एका 'कोसला'प्रेमीचे प्रेमप्रत्र
(हे विडंबन नव्हे, ही 'कोसला'ला दिलेली एक मन:पुर्वक छोटेखानी सलामी - जव्हेरगंज)
********
प्रती :- शंभरातील एकास...
प्रिये मी हा असा उकिडवा बसलोय. तुलाच पत्र लिहीत. बनियन बाहेर वाळत घातलाय. आंघोळ अजुन व्हायची आहे. साबणही संपलाय. तुझी खुप आठवण येते. उदाहरणार्थ बादलीत पाणी वगैरे काढलयं.
सकाळी तुला बघितलं. भाजी मंडईत. घासाघीस करत होतीस. गुलाबी परकर पोलकं चांगलं होतं. बरी दिसलीस. मी तिथेच शेजारी ऊभा होतो. उदाहरणार्थ झिपऱ्या वगैरे नीट बांधत जा.
परवा मागच्या बाकावर बसणारा प्रभुणे तुझ्याकडे बघत होता. तुला द्यायला त्यानं फुलपण आणलं होतं. मी म्हणालो, ती आपली लाईन आहे. मग टपरीवर नेऊन त्यानं मला चहा पाजला.
हे एक थोरच आहे.
प्रभुणे येतो अधुनमधुन रुमवर. त्याच्या बापसाने म्हणे दोन लग्न केली होती. दोन बायका एकाच घरात. त्यांची सात आठ पोरबाळं. कुठलंही पोर कुणालाही प्यायचं. याला अजुन माहीतीचं नाही हा नक्की कुठल्या आईचा.
ही एक भलतीच गोष्ट झाली.
रात्री जेवायला गेलो. मेसमध्ये फीस्ट होती. सुरेश शेजारीच बसला होता. त्याच्या ताटातली दह्याची वाटी मला देत म्हणाला, नुसतचं पाणी आहे. ईथल्या गायी म्हशी आटल्या वाटतं. मी म्हणालो, नंतर सिगरेट पिऊया. उदाहरणार्थ माझी खीरीची वाटी त्याला दिली.
सिगारेटीही महाग झाल्यात आजकाल. नाक्यावरुन बीडीचं बंडल आणलं. सुरेश म्हणाला, मला नको. मी म्हणालो, चालतयं. सुरेश निघुन गेला. मग खिडकीपाशी खुर्ची घेऊन बिड्या ओढत बसलो. एक एक करत बंडलच संपवल. टेबलावर एक मुंगळा फिरताना आढळला. हाताने धरत त्याला वहीवर ठेवला. पेनाच्या टोकाने त्याच्याशी खेळत बसलो. एकाएकी हातावरुन सदऱ्याच्या बाहीत शिरला वगैरे. नको तिथे चालला वगैरे. पुन्हा पकडुन वहीवर ठेवला वगैरे. तो आता वहीच्या खाली चालला वगैरे. पुन्हा त्याला पकडलं वगैरे. आता याला कुस्तीसाठी नवीन मुंगळा पकडला पाहीजे वगैरे. सगळ्या खोलीत वगैरे शोधत फिरलो. शेवटी फडताळात वगैरे एक सापडलाच. त्याला वहीवर ठेवायला घेऊन आलो तर हा पहिला गायब. का हाच होता तो. शेवटी त्याला खिडकीबाहेर टाकुन दिलं वगैरे. यातच रात्र गेली. आजही समाजशात्राचा अभ्यास बोंबलला. पहाटे थोडावेळ झोपलो तर सुरेश दारात हजर. बहिणीच्या लग्नाला स्टेशनवर जायचय, तो म्हणाला. अख्खा दिवस मी तारटवल्या डोळ्यांनी घालवला.
आता हे खुपच झालं.
तू एक काम कर, आधी बी.कॉम वगैरे पुर्ण कर. मंजिरीसोबत जास्त फिरु नकोस. जाम लफडेबाज आहे ती. बाजारात सुधाकर तिला घेऊन फिरत होता. दिवसभर. म्हणजे सिनेमा वगैरे पाहिला दोघांनी. संध्याकाळी किशोर तिच्या रुमवर गेलता. नोटस् वगैरे आणायला. बराच वेळ बाहेर आला नाही असे सुरेश म्हणाला. रात्री मला ती पुलाखालच्या काळोखात बसलेली दिसली. रामदासच्या पुढे. नागवीच.
गेल्या महीन्यात ट्रिपला महाबळेश्वरला गेलो होतो. मित्रांबरोबर.
महाबळेश्वर
एक प्रचंड हिरवगार टेकाड. समोर कायम घोंगावणारा वारा. त्याचा आवाज मनात घुमतो आहे. आणि मी स्पॉटांमागुन स्पॉट पाहतो आहे.
एका स्पॉटात भलीमोठी दरी. अक्राळविक्राळ. खालुन थेट शिखराकडे पाहते आहे. काय पाहते आहे? झाडाझुडपांनी फार फार वेढलेली. मध्येच उजाड ओबडधोबड माळरान.त्या बोडक्या माळरानाकडे मी टक लावुन पाहतो आहे. या माळरानावरचं दगडांचा हिशोब मांडलाय. मी पुन्हा खाली पाहतोय. एवढी मोठी दरी नजरेच्या एका टप्प्यात पाहता येत नाही वारंवार डोळे फिरवावे लागतात. अतिशय हिरवळ. आणि गारठा. हा गारठा घोंघावण्याऱ्या वाऱ्यासमवेत झेपावत येतो. आणि मला बधीर करुन जातो. ही बधीरता शब्दात मोजता येणार नाही. मी तसाच पायरीवर बसतो. प्लीज किप मी वॉर्म, माझ्यावर दया कर. ही दरी आपली किव करणार नाही. ही लिक्विड नायट्रोजन पोटात गोठवुन बसली आहे.
पुन्हा दुसऱ्या स्पॉटकडे. तशीच भव्य दरी. तिसरीही तशीच. दर स्पॉटवर तेच.
एका स्पॉटवर गच्च हिरवळ आहे. मी कितीही आत गेलो तरी संपणार नाही. त्या जंगलात मी इकडे तिकडे फिरलो. ईथे खरच काही नाही.
या गारठलेल्या बधीरतेत रोमांचाला सीमा नाही. ईथे तर फक्त एक दिवसाचा खेळ.
गेल्या आठवड्यात तुझ्या घरी गेलतो. हात मागायला. तुझा बाप म्हणाला, कामधंदा काय करता, नोकरी वगैरे. मी म्हणालो, गावाकडे शेती आहे, ट्रँक्टर आहे, चार म्हशी आहेत, दुमजली घर आहे. तुझा बाप म्हणाला, असा कसा तुमच्या गळ्यात आम्ही धोंडा बांधायचा.
हे थोरच आहे.
माझं आयुष्य असं हे खुंटीला बांधलेलं. तुझ्याही प्रेमात पडु वाटलं म्हणुन पडलो. तुला कोणी धोंडा वगैरे म्हटल्यालं आपल्याला नाही आवडणार. तरीही तुझ्याशीच पाट लावणार. उदाहरणार्थ हे चुकच आहे. म्हणजे बरोबर.
कळावे
शंभरातील दुसरा...
वर्गीकरण
जमतय जमतय !
कोसला वाचली नाही त्यामुळे लेख
हम्म!
In reply to हम्म! by एस
अगदी अगदी.
In reply to अगदी अगदी. by प्रचेतस
+१
In reply to अगदी अगदी. by प्रचेतस
कोसलाबद्दल गप्प रहाते
In reply to कोसलाबद्दल गप्प रहाते by पैसा
रणांगण आणि कोसला बद्दल पण नका
In reply to रणांगण आणि कोसला बद्दल पण नका by अजया
हॅर्टा हॅर्टा
In reply to हॅर्टा हॅर्टा by प्रचेतस
मग जौ दे ना
In reply to मग जौ दे ना by पैसा
=))
In reply to अगदी अगदी. by प्रचेतस
रणांगण नाही.
In reply to रणांगण नाही. by बोका-ए-आझम
सत्तांतर माडगूळकरांची का?
In reply to सत्तांतर माडगूळकरांची का? by प्रचेतस
हो हो. त्यांचीच.
नुकतीच बिढार वाचलीय …त्यामूळे तीच पुढे वाचतोय असं वाटलं
विडबन एकदम मस्त वगैरे
In reply to विडबन एकदम मस्त वगैरे by दिवाकर कुलकर्णी
मला आवडली हो कोसला …
In reply to मला आवडली हो कोसला … by यमन
सहमत.. कोणत्याही कलाकृतीचे
प्रत्येकामधे एक पांडुरंग
In reply to प्रत्येकामधे एक पांडुरंग by कॅप्टन जॅक स्पॅरो
+१११ थोरांशी सहमत. ;)
In reply to +१११ थोरांशी सहमत. ;) by प्यारे१
+१११
In reply to +१११ थोरांशी सहमत. ;) by प्यारे१
उदाहरणार्थ पोरांना थोर
In reply to उदाहरणार्थ पोरांना थोर by कॅप्टन जॅक स्पॅरो
म्याड च आहेस. उदाहरणार्थ २३४८
रात्री एक लेख टाकला. तिकडं
In reply to रात्री एक लेख टाकला. तिकडं by जव्हेरगंज
तिकडचं तिकडे
कॅप्टनशी तीव्र सहमती!
कोसला आवडतं पुस्तक आहे. नक्कल
कोसला भय़कर आवडत पुस्तक शैली छान उचललीत
In reply to कोसला भय़कर आवडत पुस्तक शैली छान उचललीत by मारवा
अगागा
In reply to अगागा by पैसा
म्हणजे
आणि हो हे जव्हेरगंज नावा मागची प्रेरणा काय म्हणे
In reply to आणि हो हे जव्हेरगंज नावा मागची प्रेरणा काय म्हणे by मारवा
जव्हेरगंज नै जान्ता
कॉकटेल ऑलरेडी होऊ लगलंय
In reply to कॉकटेल ऑलरेडी होऊ लगलंय by दिवाकर कुलकर्णी
अरे हो की! मलाही ते वगैरे
कोसला स्टाईल आवडली. मात्र
In reply to कोसला स्टाईल आवडली. मात्र by विजुभाऊ
हेच माझ्याही लक्षात आले होते.
लेखन आवडले. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बॉय फ्रेंड... गर्ल फ्रेंड... Na Na Na Na... :- J Starकोसलाच्या यशासाठी ? पुलनाहि
छानच लिहिता. ते पोपट बिपट
In reply to छानच लिहिता. ते पोपट बिपट by रातराणी
धन्यवाद रातराणी, तो पोपट