मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

किती भाग्यवान आम्ही!

शिव कन्या · · जे न देखे रवी...
किती भाग्यवान आम्ही, आमचे देश आम्ही स्वखुशीने सोडले! किती गंडलो आम्ही! मायभूमीच्या आठवांचे गाणे आम्ही, 'चिट्ठी आयी है वतनसे' मध्ये ऐकले! उमाळे, उसासे विमानतळावरच विरतात बहुतेक! नव्या जगातल्या शांतसमृद्ध किनार्याचा मोह नसतोच, छातीठोकपणे सांगावेच कुणी! आठवणी तर येणारच...... अथपासून इतिपर्यंत सगळ्या... नव्या मातीवर मृगजळामागे धावले नाहीत, असे पाय दाखवावेतच कुणी! प्रेमामायेचे पाश कुणाला चुकलेत? 'सुटलो एकदाचा जंजाळातून' म्हणत अनोळख्या टापटिपीत स्वच्छंद शीळ घातलीच नाही असा त्रिशंकू भेटावाच कधी! किती भाग्यवान आम्ही, आमचे देश आम्ही स्वखुशीने सोडले!

वाचने 3374 वाचनखूण प्रतिक्रिया 8

नाखु Fri, 09/11/2015 - 14:47
दुसरी (की दुखरी) बाजू वाचायला आवडेल. कुणी आहे का हे आव्हान स्वीकारणारा !!!!! साशंक नाखु

चलत मुसाफिर Fri, 09/11/2015 - 16:17
देशाची ओढ वाटत असेल तर त्यात काहीच गैर नाही. परत या. इथे काही नंदनवन आहे अशातला भाग नाही. पण निदान आपल्या स्वतःच्या घरात असल्याचं हक्काचं सुख!

मांत्रिक Fri, 09/11/2015 - 20:53
आवडली कविता! पोटासाठी माणूस दूर जातो. स्वतःच्या देशात चांगल्या संधी नाहीत म्हणून किंवा अन्य कारणाने. पण गावची ओढ कायमच राहते. सुंदर!