जडण घडण - २७
नवं काम आवडू लागलं, त्यातही रूळले. या सगळ्या प्रवासात नोकरी देऊ करणाऱ्या कंपन्यांकडूनही वरचेवर कॉल यायचे. प्रामुख्याने कॉपी रायटिंग किंवा कंटेंट रायटिंगसाठी. पण बराच काळ फ्री लान्सींग सुरू होतं. वेगवेगळ्या क्षेत्रात, मनासारखं आणि वेळेच्या सोयीनुसार काम करता येत होतं, त्यामुळे पूर्णवेळ नोकरी करण्याकडे फारसा कल नव्हता. मुलाखतींसाठी गेले काही ठिकाणी, पण ते फारसं काही रूचलं नाही.
एकदा एका चांगल्या ॲड एजन्सीमध्ये कामाला सुरूवात केली. पहिल्या दोन दिवसातच भयंकर कंटाळले. मी वेळेत पोहोचायचे. काम फारसं नसायचं. क्रिएटिव्ह टीम निवांत यायची.
मिसळपाव