Skip to main content

मुक्तक

“ये है बंबई मेरी जान.”

लेखक सौन्दर्य यांनी रविवार, 27/09/2015 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
ये है बंबई मेरी जान काही दिवसांपुर्वी मुंबईला आलो होतो. गोरेगावच्या एका रस्त्यावरून जाताना सहजच बाजूला असलेल्या बस स्टॉपकडे दृष्टी गेली आणि सर्व प्रथम नजरेत भरला तो एका जाहिरातीतला अक्षय कुमार, त्याच्या सुंदर निळ्या शर्टासहित. चेहऱ्यावर प्रसन्न भाव आणि नजरेत चमक. आणि दुसर्याच क्षणी दिसला तो त्याच्या छत्र छायेत गाढ निजलेला मनुष्य. त्या बस स्टॉपच्या अरुंद बेंचवर, वरील स्टीलच्या बारला धरून शांतपणे झोपला होता. पण शांतपणे तरी कसं म्हणता येईल ?

ll गंगास्मरण ll

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 26/09/2015 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
सप्टेंबर महिन्यातला शेवटचा शनिवार हा जगभरात 'सरिता दिन' म्हणून साजरा केला जातो. (जगभरातील नद्यांचे प्रदूषण हा चिंतेचा विषय आहेच.) पण आजच्या दिवशी, परमपावन मानल्या गेलेल्या गंगेचे, तिच्या नितळ स्वरूपात केलेले स्मरण समयोचित ठरावे! तू कावेरी तूच नर्मदा, गोदा भद्रा सरस्वती तुझीच सारी अनंत रूपे, कृष्णा पद्मा शरावती तू कल्याणी, नीरदायिनी तुलाच नमितो सांबसदाशिव, हरहर गंगे तुलाच स्मरती भगिरथाचे पुत्र चिरंजीव प्रकटयोगिनी बिकटगामिनी तुझ्या तटाचे कडे निसरडे…. कितीक आले गेले भुलले तुझ्या किनारी शांत निमाले प्रयागसंगम अलख निरंजन तुझ्यात फिरते चक्र चिरंतन विशालसुंदर तरल निरंतर तुझ्यात विरते माझे अ

एक होती रातराणी

लेखक रातराणी यांनी गुरुवार, 24/09/2015 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
त्याच असं झालं kvitaa लिहली आणि नावच सुचतं नव्हतं. मग तरी घाई घाईत तशीच चिकटवली. काही वेळाने बघितलं तर वेल्लाभट म्हणाले पहिल्याच कडव्यात यमक चुकलंय. अर्रर झालं एकदम! तस आम्ही निमित्त शोधतचं असतो हवापालट करून यायच! आता ही आयती संधी का सोडा म्हणून आम्ही सध्या "ताण" मुक्त होण्यासाठी "एक ब्रेक घेतलाच पाहिजे" या निष्कर्षाप्रत पोचलो आहे. तर ही जिलबी वाचून कुणालाही ताण आल्यास तुम्हीही घ्या एक ब्रेक. काय म्हणता पाल्हाळ वाचूनचं आला ताण. बर सॉरी बरं का. तरी आई सांगत असते माणसाने कसं नेमकं बोलावं. कधी जमेल काय माहिती!

राग राजस्थानी

लेखक अद्द्या यांनी गुरुवार, 24/09/2015 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
लोक किती काही म्हणोत . कि बाहेर राहून आल्यावर फक्त घरचंच जेवण चांगलं लागतं किंवा आईच्या हातचा वरण भात किंवा बाबांच्या हातचा तिखट जाळ झुणका. या सगळ्याची किंमत जरी बाहेर राहिल्यावर समजते . तरीही , घर सोडून दुसऱ्या गावात राहायला गेलं कि एक कला आपल्याआपण शिकतो . ती म्हणजे चांगली खायची ठिकाणे शोधणे. मग तो साधा भेळपुरी वाला असो कि भवानी मंडपातला तोंडाला पाणी सुटेल असा तांबडा पांढरा रस्सा असो . किंवा भल्या सकाळी ७ वाजता कटाकिर्र मध्ये जाऊन हाणलेली मिसळ असो . किंवा रात्रीच्या शांत वातावरणात पद्मा गेस्ट हाउस सामोरील "चाचा" ची गरमागरम चाय असो .

हाथ बढा ए ज़िंदगी

लेखक बहुगुणी यांनी मंगळवार, 22/09/2015 03:49 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी घरी एकटा होतो. उन्हं उतरली होती. सुटीची कामं, वाचन, टीव्ही पहाणं सगळं करून झालं तरी रविवारचा संधिकाल सरता सरत नव्हता. असं बर्‍याच दिवसांनी घडलं होतं. वेळ घालवायला मागच्या अंगणात गेलो. नेहेमीप्रमाणेच मावळत्या दिवसाला आणखी थोडं लांबवत, एकमेकांचा पाठलाग करत पक्षी झाडांवरून, विजेच्या तारांवरून झेपावत होते. एकदम लक्षात आलं, खारी दिसत नाहीयेत आज. गेल्या महिन्यात तर कितीतरी होत्या.

राजकन्या, राक्षस आणि घोडा

लेखक सातबारा यांनी रविवार, 20/09/2015 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
राजकन्या दबा धरुन बसली होती. तिच्यापेक्षा तिप्पट मोठया राक्षसाला हरवायचे तर अनपेक्षीत हल्ला करणे आवश्यकच होते आणि अनपेक्षीततेचे शस्त्र कुशलतेने वापरण्यात राजकन्या वाकबगार होती. पट्टीच्या शिकार्‍यासारखी, श्वास रोखून, संधीची वाट पहाणारी राजकन्या आणि डुलत डुलत येणारा अनभिज्ञ राक्षस! आपल्या कावेबाजपणे युद्धाचा निकाल पहिल्यापासूनच आपल्याबाजूने करुन घेतलेला असला, तरी राजकन्या अजिबात गाफील रहाणार नव्हती. राक्षस टप्प्यात येताच एक गगनभेदी आरोळी ठोकून राजकन्येने झेप घेतली. अवचित हल्ल्याने गांगरलेल्या राक्षसाला संधी न देता तीने निष्ठुरपणे घाव घातले. राक्षस धडपडला, कोसळला!

कुछ अनमोल लोगो से रिश्ता रखता हूँ…

लेखक बहुगुणी यांनी शनिवार, 19/09/2015 05:25 या दिवशी प्रकाशित केले.
धाकट्या भावाने हरिवंशराय बच्चन यांची "कुछ अनमोल लोगोंसे रिश्ता रखता हूं" ही कविता पाठवली आणि कळवलं, 'दादा, मराठीत रुपांतर कर!'. प्रयत्न केलाय, त्याच्यासाठी, आणि मिपासाठी.

एक पूर्ण ताट

लेखक मित्रहो यांनी गुरुवार, 17/09/2015 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
“या आजोबा बसा, काय हवय आपल्याला?” “थकलोय हो, खूप भूक लागलीय. काही खायला असेल तर द्या ना.” “कसली भूक?” “कसली म्हणजे? भूक काय वेगवेगळी असते?” “हो आजोबा या हॉटेलात येणाऱ्या प्रत्येक माणसाची भूक वेगळी असते. कुणाला ज्ञानाची भूक, कुणाला मनोरंजनाची भूक तर कुणाला फक्त मैत्रीची भूक.” “बापरे कठीण आहे एकंदरीत सारा प्रकार. इथे निदान पाणी तरी मिळेल का?” “मिळेल ना. कुठले पाणी हवेय आपल्याला काव्याचे कि साहित्याचे?” “अहो मला खरच भूक लागलीय हो. त्या कट्ट्यावरची माणसे म्हणत होती इथ मिनिटा मिनिटाला जिलब्या पडतात. ते ऐकूणच मी माझी भूक भागवायला इथवर आलोय.” “त्या जिलब्या वेगळ्या आजोबा, ती भूकही वेगळी.

आसरा

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 17/09/2015 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
घर तसं छपराचं. एका बाजुला गुरांचा गोठा. दुसऱ्या बाजुला माजघर. पाठीमागे पडवी. मध्येच सारवलेला ओटा. गोठ्याला लागुन भली मोठी चिंच ऊभी. लागोलाग ओढा. कोरडा. फक्त पावसाळ्यात भरून वाहीलेला. ओढ्याकाठी चिंच, सिताफळ, कवठ आणि केक्ताडाची वैविध्य झाडं. या झाडांत बुजुन गेलेलं ते छपराचं घर. एकटं. गावापासुन दुर. घरापासुन निघालेली पायवाट उतरती होत ओढ्यात शिरलेली. वगळी वगळीतुन जात पुन्हा चढाला लागलेली. या पायवाटेवरुन घरातील माणसे येजा करीत. घरातील प्रमुख पुरुष याच वाटेवरून बैलगाडी नेई. लहानग्यांचा पोरखेळही याच वाटेवर चाले. त्या घरात एक म्हातारा रहात होता.

बाय

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 16/09/2015 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी लगबगं भाकऱ्या चुलीवरं धुराड्यात खोकते ही कैदाशिनं. सडा सारवनं धारोष्ण दुध न्हावुन झाली ही अवदसा. धनी शेतावरं हंबरते वासरु भारा ऊचलाया ही सटवायी. पाखरु आभाळी झळुनिया ऊनं फिरे रानोमाळी ही जोगतीनं. आवसं पुनवं संसार सुखाचा माहेरची ओढ रूते काळजातं.