बाय
काव्यरस
सकाळी लगबगं
भाकऱ्या चुलीवरं
धुराड्यात खोकते
ही कैदाशिनं.
सडा सारवनं
धारोष्ण दुध
न्हावुन झाली
ही अवदसा.
धनी शेतावरं
हंबरते वासरु
भारा ऊचलाया
ही सटवायी.
पाखरु आभाळी
झळुनिया ऊनं
फिरे रानोमाळी
ही जोगतीनं.
आवसं पुनवं
संसार सुखाचा
माहेरची ओढ
रूते काळजातं.
वाचने
3009
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
+1
:(
In reply to :( by शुचि
आवडली नाही का? की समजली नाही?
In reply to आवडली नाही का? की समजली नाही? by जव्हेरगंज
आवडली.
आवडलीच.
मस्तच +१
Jabbardast
हम्म
In reply to हम्म by पैसा
नुसतच हम्म..