मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुक्तक

स्वतःला जगवत ठेवण्याचे प्रयोग (ऐसी अक्षरे ३५)

Bhakti ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
1 पुस्तक -#स्वतःला_जगवत_ठेवण्याचे_प्रयोग लेखिका -#ऐश्वर्या_रेवडकर स्वतःचे अवकाश शोधणाऱ्या स्वच्छंदी मुली लग्न संस्थेतील कच्चे दुवे ,पुरुषत्वाचा दुराभिमान, पितृसत्ताक वर्चस्व, स्त्री-आदरातील सामाजिक दांभिकता या मुद्द्यांपर्यंत तटस्थपणे नक्कीच पोहोचतात.तेव्हा त्या विचारांना फेमिनिझम म्हणत आपण हेटाळतो .प

लक्ष लोलक तोलत

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
लक्ष लोलक तोलत उसळते निळी लाट किनाऱ्याशी फुटताना एक अतृप्ती उत्कट मावळतीच्या दिशेला फूल फुटे केशराचे निळ्या घुमटाला पडे कोडे कुण्या नक्षत्राचे तोल ढळण्या आधीच हस्तिदंती मनोऱ्याचा कोष आवळून घेतो मीच माझ्या भोवतीचा

खूप थंडी आहे यंदा

पाषाणभेद ·
लेखनविषय:
खूप थंडी आहे यंदा. पांघरायला ब्लॅंकेट काढू का दुलई काढू? ब्लॅंकेट काढ. पण ब्लॅंकेट धुवायला लागते आधी. मग दुलई काढ. दुलई फार हलकी आहे वजनाला. मग ब्लॅकेट काढ. ब्लॅंकेटने काय थंडी थांबते का? मग दुलई काढ. दुलई थोडी आपरी आहे. मग ब्लॅंकेट काढ. ब्लॅंकेट अंगाला टोचते. मग दुलई काढ. दुलई कॉटनच्या कापडाची नाही नं. मग ब्लॅंकेट काढ. ब्लॅंकेट लई महागाचं आहे नं. मग दुलई काढ. जाऊद्या. आपली गोधडीच बरी आहे.

'लोकधन' (ऐसी अक्षरे - ३३) ते..... 'The folk आख्यान'

Bhakti ·
लेखनप्रकार
इथे पुस्तक परिचयासोबतच लोककला हा सामान दुवा असणाऱ्या आणखीन एका कार्यक्रामाचाही थोडक्यात आढावा दिला आहे. मला मानवाच्या इतिहासाबद्‌दल अनेक गोष्टी जाणून घ्यायला आवडतात.त्या इतिहासाची केवळ पानेच /लिखित साहित्य वाचून सध्यातरी समाधान करून घेतले जाते. तसेच विविध उत्खनन, स्थापत्य, वस्तू, भौगोलिक खुणा त्या इतिहासाजवळ घेऊन जातात . पण अनेक मौखिक परंपरा -लोककला हा वारसा जपत आलया आहेत. लोकपरंपरा काळानुरूप बदलाचे वादळ पांघरूण वेळोवेळी रुप बद‌लून समाजा समोर येतात. परंतू काळ आता इतका वेगवान होत क्षणोक्षणी बदलत आहे की है 'लोकधन' संपुष्टात येण्याची भीती आहे. डॉ.

दहा अंगुळे उरला

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
अभंगाची मूळाक्षरे ध्यानी मनी घोटताना "वि"ठ्ठलाच्या "वेलांटीत" "का"न्हा रेखाटतो "काना" वेचुनिया मूळाक्षरे घडवितो शब्द तुका गहनाचा अंतर्नाद झंकारतो त्यात, ऐका शब्द चोखट, रोकडे जोडे तुका, रचे ओळ ओळी ओळीत गर्जती वीणा, मृदंग नि टाळ एका एका अभंगाचा शब्द शब्द जो जगला तुका आभाळ व्यापून दहा अंगुळे उरला

व्हिन्सेंट व्हान गॉग-अभिवाचन‌ प्रयोग

Bhakti ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
व्हिन्सेंट व्हान गॉग (१८५३-१८९०) १ उर्सूलाच्या(युजेनी) प्रेमात पडलेल्या व्हॅन गॉग सुरुवातीच्या काळात अनेक शेतातील चित्रे रेखाटली .अगदी तिला लग्नाची मागणी घातली, पण त्याच्या भ्रमाचा भोपळा फुटला. तीने तिचे लग्न आधीच ठरल्याचे सांगितले.

नवरात्री निमित्ताने

Bhakti ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
#नवरात्री निमित्ताने परवा एक आंतरजालीय व्याख्यान ऐकत होते त्यामध्ये हडप्पा काळापासून ते आताच्या काळापर्यंत 'घट' (मडके) याचे बद‌लले स्वरूप, त्या निगडीत प्रथा सांगितल्या गेल्या.

सागर तळाशी

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
सागर तळाशी | तुटल्या केबल त्याने जगड्व्याळ | लोच्या झाला || १ || बाह्य जगताशी | संबंध तुटला येरू डोकावला | आत तेव्हा || २ || अनाहत नाद | आला समेवर कल्लोळ सुस्वर | उसळला || ३ || स्थूल ओलांडून | ओसंडे सूक्ष्मात ऐसी ज्याची रीत | दिसला तो || ४ ||