लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 29/01/2024 16:33 या दिवशी प्रकाशित केले. भासे भरजरी | चिंधी जिंदगीची जेव्हा कवितेची । हाक येते ।। हाक नि:शब्द ही। पंचप्राणांवर घालते फुंकर । हलकीशी ।। हलकेच काही । आक्रीत घडते बेडी निखळते । त्रिमितीची।। तिठा त्रिमितीचा । चिंधी ओलांडते अकस्मात होते । भरजरी ।। काव्यरस अव्यक्त लेखनविषय: मुक्तक वाचने 984 प्रतिक्रिया 0 प्रतिक्रिया
प्रतिक्रिया