मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिट्टी के रंग

कॅप्टन जॅक स्पॅरो · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
दुनिया बदल गयी, इंसान बदल गये, बदले नही है कभी भी, मिट्टी के रंग.. मिट्टी के रंग.. १९८०-१९९० च्या दशकात जन्माला आलेल्या आणि दुरदर्शन पाहिलेल्या बहुतेकांना ही चाल ओळखीची वाट असणार ह्याची मला खात्री आहे. निखळ 'करमणूक' हा एकमेव 'क' कारान्त उद्देश घेऊन जन्माला आलेल्या दूरदर्शन चा हा सुवर्ण काळ म्हणायला काहीच हरकत नाही. दर्जेदार आणि बालिश कट-कारस्थान रहित मालिका ह्यांचा हा काळ. कशिश,सर्कस, व्यॉमकेश बक्षी, मिट्टी के रंग, रिपोर्टर, सुरभि, इधर-उधर, मालगुडी डेज़, बुनियाद, पोटली वाले बाबा, सुराग, चंद्रकांता, स्ट्रीट हॉकस, नाइट रायडर्स आणि देख भाई देख ह्यांच्यासारख्या दर्जेदार मालिकांमधून लोकांचे प्रामाणिक मनोरंजन करायचा प्रयत्न करणार्‍या दिग्दर्शकांची त्या वेळी चलती होती. साधेपणा, मनाला भिडणारी गोष्ट, सुमधुर संगीत आणि दर्जेदार कलाकार ह्या गोष्टींवर प्रसिद्ध होणार्‍या मालिका ह्यांची त्या काळी सामान्य प्रेक्षकाला भुरळ पडली होती. स्लीवलेस, बॅकलेस ब्लाऊज घालून दर श्वासागणिक नवी नवी कारस्थाने रचणार्या व्याम्प ची डोकेदुखी यायच्या आधीचा हा काळ आठवला की मस्त वाटत. ह्यातल्या काही मालिका मी कधीही विसरू शकणार नाही. आर. के. लक्ष्मण ह्यांच्या मालगुडी डेजच नाव घेतल्याशिवाय मी पुढे लिहु शकणार नाही. स्वामी आणि त्याच्या मित्रांचे उद्योग पहायसाठी जीव टाकायचो मे तेव्हा. आताही कधी डी.व्हि.डि. वर मालगुडी डेज पाहतो तेव्हा परत लहान व्हावस वाटत. हल्लीच्या रियालिटी शो च्या होस्ट चा खोटा ओढून ताणून केलेला अभिनय कुठे आणि अमुल सुरभी च्या सुरुवातीला सिद्दार्थ काक आणि रेणुका शहाणे ह्यांचे प्रसन्न स्मितहास्य आणि एकदम एस्टाईल मधे केलेला नमस्कार ह्यांची तुलनाच होऊ शकत नाही. कशिश तर मी अगदी लहान असताना लागायची. प्रेम काय आहे हे समजायचे वय नसताना सुद्धा ती आवडायची. मालविका तिवारी आणि सुदेश बेरी ह्यानी फक्त १३ भागांमधे ही मालिका रंगवली होती. शाहरूख खान आणि सुरभी कन्या रेणुका शहाणे ह्यांची सर्कस पण मस्त होती. चंद्रकांता च्या तर जवळपास प्रेमातच पडलो होतो. त्यामधे पण चंद्रकांता पेक्षा राजकुमार विरेन्द्र, महाराजा शिव-दत्त, सभ्या दासी, चंद्रकांता च कबुतर, त्या काळातही कमांडो ट्रेनिंग दिल्यासारखा वागणारा बदरीनाथ हे विशेष आठवतात. क्रूरसिंग आणि त्याच्या दोन चेल्यांची याकककु करायची ढब शाळेत मस्ती करताना उपयोगी पडायची. आत्ता आत्ता दूरदर्शन नी ह्याच सीरियल ची चंद्रमुखी नावाची भ्रष्ट आवृत्ती काढली. व्यॉमकेश बक्षी विशेष आवडायची नाही तेव्हा, पण जरा १०~१२ वर्षाचा झाल्यावर आणि ती सीरियल संपून गेल्यावर आपण एक चांगली गोष्ट मिस केली ह्याची रूख-रूख लागून राहिली होती. सुराग बघताना तर चक्क मी आणि माझे बाबा पैज लावायचो कोण गुन्हेगार असेल ह्याच्यावर आणि बहुतेक वेळा दोघही हारायचो ही बात अलाहिदा. सुदेश बेरीचा इन्स्पेक्टर भारत आणि त्याचा पार्ट्नर सब-इन्स्पेक्टर श्रिवास्तव मुळे मला तेव्हा पोलिस बनायची स्वप्न पडायची हे ही आठवतय. त्या वेळेला केबल नसल्यामुळे सी. आय. डी. बघायला मिळायचे नाही, त्यामुळे पोलिस कसे नसावेत ह्यासे धडे मिळाले नव्हते. ;) मिट्टी के रंग तर त्याकाळची सगळ्यात लाजवाब मालिका होती. गरीब पण प्रामाणिक माणूस परिस्थीतीने कसा पिचला जातो ह्याचे चित्रण ह्यामधून असायचे. प्रत्येक आठवड्यात नवीन 'आम आदमी की कहानी' घेऊन ही मनावर राज्य करायची. ह्याच्यामधले दोन भाग तर मी मरेपर्यंत विसरू शकणार नाही. ताविज नावाचा एक भाग बघून माझ्या डोळ्यात पाणी आल होत. एका वाळूत हरवलेल्या चमच्यासाठी एका आणत मुलाला मरेपर्यंत मारणार्‍या त्या जोडप्याला पाहून संताप आला होता. त्याच्याच शेवटी त्याच्या आईची एकमेव आठवण असलेला त्याचा ताविज ह्या गडबडीमधे हरवून जातो आणि तो शोधण्यासाठी तो चक्क समुद्रात शिरतो आणि तिथेच तो भाग संपतो. त्याला तो ताविज मिळतो का?, त्या मुलाच पुढ काय होत? असे असंख्य प्रश्ण मनाला हूरहुर लावून जातात. अजुन एक भाग म्हणजे 'बस स्टॉप की थंडी रात' नावाचा होता. त्याची गोष्ट सांगयसाठी एक वेगळा टॉपिक नक्की काढीन मी. चार ओळींमधे त्यामधला खोलावा येणा अशक्य आहे. ह्या मस्त मालिका सोडल्या तर शुक्रवारी आणि शनिवारी रात्री हिंदी पिकचर लागायचे. ३ तासाचे पिक्चर जाहिराती मुळे चक्का ४-४ तास चालायचे. रविवार दुपारी चार वाजता मराठी पिक्चर लागायचा (रटाळ असायचे पण दुसरा पर्याय नसायचा). स्ट्रीट हॉकस आणि नाइट रायडर पण बहुतेक शुक्रवार शनिवार ला पिक्चर च्या आधी लागायचा अस मला वाटत आहे. काही जाहिराती सुद्धा मस्त असायच्या. त्यांचे दुवे खाली देत आहेच. पुरब से सूर्य उगा, पंडित भीमसेन जोशींच मिले सूर मेरा तुम्हारा, विको इत्यादी. मिले सूर मेरा तुम्हारा पंडितजींच्या धिरगंभीर आणि वजनदार आवाजात म्हणायचा प्रयत्न मी आणि माझा मामे भाऊ करायचो आणि नंतर जास्त वेळ बाहेर खेळायला परवानगी मिळत असे. १९९५ पासून बहुतेक दूरदर्शन ला उतरती कळा लागली. खासगी वाहिन्यांच्या स्पर्धेत टिकायच्या उद्देशानि म्हणा किंवा जाहिरतींसाठी म्हणा दूरदर्शन मधे केकता कपूर टाईप मालिकांनी प्रवेश केला आणि आधीच्या सर्व चांगल्या परंपरांच वाटोळ झाल. मालिकांची लांबी वाढतच गेली. ३२ भागात संपणार्‍या मालिका ३२०० भागात कशा पाणी घालून चालवता येतील ह्याचा विचार होऊ लागला. ह्याची सुरूवात केली मराठी मालिकांमधील दामिनी ह्या मालिकेने. मुख्य पत्र मेल्यावरही चक्क ५-६ वर्ष चालू होती ही मालिका. हिंदी मधली पहिली लांब लचक मालिका माझ्या आठवणी प्रमाणे शांती ही होती. मन्दिरा बेदी ची पहिलीच मालिका होती ती बहुतेक. अश्या वाढत जाणार्‍या मालिकांचा कंटाळा येऊन मी नंतर नंतर टी.व्ही. पाहाण जवळ जवळ बंद केला होता. चक्क ८-१० वर्ष मी बातम्या सोडून आणि क्वचित कधीतरी रविवार चा मराठी पिक्चर सोडून टी.व्ही. पहिला नाही. नंतर २००८ नंतर कधीतरी घरी आई-बाबांसाठी म्हणून टाटा स्काय घेतल. मग हळू हळू क्वचित टी.व्ही. पाहाण होऊ लागला. सि.आय.डी. चे जोक्स समजायला लागले. पण तरीपण जुन्या मालिकांची म्हणा किंवा एकूणच दूरदर्शन विषयी जो आपलेपणा वाटायचा तो काही वाटत नाही. नाही म्हणायला इथेही एका लग्नाची दुसरी गोष्ट, उंच माझा झोका, मला सासू हवी अश्या चांगल्या मालिका होत्या किवा आहेतच. पण त्या बघायला हल्ली वेळ मिळत नाही. :(. जेव्हा वेळ असतो आणि मी चुकुन घरामधे असतो तेव्हा मात्र नेमक्या अजुन चांदारात आहे, अक्कासाहेबानचा फेरा, तू तिथे मी असल्या भंगार गोष्टी चालू असतात. :(. असो. जुना ते सोन हे नक्कीच खर आहे. होप कधीतरी आधीसारख्या दर्जेदार मालिकांचा काळ येईल अशी प्रार्थना करूयात. :). https://www.youtube.com/watch?v=ekvevq_ipaI&feature=fvst _____________________________________________________________________________________ लिहायचा पहिलाच प्रयत्न आहे. गोड मानून घ्यावा अशी नम्र विनंती. काही चुकल-माकल असेल तर माफी असावी.

वाचने 8424 वाचनखूण प्रतिक्रिया 35

पियुशा 11/12/2012 - 10:18
मला जास्ती काही आठ्वत नाहीये पण "देख भाइ देख" ही सिरियल आठ्वतेय धम्माल होती एकदम हम पांच पण धम्माल होती . निखळ मनोरंजन अगदी :) आमच्या आइ बाबांच्या तोंडुन "मुंगेरीलाल के हसिन सपने " , " दाणे अनार के " , " " बुनियाद" अशा मालिकाचे कौतुक मात्र एइकले आहे :)

परिकथेतील राजकुमार 11/12/2012 - 10:23
माफ करा पण पहिल्या दोन ओळी वाचूनच वाचणे थांबवले. तेच तेच आणी तेच.... प्रत्येक संस्थळावरती ह्या विषयावरती आजवर १००० वेळा लिखाण झाले असेल.

In reply to by परिकथेतील राजकुमार

कॅप्टन जॅक स्पॅरो 11/12/2012 - 18:07
असु दे. असु दे. काही हरकत नाही. पुढ्च्या वेळेला लिहिन तेव्हा नक्किच काहीतरी चान्गाले लिहिन ह्याची खात्री बाळगा. :). धन्यवाद. :)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

तिमा 11/12/2012 - 19:03
तुमच्या आयडी तले शुद्धलेखन जरा दुरुस्त करुन घ्या ना प्लीज! उगाचच, 'वा' वरची वेलांटी गळून पडलीये असं वाटतं!

अत्रुप्त आत्मा 11/12/2012 - 10:29
देख भाई देख,रजनी,देखो मगर प्यार से... अशा बअ‍ॅयाच मालिका रविवारी सकाळपासुन असायच्या...आणखि नावं अठवत नाहियेत... टाक रे कुणितरी

In reply to by अत्रुप्त आत्मा

मोदक 11/12/2012 - 11:17
१९९० चे दशक... कॅप्टन व्योम, द थ्री स्टूजेस, डेनिस द मेनेस, इ ड्रीम ऑफ जिनी, चंद्रकांता आणि तहकिकात... रेव्हन नावाची एक डब केलेली डिटेक्टीव्ह मालिका बघितली होती. मूळ इंग्रजी आवृत्ती अफाट होती त्याला हिंदी सबटाईटल्स चिकटवली होती. भारी जमले होते ते सगळे. ती मालिका पाहून सुदेश बेरी, गाजर खाणारा एक कोणीतरी इन्स्पेक्टर वगैरे मंडंळी हद्दपार झाली.. तहकिकात त्यातल्या त्यात सुसह्य वाटली होती. आहट चे सुरूवातीचे भाग आठवताहेत का कुणाला? निर्बुद्ध हॉरर कडे वळण्याआधी खराखुरा सस्पेन्स आणि थ्रिलर असणारे काही अप्रतीम सिरीज होत्या. तुषार दळवीने रंगवलेला एक हार्ट सर्जन, त्याच्या एका श्रीमंत पेशंटची हार्ट ट्रान्स्प्लांटची शस्रक्रिया आणि त्या ट्रान्स्प्लांट होणार्‍या हार्टचे मशीनसकट अपहरण, खंडणी.. हा एपीसोड तर अजून आठवतो.

In reply to by मोदक

पियुशा 11/12/2012 - 11:33
येस्स आय ड्रीम ऑफ जिनी माय फेव्हरेट त्यातली ती निळ्या डोळ्यांची सुंदर जीनी ,तिच्या करामतीने वैतागलेला तीचा मालक jini "मोगली "हे अत्यंत आवडत पात्र कस विसरणार

पियुशा 11/12/2012 - 10:35
ती स्याम डीसील्वाची डेटेक्टिव्ह सिरियल कोणती होती तीच नाव आठ्वत नाहीये ,शांती आठ्वतेय , स्वाभिमान पण आठ्वतेय

In reply to by पियुशा

श्रीरंग_जोशी 11/12/2012 - 11:05
जब जब कोई खून होता हैं, कत्ल होता हैं, जो रात के सायें में चलता हैं, दिन के उजालें में छिपता हैं तब शुरू होती हैं, तहकीकात!! हम यहाँ तहकीकात करने आयें है. विजय आनंद (सॅम डी सिल्वा) व सौरभ शुक्ला (गोपी) या जोडीने खिळवून ठेवले होते. एका भागात तर दादामुनी पण होते. १९९४ च्या उन्ह्याळ्यात सुरू झालेली एक अप्रतिम मालिका. त्यावर्षी सोमवारी शेखर सुमनची रिपोर्टर, मंगळवारी तहकिकात, गुरुवारी सतीश शाहची पी ए साब. एकाहून एक मालिका होत्या दूरदर्शनवर.

In reply to by श्रीरंग_जोशी

हंस 11/12/2012 - 11:22
मी पण हेच टंकायला आलो होतो, ह्याच बरोबर गुल गुलशन गुलफाम, दुसरा केवल, नुक्कड, हम लोग, मराठीमध्ये संघर्ष, रजनी, अशा एक से एक मालिका होत्या.

In reply to by पियुशा

अभ्या.. 12/12/2012 - 03:49
एक पल है जिंदगी. एक पल कुछ भी नही श्वेता शेट्टीचे हे स्वाभिमानी गाणे सुरु झाले की आम्ही वह्यापुस्तके आवरायला लागत होतो. वर्गाच्या माग्च्या घरातून एकू यायचे ते दुपारी. स्वाभिमानची बरीच गँग नंतर फिल्मात आली. मनोज वाजपेयी, आशुतोष राणा, हे तेव्हाचे साईड होते. मात्र स्वेतलाना: कौशल्या (किट्टू) गिडवानी आणि रिषभ: रोहित रॉय हे मेन रोलमधले मात्र तिथेच राहिले.

मदनबाण 11/12/2012 - 10:56
होप कधीतरी आधीसारख्या दर्जेदार मालिकांचा काळ येईल अशी प्रार्थना करूयात. सहमत ! सी. आय. डी. बघायला मिळायचे नाही, त्यामुळे पोलिस कसे नसावेत ह्यासे धडे मिळाले नव्हते. १०० (एक शुन्य शुन्य) ही मराठी मालिका विसरलात वाट्ट ! तू नळीवर याचे थीम सॉंग सापडत नाही. :( लहान मुलांसाठी त्यावेळी फनटाईम हा कार्यक्रम लागायचा,त्यात जायंट रॉबर्ट ही मालिका लागत असे... ती देखील मला आवडायची,नाईट रायडर सुद्धा आवडायची ! :)तबस्सुम यांचा फुलखिले है गुलशन गुलशन पण पहायचो... नाईट रायडरचा एक इडियो :--- http://piks.nl/GQ3

मराठे 12/12/2012 - 03:03
कधीतरी 'लेखु' नावाची एक सिरियल यायची. मोहन गोखले होते त्यात. गावातल्या एका 'गिफ्टेड' मुलाची गोष्ट होती. ती तुनळीवर अजिबात मिळाली नाही. तशीच 'इंद्रधनुष' नावाचीही सिरियल होती. एक मुलगा कॉम्प्युटर बनवतो / मग त्याचं कालयंत्र वगैरे बनतं अशी काहीशी थिम होती.१९८५-८७ सालची गोष्ट.

५० फक्त 12/12/2012 - 07:35
आमच्या अल्पबुद्धीला फक्त ' जंगल जंगल बात चली है पता चला है, चड्डी पहनके फुल खिला है फुल खिला हे' हेचे सगळ्यात जास्त आठवतं.

जेनी... 13/12/2012 - 05:47
स्टोन बॉय . रविवारी दुपारी १२ वाजता लागायचं . मला तर काहिच कळायचं नाहि पण दादामुळे बघावं लागायचं .

इरसाल 13/12/2012 - 11:45
किल्बिल व्होल. १ किलबिल व्होल. २

इरसाल 13/12/2012 - 11:47
माझ्याजवळ आय ड्रीम ऑफ जिनी थ्री स्टुजेस, रेव्हन, चे सगळे पार्ट आहेत..........फकस्त ८०-९० जीबी असत्याल.

निनाद मुक्काम … 13/12/2012 - 14:58
मालगुडी डेज ही आर के नारायण ह्यांची कथा आहे.त्यांची अश्याच एका सुंदर कांदबरी देव साहेब एका सिनेमाच्या शुटींग दरम्यान वाचून एवढे प्रभावित झाले की त्यावर गाईड सिनेमा काढला. आजही तू नळीवर ह्याचे सर्व भाग आहेत. आणि मिट्टी के रंग तर काय बोलू रूपक कथा असा आपल्याकडे एक साहित्यात प्रकार असतो ,त्यावर आधारित एक एक एपिसोड आपण म्हणतात त्या बसस्टॉप चा भागाने समाज वादावर माझी मते बनवली , अजित वाच्चानी ग्रेट अधिक लिहित नाही ,तुम्ही म्हणाला तसे पुढे ह्यावर नक्की लिहा रेणुका शहाणे एका मुलाखतीत म्हणाल्या की टी आर पी चा राक्षस उभा राहिला व त्याने सगळा घोटाळा केला आता सुरभी सारखी मालिका आम्ही परत नाही बनवू शकत. पूर्वी दूरदर्शन वर दर्जा राखण्यासाठी काही मालिका जाहिरात व इतर सर्व बाबी गौण मानून दाखवल्या जायच्या , आताच्या काळात हे शक्य नाही , वाईट वाटत की माझ्या पालकांच्या पिढीने हा सुवर्णकाळ त्यांच्या तारुण्यात पहिला आहे , आता निवृत्त झाल्यावर सध्याच्या निकृष्ट डेली सोप च्या व्यसनाच्या विळख्यात ते कसे अडकले.

किसन शिंदे 13/12/2012 - 15:04
'गोट्या' सिरीयल अजुनही चांगलीच आठवतेय. या मालिकेचे भाग आंतरजालावर कुठे पाहायला मिळतील?

In reply to by किसन शिंदे

कॅप्टन जॅक स्पॅरो 15/12/2012 - 17:06
गोट्या तु नळि वर सापडत नाहीये. पण तुम्ही दूरदर्शन कडे मागणी केलित तर ते कही शुल्क घेउन तुम्हाला ह्या गोश्ती उपलब्ध करुन देतात असे ऐकिवात आहे.

मी-सौरभ 14/12/2012 - 19:38
साळसूद, महाश्वेता, एक से बढकर एक, श्रिमान श्रीमती, युग या मलिका पब्लिक विसरलं की काय?

सिरुसेरि 14/06/2017 - 18:30
"मिट्टी के रंग" मधली "आज खुब चले है दंडासा " कथा छान होती . सौरभ शुक्लाने मस्त काम केले होते .