सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात २--पुढे
त्या स्त्रीला ३/४ (तीन चतुर्थांश) योनी नव्हतीच. त्यामुळे त्यांचे वैवाहिक आयुष्य कसे चालू होते हे त्या स्त्रीला विचारले तर ती म्हणाली व्यवस्थित चालू आहे. त्या नवर्याला सम्भोगाबद्दल अज्ञान असावे किंवा ती स्त्री खोटे बोलत होती.
त्या स्त्री कडून हे तत्वज्ञान ऐकून घेतले माझा रिपोर्ट लिहिला आणी तिच्या हातात ठेवला. दार उघडले तर तिचा नवरा बाहेर उभा होता आणि त्याने लगेच विचारले कि साहेब मुल होईल ना? त्या गरीब माणसाकडे पाहून मला कसेसेच झाले. त्याची दुहेरी फसवणूक झाली होती आणि त्यातून त्याला तुला मुल होणे फार कठीण आहे हे सांगण्याचा मला तेंव्हा तरी धीर झाला नाही.
मिसळपाव