जिवाचं कोल्हापूर ❤️
आपल्या शालेय जीवनात दहावी हा एक महत्वाचा टप्पा असतो . माझ्याही आयुष्यात दहावी आलीच.पण जरा सुस्तच होती . मी क्लास लावलेला जाधव सरांकड पण अभ्यास मात्र जसा जमेल तसा, काय ताण नाही काही नाही . कोण विचारलं दहावी चा अभ्यास कसा सुरु आहे ? उत्तर ठरलेलं असायचं "एकदम निवांत" मला दहावी नंतर काय करायचं हे माहीत नव्हतं . कोण विचारलं डिग्री कुठली करणार हे माहीत नव्हतं. आमच्या वर्गात मात्र ३-४ पोर होती जी म्हणायची मी कोट्याला जाणार आयआयटी ची तयारी करायला. कोण बोलायचं ब्रेन सर्जन होणार. च्यामायला ऐकून भीती वाटायची ओ. एवढ्या कमी वयात एवढी स्पष्टता...
मिसळपाव
पहिल्यांदाच मुंबईला पुण्याहून संध्याकाळी जायचं होतं. मग इंद्रायणीचं आरक्षण केलं आणि प्रवासाच्या दिवशी पुणे जंक्शनवर पोहचलो. तपकिरी रंगातलं कल्याणचं WCAM-2 इंजिन आज इंद्रायणीचं सारथ्य करत होतं.
मावळतीच्या सूर्याकडे पाहत पाहत पावले पडत होती. ओहोटी असल्याने चालायला भरपूर वाव होता. जसजसा पुढे जात होतो, तसतशी मागच्या लाऊडस्पिकर वर चालू असलेली क्रिकेट मॅचची कॉमेंटरी क्षीण होत होती. त्या तेजोनिधीने पाण्याच्या पृष्ठभागावर सोनेरी रेखा काढली होती आणि वाळूच्या खळग्यांमध्ये साचलेल्या ओहोटीच्या पाण्यात अनेक केशरी दिवे लावले होते. चालता चालता त्या पाण्यातील सूर्याच्या प्रखर प्रतिबिंबावर नजर रोखली गेली. आकाशातला सूर्य जणू जाता जाता वाळूवर रेंगाळत होता.