Skip to main content

मुक्तक

जीऐ मराठीतील मैलाचा दगड - जन्म शताब्दी वर्ष

लेखक कर्नलतपस्वी यांनी बुधवार, 05/07/2023 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
दिव्याचे तेज, डोळ्यांचे वेज कोण तिथे जाळीत आहे शंभर वर्षांनंतर कोण माझी कविता वाचीत आहे? माझी उन्हे मावळली आहेत माझी फुले कोमेजली आहेत कालचा प्रकाश कालचा सुवास मात्रा वेलांटीत शोधीत आहे शंभर वर्षांनंतर कोण माझी कविता वाचीत आहे? आजची फुले आजच्या उन्हात पाखरांचा शब्द पिकला रानात माझी कविता तिथे वाचा जिथे ती दिनरात घडत आहे शंभर वर्षांनंतर कोण माझी कविता वाचीत आहे? वा.रा कांत शतकवीर फक्त क्रिकेट मधेच नसतात तर इतर प्रांतातही आसतात.असेच एक साहीत्य क्षेत्रा

नराधम

लेखक सुबोध खरे यांनी शनिवार, 01/07/2023 20:50 या दिवशी प्रकाशित केले.
नराधम आज माझ्याकडे सोनोग्राफी साठी एक रुग्ण बाई आल्या होत्या. वय वर्षे ४२. त्यांची फाईल पहिली तर त्यात बऱ्याच गोष्टी तर्कास न पटणाऱ्या होत्या. त्यांना एक वर्षांपूर्वी गर्भाशयाच्या कर्करोगाची सुरुवात झालेली होती. पण आजतागायत गर्भाशय काढून टाकलेला नव्हता. प्रथितयश अशा स्त्रीरोग तज्ज्ञांनी गर्भाशय काढून टाकणे आवश्यक आहे असे एक वर्षांपूर्वी स्पष्ट लिहून दिलेले होते. अगोदर झालेल्या सोनोग्राफी प्रमाणे या बाईंच्या गर्भाशयात निदान सात आठ तरी फायब्रॉइड्स होते आणि गर्भाशयाच्या मधल्या भागास अडेनोमायोसिस म्हणूनआजार झालेला होता. तीन महिन्यापूर्वी पेट सिटी (PET CT) झालेला होता.

पंढरीची वारी

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 29/06/2023 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राचे रहिवासी म्हणून पांडुरंगाची सेवा सहज,बालपणापासून करता येते हे एक भाग्याचीच गोष्ट आहे.

और तुम्हारे कंधे का तील..

लेखक प्राची अश्विनी यांनी रविवार, 25/06/2023 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या नजरेतलं लाडीssक आमंत्रण स्विकारून, गालावरच्या मिरीमिठाचा तो खरखरीत स्पर्श अनुभवत, थोsडं खाली उतरलं की तुझ्या खांद्यावरचा तो एक धीटसा तीळ, खुणवून बोलवणारा. त्याला आंजारायचं गोंजारायचं आणि मग तुझ्या पाठीवरून अजून खाली जायचं. कंबरेवरच्या जुन्या व्रणांवर हळूच ओठ टेकवले की उमटणारी थरथर मुरवून घ्यायची अंगभर.. आणि मग ओठांनीच जोडत बसायचे तुझे सगळे तीळ. अगदी निवांत... जर थकले तर क्षणभर विसावायला असतोच की तुझ्या खांद्यावरचा तो हक्काचा तीळ.. .... मधेच मान वर करून पहावं तर मिशीतल्या मिशीत हसत आभाळभर मायेनं मलाच निरखणारा तू.. किती गोड चित्र असतं हे माहितीये? .... चंद्रमाधवीच्या एकशे सोळा रात्रींना

आठ्या

लेखक अहिरावण यांनी शुक्रवार, 23/06/2023 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : ओळखा पाहू कॉलेजात झब्बा, जीन्स अन कोल्हापूरी चप्पल घालून निवांत हिरवळ पहात गप्पा मारत कट्ट्यावर बसायचो ते दिवस अचानक आठवले अन चला बरेच दिवसांत कोल्हापूरी चप्पल आणली नाही म्हणुन आणावी असे ठरवतो तोच... बाबा, मला नवे बुट आणायचे आहेत पैसे द्या जरा म्हणून पोराने हुकुम सोडला च्यायला खुप दिवस झालेत रे मस्त वाईनचे घूटके घेत गप्पा मारु अन हादडू बाहेर कुठेतरी मित्राचा फोन आला तेव्हा मन हुरहुरले चालेल करुया पार्टी म्हणुन बायकोला सांगायला फोन करणार तोच तिचा फोन आला अहो ऐका ना आज लवकर घरी या मला अमुक तमुकच्या लग्नाला जायचे आहे एक पण चांगली साडी नाही नवी आणु या का?

(पाट्या) :/

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शुक्रवार, 23/06/2023 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
सगळंच कसं कडू, चव नसलेलं, उदास, मन बसलेलं. आयुष्याच्या लॉगीन पुरतं, कुढत, टाकलेल्या पाट्या बळंच अहाहा सुरेख, कसली शिकलीत मुलं, शीकू दे गणगोतात नाराजी नको, म्हणून रेखाटलेल्या पाट्या पेंड्राइव्ह, गुगल, नोट्सवर आठवणींच्या शब्दनोंदी उद्या लिहू, परवा, निवांत, मनात अडकलेल्या पाट्या. अनवाणी, गाई-गुरांच्या, ओढ्या, नदी-घाटातल्या वाळूत पाझरणा-या झुळझुळत्या त्या निर्मळ पाट्या लांब बाह्या ओढत, शाळभरल्या पोरांचा कोलाहल नायलॉनच्या पीशवीतली पुस्तक, वह्या,अन त्या पाट्या फ़्रीज झालेल्या, दमलेल्या, दोस्त-लोकांच्या तारखा, अन, गझलेत गुंतून 'बसल्यावर' कंठभरल्या पाट्या

बरणी..

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 22/06/2023 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
गुढ वाट्याहून प्रेरित होऊन.. मोठ्या हौशीने बरणी आणली आधी पत्र्याचं झाकण होतं लोणचं घातलं सतत तेलं खारं संपर्कामुळे ते झाकण गंजल... मग खुप शोधा शोध केली बोरं आळी,गंज बाजार त्याच मापाचं प्लास्टिक झाकण शोधून मिळवलं .. आता लोणचं नाही टाकलं मुरांबा केलाय आंबट गोड वेलदोडे ,लवंग स्वादाने भरलेला बरणीत मुरांबा आता चांगला मुरलाय बरणी आहे 'काचेची' कर् करून नावं कोरता येत नाही मलमलच्या कपडा तिच्या तोंडाशी बांधते ओळख म्हणून...

दर्शन

लेखक मालविका यांनी शनिवार, 17/06/2023 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
दर्शन चिपळूण सायकलिंग क्लब तर्फे पंढरपूर सायकल वारी झाली. खूप छान आणि मस्त अनुभव मिळाला. मी फार काही देव देव करणारी नाही. पण म्हणून देवळात जात नाही असाही नाही. मी नियमित पोथी वाचते, देवळात जाते. फक्त गर्दीच्या दिवशी, गर्दीच्या ठिकाणी देवळात जायला मला फारस आवडत नाही. वारीच्या चर्चेत जेव्हा पांडुरंगाचे दर्शन हा विषय निघाला तेव्हा मुखदर्शन साठी माझा हात पहिला वर होता. ३/४ तास लाईन मध्ये उभे राहून दर्शन घेणं मला पटत आणि आवडत नाही. त्यामुळे खरं तर माझ्यासाठी पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी ही वारी नसून एक सायकल टुरिंग याच प्रकारात मोडत होती.

सखये,बाई ग.....

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 15/06/2023 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
सख्या रे... प्राचीताई यांची तरल,मोरपंखी कविता वाचल्यावर एकांगी वाटली. सखीने शंका उपस्थित केली तर सखा तीचे शंका समाधान कसे करेल हा एक विचार डोक्यात आला. काही सुचले, लिहून काढले व ताईंची परवानगी काढली.

पुणे स्टेशन झाले 165 वर्षांचे

लेखक पराग१२२६३ यांनी गुरुवार, 15/06/2023 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
pune पुणे रेल्वे स्थानकाला यंदा 165 वर्षे पूर्ण होत आहेत. पुणे स्थानकातून 14 जून 1858 रोजी नियमित रेल्वेवाहतूक सुरू झाली होती. त्यावेळी ही वाहतूक पुणे आणि खंडाळा यादरम्यानच होत होती. त्यानंतर काही महिन्यांमध्येच पुणे आणि दौंडदरम्यानचा लोहमार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. हे दोन्ही मार्ग ब्रॉड गेज होते. 1886 मध्ये घोरपडी आणि कोरेगाव (सातारा) दरम्यानचा मीटर गेज लोहमार्ग सुरू झाला. पुणे स्टेशनच्या सध्याच्या मुख्य इमारतीचे उद्घाटन 27 जुलै 1925 रोजी केले गेले.