळात

लेखक विदेश यांनी रविवार, 30/09/2012 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
देव आहे, का देव नाहीच ! एक शंका घुटमळणारी, सदैव मनाला पोखरत आहे - देवळाबाहेर लंगडा माणूस एका आंधळ्याच्या ताटलीत आदबीने जवळचे नाणे टाकत आहे - हे असे का, ते तसे का अपंग नसतांना माझे मन पंगु बनायला सरावत आहे - देव जवळून गेला तरीही रांगेतल्या लोकांसोबत आस्तिक-नास्तिक चर्चा रंगत आहे ! .
काव्यरस