जडण घडण - २६
संपर्क कायम आहे आमचा पण अर्थात विलंबित लयीत. आता भेटायची इच्छा अजिबातच नाही. ते दु:खं तसंच, तिथेच गोठलंय. समोर उभ्या समस्येला पाठ दाखवणं मान्य नव्हतंच कधी. मग जे घडलं, ते स्वीकारलं गेलं.
संसाराची गाडीही रमतगमत चालली होती. कधी हसत, कधी रडत, चिडवत,रूसत असं चारचौघांसारखं सुरू होतं. भूतकाळ प्रत्येकाला असतो, असं सांगणाऱ्या नवऱ्याने लग्नानंतर आवर्जून सांगितलं होतं, मला खूप बहिणी, वहिनी, मित्रमंडळी आहेत आणि मी त्यांची वाट्टेल तशी मस्करी करत आलोय आजवर. खूप जणांचं लक्ष असेल आपल्याकडे. माझं नाव काहींशी जोडलं जाईल किंवा आणखी वेगळ्या प्रकारे तुझी मस्करी केली जाईल.
मिसळपाव