नौदलातील आयुष्य -२
ही विक्रांत वरील सत्य गोष्ट आहे.
१९९० सालच्या मे महिन्यातील. आम्ही गोव्याच्या आसपास समुद्रात युद्ध सराव करीत होतो.
एकदा दुपारी १२.३० ते १३.३० अशा जेवणाच्या वेळेत मी जेवून आमच्या विक्रांतच्या ब्लू रूम मध्ये बडीशेप चघळत होतो तेंव्हा नौदल पोलिस अधिकारी उमेश चंद्रा माझ्या बाजूला बसला होता. दीड वाजण्याच्या ५-१० मिनिटे अगोदर तो मला म्हणाला एका मूर्ख सैनिकाची शिस्तभंग कारवाई करायची आहे तेंव्हा मी आता निघतो. मी त्याला सहज विचारले काय केस आहे? तो म्हणाला एक बिनतारी विभागाचा सैनिक विचित्रपणे वागतो आणि काम नीट करीत नाही. मी विचारले काय करतो.
मिसळपाव