Skip to main content

मुक्तक

पाऊस (शतशब्दकथा)

लेखक तिमा यांनी मंगळवार, 07/07/2015 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
त्या पावसाचं कवतिक तुमा लोकांनला! पावसावर गानी लिवता, मोट्या मोट्या गाड्यांमदी भिजायला जाता तिकडं डोंगरात. आमाला काय त्याचं ? दर वर्साला येतोय आन जिनं हराम करतोय बगा. आत्ता, दर वरसाला झोपड्याचं पलास्टिक बदलायला पैका कुटं हाय ? औंदा पन असाच आला माज्या दादल्यासारका आन लई झोंबून ग्येलाय कुटं तरी उंडारायला! सगली बरबादी क्येली बगा माज्या संसाराची. आता नसला तरी पान्याची बोंब व्हनार.

जडण-घडण २१

लेखक माधुरी विनायक यांनी शुक्रवार, 03/07/2015 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. आमच्या त्रिकोणी कुटुंबाचा चौकोन करणाऱ्या चौथ्या सदस्याचं अर्थात दुसऱ्या कन्येचं आगमन झालं, बरं का... सारं काही आलबेल. अल्पविरामानंतर पुनश्च हरी ओम म्हणतेय. पण अल्पविराम थोडा लांबल्यामुळे फारसं एकटाकी लिहिता येत नाही, असं जाणवतंय. बघू, कसं जमतंय ते... --------------------------------------------------------------------- जडण- घडण : 21 दोन तीन दिवसानंतर त्या मुलाने पुन्हा कॉल केला. अगदी सहज संवाद सुरू झाला आणि त्यानंतर वरचेवर बोलणं सुरू झालं. आधी एकमेकांच्या घरच्यांबद्दल, शिक्षण, नोकरीबद्दल गप्पा.

माझं करीयर मार्गदर्शन (!)

लेखक चिनार यांनी बुधवार, 01/07/2015 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच एक नात्यातला मुलगा भेटला. त्याने नुकतेच इंजिनियरिंग पूर्ण केले होते. भारतीय परंपरेप्रमाणे इंजिनियर झाल्यावर तो पुढे आयुष्यात आपण काय करायच ह्याचा विचार करत होता. बऱ्याच मुलांना इंजिनियरिंग हे आपलं क्षेत्र नाही ही जाणीव शेवटल्या वर्षपर्यन्त होते. पण इथपर्यन्त आलोच आहे तर शेवट बघूनच घेऊ, या विचाराने ते पदवी पूर्ण करतात. कारण इंजिनियरिंग हे मुंबई लोकलच्या गर्दीसारखं असते. लोकल मध्ये चढणं हेच एक आव्हान आहे. आणि एकदा चढलं की नक्की कुठे उतरायचं हे माहिती नसलं तरी आसपासची गर्दी आपल्याला तिथे उतरवतेच. मग स्टेशनचं नाव वाचल्यावर आपण चुकीच्या ठिकाणी आलो हे लक्षात येते.

आमचेही प्रवासवर्णन…

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 29/06/2015 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
Jack_Bauer भाऊंचे उसगावच्या दौर्‍याचे प्रवास वर्णन वाचून आम्हालाही आमी लिहीलेल्या एका प्रवासवर्णनाची आठवण झाली. तेव्हा मुक्तपिठ नामक मुक्तपिठल्यावर गाजत असलेल्या कुणा काकुंच्या अमेरिकेचे प्रवासवर्णन वाचून आम्हालाही प्रेरणा झाली होती. (प्रवासवर्णन लिहिण्याची प्रेरणा) आता ते इथे टाकावं की नको, पोस्टू की नको करत एकदाचं पोस्टूनच टाकलं. ******************************************************** मागच्याच आठवड्यातली गोष्ट आहे. आम्ही (आम्ही म्हणजे अस्मादिक आणि सौभाग्यवती) चक्क झोप्या मारुतीच्या देवळामागे असलेल्या भाजी मंडईत आतपाव मिरच्या आणि कोथिंबीर-कडीपत्ता आणावयास गेलो होतो.

'राहून गेलेलं काही...'

लेखक एस यांनी सोमवार, 29/06/2015 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
'राहून गेलेलं काही...' 'वेडीच्च आहेस तू कशाला केलंस बरं माझ्यासारख्या सडाफटिंगाशी लग्न? आणि तू हसून म्हणावं तुम्ही हुशार आहात ना, म्हणून. हे तुझं वेडेपण समजून घेणं राहूनच गेलं किनार्‍यावरल्या रेतीत तुझा हात हातात घेऊन पहिल्यांदाच चाललो होतो असे हरवलो होतो की कळलंच नव्हतं कधी तुझ्या पायातलं जोडवं पळवलं होतं लाटांनी ते परत आणण्याच्या बहाण्यानं पुन्हा फिरलो होतो दोघं तसं परत एकदातरी फिरायचं राहूनच गेलं तसंही गजराबिजरा आणायची मला कुठली असायला आठवण आणि राहू द्या, फुलं झाडावरच चांगली दिसतात हे तुझं नेहमीचं समजूतदार वागणं पण तुझ्या लांबसडक वेणीतही ती तितकीच छान दिसतात हे तुला म्हण

"मालवून टाक दीप"

लेखक सुबोध खरे यांनी सोमवार, 29/06/2015 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
ती संध्याकाळ मंतरलेली…। या लेखावरून जाग्या झालेल्या आठवणी लिहित आहे. १) "मालवून टाक दीप" हे गाणे तसे लहानपणापासून कधीमधी ऐकायला येत असे. परंतु त्याचा खोल अर्थ केंव्हा कळला ते असे. आमचे लग्न ठरले होते १९९२. तेंव्हा (होणारी) बायकोचे माहेर पनवेलला. ते खरेदी साठी दागिने बनवण्यासाठी पुण्याला येत असत. असे दोन वेळेस ते ५- ५ दिवस पुण्यात आलेले होते. माझी नोकरी चालू होतीच ए एफ एम सी मध्ये आणि एम डी पण चालू होते. तेंव्हा सोलापूर रोड ला मला दीड खोलीचे क्वार्टर्स मिळालेले होते. चार वाजता मी डिपार्टमेंट मधून सुटत असे. चहा घेऊन तयार होऊन सेंट बिंट मारून तयार होत असे.

प्रिय वपु,

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 26/06/2015 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय वपु, लौकीकार्थाने तुला या नश्वर दुनियेतुन जाऊन 14 वर्ष झाली. मला खात्री आहे की तू आता जिथे असशील तिथे सुद्धा 'रंग मनाचे' लावून माणूस शोधत असशील. तुला सवयच होती म्हणा ती. वयाच्या कितव्या वर्षापासून तू दोस्त बनलास ते काही आठवत नाही, पण त्यामुळे कळत्या वयात जे काही कळल ते भन्नाटच होत. "लक्षात ठेव दोस्त, तुला मी हवा आहे म्हणून मला तु हवा आहेस" अशी दोस्तीची एक नवीनच व्याख्या समोर ठेवून अंतरबाह्य बदलून टाकलस, 'सखी' मधून चतुर्थीचा अर्थ सांगितलास. कधी 'वपुर्झा'तुन खर्चाच गणित समजावलस तर कधी 'पार्टनर' मधून नरक म्हणजे काय याची अनुभूति दिलिस.

संध्याकाळ

लेखक सूड यांनी गुरुवार, 25/06/2015 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
ती आणि ही, दोघीही एकाच वयाच्या...जवळपास. तेच नेहमीचं पाहून न पाहणं, नजरेला नजर देऊनही अनोळखीपण जपणं. तिची नेहमीची लगबग, ही निवांत बसलेली. आजचा दिवस? जरा वेगळा, ती नेहमीपेक्षा थोडी टापटीप, हीच्या नजरेतून ते सुटलं नाहीच!! पुन्हा तेच नेहमीचं पाहून न पाहणं, नजरेला नजर देऊनही अनोळखीपण जपणं. ती आज थोडी जास्त लगबगीत ही मात्र नेहमीसारखीच निवांत, ढिम्म बसलेली. ती पुढे गेलेली मागे आली, कनवटीची दहाची नोट काढून हिच्या थाळीत टाकली... पुन्हा लगबगीत निघाली.. नातवाच्या वाढदिवसाला काय करावं, हा विचार तिच्या डोक्यात, ही तिने दिलेल्या दहात पोट कसं भरेल या विचारात गढून गेली दुसर्‍या दिवशी तेच नेहमीचं पाहून
काव्यरस

विस्मरणातील पांडुरंग

लेखक Sanjay Uwach यांनी सोमवार, 22/06/2015 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
काही माणसं निसर्ग नियमानुसार जन्माला येतात, मात्र ती का जन्माला येतात किंवा जन्माला येणे हा काही त्यांचा गुन्हा असतो काय ? भविष्य काळात जे जीवन त्यांना जगावे लागणार आहे, त्याला ते कितपत जबाबदार असतात ? असा प्रश्न मानवी मनाला अनेक वेळा पडतो. कधीकाळी एका इनामदाराच्या संपन्न कुटुंबात जन्मलेल्या पांडुरंगास मात्र आमच्या मामाच्या घरात जन्मभर मानवी पाण्याचा पंप अर्थात पाणक्या बनून रहावे लागले. आम्ही सुट्टीत नृसिंहवाडीला गेलो, की पांडु हा आमच्या कुतुहलाचा विषय असायचा.

वाटतं असं... की!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 19/06/2015 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
वाटतं असं... की तुझ्या हातात मोगरा भरभरून ठेवावा.. आणि सुगंधाशी सुगंधाला स्पर्धा करू द्यावी.. नक्की मला वेडं करणारा त्यातला कोणता आहे? ते शोधण्यासाठी! वाटतं असं... की पावसाने शांत झालेल्या मऊशार हिरवळीत तुझ्यासवे एकरूप व्हावं.. खऱ्या मीलनाचा मृद्गंध कळण्यासाठी! वाटतं असं... की तुझ्या हातांशी एकरूप झालेली मेहेंदी , मी नेहमी आठवावी.. हव्यास आणि सहजतेची ओढ यातला फरक.. मला समजण्यासाठी. वाटतं असं...
काव्यरस