Skip to main content

दहा अंगुळे उरला

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 10/10/2025 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
अभंगाची मूळाक्षरे ध्यानी मनी घोटताना "वि"ठ्ठलाच्या "वेलांटीत" "का"न्हा रेखाटतो "काना" वेचुनिया मूळाक्षरे घडवितो शब्द तुका गहनाचा अंतर्नाद झंकारतो त्यात, ऐका शब्द चोखट, रोकडे जोडे तुका, रचे ओळ ओळी ओळीत गर्जती वीणा, मृदंग नि टाळ एका एका अभंगाचा शब्द शब्द जो जगला तुका आभाळ व्यापून दहा अंगुळे उरला
लेखनविषय:

वाचने 752
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया