Skip to main content

मुक्तक

आमची संगीत यात्रा..

लेखक भम्पक यांनी गुरुवार, 21/03/2024 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
काल पोराने ऑनलाईन मागवलेला अँपल चा एअरपोड आला. चेक करू म्हटले तर काय तंत्रज्ञान प्रगत झाले आहे याचा प्रत्यय आला. त्यात नॉइज कॅन्सलेशन चा पर्याय होता .आता नॉइज कॅन्सलेशन म्हणजे त्या एअरपोड मध्ये अशी काही रचना असेल कि ते कानात फिट बसतील अन बाहेरचा गोंगाट कमी होईल अशी माझी भाबडी समजूत.पण या एअरपोड ने तीला मूठमाती दिली.कारण कानात बसवल्या बसवल्या जेव्हा नॉइज कॅन्सलेशन चे ऑप्शन निवडले अन एकदम प्रचंड शांतता पसरली. बापरे हे मात्र जबरीच होते अन संगीत हि एकदम शुद्ध स्वरूपात ऐकायला मिळत होते.अर्थातच इंग्लिश गाणी..आजूबाजूला असलेला गोंधळ कणभरही जाणवत नव्हता.मी प्रचंड प्रभावित झालो.

कॉफी...

लेखक प्राची अश्विनी यांनी गुरुवार, 21/03/2024 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
पांढरा स्वच्छ टॉवेल गुंडाळून शॉवर मधून बाहेर येत तू मला कॉफी विचारतोस. तुझ्या आजुबाजुला शॅम्पूचा वास घमघमत असतो, माझ्या तनामनावर तृप्तीची गोड साय धरलेली असते. ती मोडून कॉफी पिणं जीवावर येतं. शिवाय तशीही कॉफी काही माझी फार आवडती असंही नसतं. पण तरीही, मी मान हलवत होss म्हणते. कारण तुला ती करताना पहाणं कॉफीहूनही फ्रेश असतं. तू बोलता बोलता पाणी उकळायला ठेवतोस. मग "मग" घेतोस. मी लगेच " मला तुझ्यातलीच शेवटची थोडी" म्हणून तुझी लगबग थोडी कमी करते. तू शांतपणे कॉफीचे दोन सॅचे त्यात रिकामे करतोस.

नवी ईमारतीतील अडगळ निवारण

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 19/03/2024 07:40 या दिवशी प्रकाशित केले.
दोन प्राध्यापक बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात. पहिल्या प्राध्यापकाने दुसर्‍या प्राध्यापकास कानात कुजबुजत विचारले नव्या ईमारतीच्या अवारातील जुने वड, पिंपळ, पारीजात, .......

प्रकाश प्रदूषण - ज्योतिर्मा तमसो गमय।

लेखक चामुंडराय यांनी सोमवार, 18/03/2024 02:05 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या इंद्रियगोचर, भौतिक जगात वावरताना आपले शरीर पंचेंद्रियांद्वारे विविध प्रकारची माहिती गोळा करून ती संदेशाच्या स्वरूपात सर्व बाजूंनी बंद अशा अंधार कोठडीत असलेल्या त्याच्या कडे पाठवते. तो (पहिला) ह्या गोळा झालेल्या सर्व माहितीचे विश्लेषण करतो आणि निष्कर्ष काढतो. ह्या निष्कर्षांद्वारे तो (दुसरा) ह्या जगाची अनुभूती (first person, internal and subjective experience - Qualia) घेत असतो. ह्यातील पहिला म्हणजे आपला मेंदू आणि दुसरा म्हणजे आपण स्वतः (म्हणजे नक्की कोण?). ह्या भौतिक संदेशांची अनुभूती मात्र अभौतिक असते आणि हा बदल नक्की कसा होतो ह्याचे आकलन झालेले नाही.

माझे बाबा

लेखक मनस्विता यांनी शुक्रवार, 15/03/2024 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
नोव्हेंबर २०२३ मध्ये माझे बाबा गेले. वय ८२ पूर्ण होते. लौकिकार्थाने त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी व्यवस्थित पार पाडल्या होत्या. तोपर्यंतचे आयुष्य आनंदाने जगले होते. त्यामुळे फार त्रास न होता ते गेले म्हणजे त्यांचं सोनंच झालं. पण... हा पण खूप मोठा आहे. ते गेल्यावर लक्षात आलं की आपल्या बाबांचे आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे स्थान होते. त्यांच्या जाण्याने कधीच भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. खरं तर हे इतकं खाजगी असं चव्हाट्यावर मांडायची खरंच काय गरज! इथे लिहिण्यामागे दोन कारणं आहेत. एक तर असं म्हणतात की "More you write personal, more it becomes universal".

रेवदंड्याचं दर्शन

लेखक पराग१२२६३ यांनी शुक्रवार, 16/02/2024 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
Korlai कुठंतरी छोटी ट्रीप करून येऊ असं ठरवत असताना अलिबागला जाण्याचं निश्चित झालं. मी अलिबागला पहिल्यांदाच जाणार होतो. त्यामुळं वेगळं ठिकाण-परिसर पाहता येणार असल्यामुळं उत्साहित वाटत होतं. त्यातच बऱ्याच वर्षांनी मुंबईशिवाय अन्य ठिकाणचा समुद्र पाहायला मिळणार होता.

ज्योत

लेखक अनन्त्_यात्री यांनी बुधवार, 07/02/2024 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
रिकाम-टेकडी मोठी तिच्या माथ्यावर माझा वायफळमळा-त्याच्या बांधावर मृगजळ साठवितो रोज थोडे थोडे पिऊनी ते दौडतात कल्पनांचे घोडे एकशृंगी घोडे त्यांचे पसरूनी पंख उडतात - टाळण्यास समीक्षकी डंख कल्पिताचे वास्तवाशी जुळवी जो नाते ज्योत त्याची विझण्याच्या आधी मोठी होते
काव्यरस

भरजरी

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 29/01/2024 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
भासे भरजरी | चिंधी जिंदगीची जेव्हा कवितेची । हाक येते ।। हाक नि:शब्द ही। पंचप्राणांवर घालते फुंकर । हलकीशी ।। हलकेच काही । आक्रीत घडते बेडी निखळते । त्रिमितीची।। तिठा त्रिमितीचा । चिंधी ओलांडते अकस्मात होते । भरजरी ।।
काव्यरस

३० वर्षांपासून अखंडित....

लेखक पराग१२२६३ यांनी शुक्रवार, 26/01/2024 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
संग्रह सव्वीस जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाचा अंमल सुरू झाल्यावर भारत सार्वभौम, प्रजासत्ताक झाला. तेव्हापासूनच दरवर्षी 26 जानेवारीला देशभर प्रजासत्ताक दिनी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाऊ लागलं. त्या कार्यक्रमांपैकी सर्वात मुख्य कार्यक्रम असतो नवी दिल्लीत आयोजित होणारे संचलन आणि अन्य कार्यक्रम. हा सोहळा मी 30 वर्षांपूर्वी पहिल्यांदा दूरदर्शनवर पाहिला होता आणि तेव्हाच मला तो प्रचंड भावलाही.

जिवाचं कोल्हापूर ❤️

लेखक chittmanthan.OOO यांनी गुरुवार, 25/01/2024 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
           आपल्या शालेय जीवनात दहावी हा एक महत्वाचा टप्पा असतो . माझ्याही आयुष्यात दहावी आलीच.पण  जरा सुस्तच होती . मी क्लास लावलेला जाधव सरांकड पण अभ्यास मात्र जसा जमेल तसा, काय ताण नाही काही नाही . कोण विचारलं दहावी चा अभ्यास कसा सुरु आहे ? उत्तर ठरलेलं असायचं "एकदम निवांत" मला दहावी नंतर काय करायचं हे माहीत नव्हतं . कोण विचारलं डिग्री कुठली करणार हे माहीत नव्हतं. आमच्या वर्गात मात्र ३-४ पोर होती जी म्हणायची मी कोट्याला जाणार आयआयटी ची तयारी करायला. कोण बोलायचं ब्रेन सर्जन होणार. च्यामायला ऐकून भीती वाटायची ओ. एवढ्या कमी वयात एवढी स्पष्टता...