"धन्या, अध्यात्मात खरंच ईतकी ताकद असते का रे?" ध्यानीमनी नसताना हा प्रश्न धाडकन कानावर आदळला आणि मी गोंधळून गेलो.
"किस्ना, फोकन्या कोण चावला बे तुला? मी केव्हाचा वाट पाहतोय की हा वल्ली आता काहीतरी या लेण्यांमधील चित्रांबद्दल माहिती सांगेल, नंतर काहीतरी बोलेल. पण हा बावा केव्हापासून त्या क्यामेर्याच्या लेन्समध्ये डोळा मारत बसला आहे. देव जाणे कधी काही उघडया डोळयांनी पाहतो की जे पाहायचं ते क्यामेर्याच्या लेन्समधूनच असं ठरवलं आहे."
"अबे मी आधी मी उघडया डोळ्यांनीच पाहतो आणि मग क्यामेर्याने टीपतो ते". वल्लीचं वाक्य कानावरुन निसटतं गेलं. निसटतं एव्हढयासाठी की त्यानंतर मला वल्ली काय म्हणतो आहे हे ऐकण्यापेक्षा किस्नाच्या चेहर्यावरील हळूहळू चढत जाणारा रागाचा पारा पाहणं जास्त विंट्रेष्टींग वाटत होतं. आताही तेच झालं होतं. माझ्या "फोकन्या" या संबोधनाने किस्नाला पुरेशी किल्ली दिली होती. आमच्या या सभ्य मित्राला अशा वावग्या शब्दांचं खुप वावडं आहे. आधीच मी गाडीत शिंदे बंधूंचं एक लोकगीत ऐकवून त्याच्या सहनशीलतेचा अंत पाहीला होता. त्या गाण्यात तसं आक्षेप घेण्यासारखं काहीच नव्हतं. एक बाई शेजारच्या गावाला बाजाराला जातात, अचानक पाउस चालू होतो आणि मग परतताना गावच्या वाटेवर असणार्या ओढयाला बर्यापैकी पाणी येतं तेव्हा कुणीतरी तिला ओढा कसा ओलांडाल हे सांगतं याचं वर्णन त्या गाण्यात होतं. नाही आवडलं या पठठयाला. शेवटी ते गाणं बदलावं लागलं. असो.
आताही चेहरा शक्य तेव्हढा कोरा करत मी विचारलं, "तुला कुणी सांगितलं की मला अध्यात्मामधलं काही कळतं?"
"अरे तू एव्हढं वाचन करतोस, आपल्या एव्हढया चर्चा होतात तेव्हा तू समजावून सांगतोस ते काय तुला त्यातलं काही कळत असल्याशिवाय?"
"किस्ना, अध्यात्मावर वाचन करणं, त्यावर चर्चा करणं आणि अध्यात्माची ओढ असणं, ते तसे अनुभव घेणं या वेगळ्या गोष्टी आहेत. मी भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरी पुर्ण वाचलेली नाही. मी बुद्धाचं धम्मपदही पुर्ण वाचलेलं नाही. हे ग्रंथांमधले संदर्भ मी केवळ कुणाशीतरी वाद घालण्यासाठी किंवा एखादया चर्चेत माझं पांडीत्य पाजळण्यासाठी वापरतो. त्यामुळे तू जे काही विचारणार आहेस त्याचं उत्तर देणं मला जमेलच असं नाही."
"असू दे ना. तू प्रयत्न तर कर. नाही पटलं तरी हरकत नाही."
"ओक्के. गो अहेड" मी अक्कल पाजळायला तयार झालो.
"ही समोरची बुद्धाची मूर्ती दिसतेय? तिच्या चेहर्यावरचे भाव बघ. किती शांत आहेत. अर्थात ही मूर्ती हे केवळ प्रतिक आहे. पण बुद्धही असाच शांत चेहर्याने वावरत असणार म्हणून तर मूर्तीकाराने तसे शांत भाव रेखाटले ना."
"अर्थातच."
"मग मला एक सांग, बुद्धासारख्या पूर्वाश्रमीच्या एका राजपुत्राला जी मनःशांती राजवाड्यात मिळाली नाही ती त्याला जंगलात एका पिंपळाच्या झाडाखाली मिळाली. खरंच अध्यात्मात एव्हढी ताकद असते का?"
"किस्ना, माझ्या अल्पमतीनुसार बोलायचं झालं तर अध्यात्म माणसाला त्याची स्वत:ची खरी ओळख करुन देतं. अध्यात्म माणसाला "मी कोण आहे" या सनातन प्रश्नाचं उत्तर देतं. आणि एकदा का हे उत्तर मिळालं माणसाचं मीपण गळून जातं. तुला ती बोरकरांची कविता माहिती असेलच, जीवन त्यांना कळले हो… मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो..."
"अरे पण मग आपल्या आजूबाजूला अशी कितीतरी माणसं असतात जी स्वतःला अध्यात्माच्या क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती समजतात. पण जरा कुठे काही त्यांच्या मनाविरुद्ध झालं की आकाश पाताळ एक करतात."
"ज्ञानदेवाने नऊ हजार ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहिली, पण पठठ्याने एका अक्षराने कुठे म्हटलं नाही की मी या ग्रंथाचा कर्ता आहे. जे काही केलं ते माझ्या सद्गगुरुंच्या आशिर्वादाने झालं असं तो जागोजागी म्हणतो. 'शके बाराशे बारोत्तरे, टीका केली ज्ञानेश्वरे' ही ओवी प्रक्षिप्त समजली जाते."
"मग आजचे अध्यात्मावर लेखन करणारे, स्वतःला अध्यात्माच्या क्षेत्रातील अधिकारी, बुद्धाच्या शुन्यवादावर भाष्य करणारे काही लेखक सतत म ची बाराखडी का म्हणत असतात? विरोधी मताला सामोरं जाताना त्यांचा तोल का जतो?"
"मित्रा, त्याचा अर्थ त्यांना अध्यात्म कळलंच नाही हा होतो."
"तू जर एव्हढं सगळं कळतं तर तुला अध्यात्म कळतं असाच त्याचा अर्थ होत नाही का?"
"दादा, मी जेव्हा स्वारगेटला बस स्टँडला जातो तेव्हा मुंबईला जाणार्या बसवरचा बोर्ड वाचून मी स्टँडवर उभा राहूनच तुला सांगू शकतो की ती गाडी मुंबईला जाणार आहे. इन फॅक्ट लिहता वाचता येणारा कुणीही ते करु शकतो. पण मुंबईला जाण्यासाठी मला गाडीत बसावं लागेल. आणि एकदा गाडी बसलो की फार फार तर गाडी सुटता सुटता तुझ्याशी दोन चार वाक्य बोलेन, टाटा बाय बाय करेन. पण एकदा गाडी सुटली की मी माझ्या प्रवासाला निघालो असेल. अध्यात्माचंही असंच आहे. मी आता हे जे काही बोलतोय हे केवळ मला बोर्ड वाचता येतोय म्हणून केलेली बडबड आहे. एकदा माझा अध्यात्माचा प्रवास सुरु झाला की मी तुझ्याशी फुटकळ वाद घालायला इथे थांबणार नाही. मला मुंबईला पोहचायचे वेध लागलेले असतील."
वाचने
15648
प्रतिक्रिया
91
मिसळपाव
प्रतिक्रिया
कशी प्रतिक्रिया अपेक्षित आहे
तुम्हाला जशी प्रतिक्रिया
In reply to कशी प्रतिक्रिया अपेक्षित आहे by जेनी...
बरं झालं हं सांगितलत ते ...
In reply to तुम्हाला जशी प्रतिक्रिया by धन्या
_/\_
पुढचं "पुनरागमनाय च" राहिलं
In reply to _/\_ by पैसा
हिहिहि एकदम समत
In reply to पुढचं "पुनरागमनाय च" राहिलं by बॅटमॅन
पै बै कोणचा शब्द अॅडवलास गो
In reply to _/\_ by पैसा
त्यानंतर
In reply to पै बै कोणचा शब्द अॅडवलास गो by जेनी...
इश्श्श्य ... हे काय सासुबै ??
In reply to त्यानंतर by पैसा
मस्त!
बरेचदा विचार करते आणि वाटते
बरेचदा विचार करते आणि वाटते
In reply to बरेचदा विचार करते आणि वाटते by शुचि
@याचं उत्तर भगवद्गीतेत आहे.
In reply to बरेचदा विचार करते आणि वाटते by धन्या
आत्म्यांना मोक्ष कधी मिळतो?
In reply to @याचं उत्तर भगवद्गीतेत आहे. by अत्रुप्त आत्मा
आत्मा अमर आहे
In reply to आत्म्यांना मोक्ष कधी मिळतो? by प्रचेतस
आत्मा अमर आहे
In reply to आत्मा अमर आहे by पैसा
:)
In reply to आत्मा अमर आहे by पैसा
@तृप्ती ही मोक्षाकडे जाणारी
In reply to आत्म्यांना मोक्ष कधी मिळतो? by प्रचेतस
झटक्यात ठिकाण गाठलात.
मस्त रे
>>हीच जर एकरूपता असेल तर
In reply to मस्त रे by प्रचेतस
>>आपण किती आध्यात्मिक आहोत हे
In reply to >>हीच जर एकरूपता असेल तर by सूड
नाही सूड...
In reply to >>हीच जर एकरूपता असेल तर by सूड
++१. अनुभव महत्वाचा.
In reply to नाही सूड... by धन्या
एकदा त्या भाषेची ओळख झाली की
In reply to नाही सूड... by धन्या
पटेश
म्हणजे आता किसना पिंपळाच्या
(No subject)
In reply to म्हणजे आता किसना पिंपळाच्या by सूड
असभ्य काय त्यात?
In reply to म्हणजे आता किसना पिंपळाच्या by सूड
झकास! अगदी नेमकं.
कसं काय इतकं कठीण लिहायला
अध्यात्मिक वातावरणात
अध्यात्मावरील लेखातील वाक्य
बेक्कार हसतोय राव...
In reply to अध्यात्मावरील लेखातील वाक्य by संपत
अजुन काही प्रश्न बाकी राहिले
मस्त
:)
संजय साहेब तुम्हि लवकरात लवकर
आपले सदस्यनाम पाहून अंमळ हळवा
In reply to संजय साहेब तुम्हि लवकरात लवकर by शरदिनीआप्त
नवीन डीयअाडू?
In reply to आपले सदस्यनाम पाहून अंमळ हळवा by बॅटमॅन
कैकीब्वॉ पण नाव बाकी जब्रा
In reply to नवीन डीयअाडू? by इनिगोय
....लईच अध्यात्मिक !!!
@शाम थोडा थोडा लेनेका क्रिपा
In reply to ....लईच अध्यात्मिक !!! by मालोजीराव
:)
+१
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहीच रे धन्या
आवडेश..
यावरुन
आठवण...
सुंदर..
मला मूळात किस्नाचा प्रश्नच
अनुमोदन
In reply to मला मूळात किस्नाचा प्रश्नच by कवितानागेश
आ???
In reply to मला मूळात किस्नाचा प्रश्नच by कवितानागेश
धन्या मुंबईला का चाललाय ते
In reply to आ??? by पैसा
(No subject)
In reply to धन्या मुंबईला का चाललाय ते by कवितानागेश
ऐला,
In reply to धन्या मुंबईला का चाललाय ते by कवितानागेश
तू तर ठाण्यात आहेस.
In reply to ऐला, by पैसा
धन्या मुंबईला का चाललाय ते
In reply to तू तर ठाण्यात आहेस. by किसन शिंदे
समजा मी उत्तरे दिलीच तरी मला
In reply to ऐला, by पैसा
नाय ब्वॉ
In reply to समजा मी उत्तरे दिलीच तरी मला by कवितानागेश
२५ पैसे कुठे मिळाले ओ
In reply to समजा मी उत्तरे दिलीच तरी मला by कवितानागेश
कुणाची पावली पडली होती
In reply to २५ पैसे कुठे मिळाले ओ by सस्नेह
कुणाची पावली पडली होती
In reply to कुणाची पावली पडली होती by इनिगोय
एका गुरुंचा आश्रम असतो.
In reply to कुणाची पावली पडली होती by किसन शिंदे
कुठे असतात हे गुरुजी सध्या?
In reply to एका गुरुंचा आश्रम असतो. by धन्या
इथले भोगायचे भोग भोगून
In reply to कुठे असतात हे गुरुजी सध्या? by इनिगोय
ह्या धाग्यातल्या
In reply to इथले भोगायचे भोग भोगून by धन्या
धाग्याचा खफ केल्याबद्दल
अजाण बालका
In reply to धाग्याचा खफ केल्याबद्दल by स्पा
माझं "मला कुणीतरी सांगितलं की
In reply to अजाण बालका by पैसा
हं
In reply to माझं "मला कुणीतरी सांगितलं की by धन्या
मुळात 'मुंबई'त पोचल्यावर ऐश
In reply to हं by पैसा
@मुंबै पुणे वाद सुरु नाही
In reply to माझं "मला कुणीतरी सांगितलं की by धन्या
अरेरे...
@आता पुणे म्हणजे आत्मा किंवा
In reply to अरेरे... by धन्या
धन्या,
हाहाहा... हसून हसून पुरेवाट
-
छान
ई-ज्ञानेश्वरीच्या दुव्यासाठी
In reply to छान by प्रसाद गोडबोले
खरे घर ते
In reply to छान by प्रसाद गोडबोले
धन्याराव, तुम्हारा चुक्याच
मस्त...
In reply to धन्याराव, तुम्हारा चुक्याच by राजेश घासकडवी
रोचक.
आज
(No subject)
In reply to आज by प्रसाद गोडबोले
"दादा, मी जेव्हा स्वारगेटला
@हे सर्वात आवडले आणि पटले >>>
In reply to "दादा, मी जेव्हा स्वारगेटला by स्पा
बरेचदा विचार करते आणि वाटते
आपल्या आसपास जे बिलियनेर,