रात्रीचे नऊ वाजत आलेत. बेडवर ती 'इनसाईड मॅडेलाइन' वाचत पडलीय. छकुलीचा पण होमवर्क झालाय, तसाही उद्या संडे होता. तिच्या रुममध्ये एव्हाना ती झोपलीही असेल. किचन ही आवरले होते. काही वेळापुर्वीच तिचे मिस्टर दुर कुठेतरी दोन दिवसांच्या अॉफिसटुरला गेले होते. तिने अगदी फोन करुन ट्रॅव्हल भेटल्याची खात्री करुन घेतली. दिवस तसा धावपळीतच गेला होता. एक अनामिक हुरहुर तिला लागुन राहीलेली. घड्याळाकडे वारंवार नजर चालली. तसही करण्यासारखं काही काम नव्हतं. रोजचा छंद म्हणुन बेडटाईम स्टोरीज वाचत पडली होती.
तेवढ्यात बेल वाजली. दार उघडुन तिने त्याला लगबगीने आत घेतलं. आज त्यानं चक्क बियरचं आणलीये. गेल्यावेळीस म्हटला होता तसचं. तिनंही तशी ईच्छा दर्शविली होती. त्या चवीत आज तिलाही धुंद व्हायचं होतं.
"तुझा हजबंड गेलाय ना नक्की टुरवर, नाहीतर मधुनच परतायचा" टि.व्ही अॉन करुन बेडवर बसत त्यानं विचारलं.
" ट्रॅव्हल भेटलीये त्याला, आता दोन दिवस तरी नाहीये. फोन केला होता". त्यानं आणलेली बियर ग्लासमध्ये ओतत तिनं उत्तर दिलं.
"आणि तुझी ती मुलगी, छकुली?"
"तिलाही झोपवलयं" .
कधीही आला तर त्याचे हे सुरवातिचे प्रश्न ठरलेले. मुद्दाम विचारल्यासारखे. या प्रश्नांनीच त्याला चेव फुटायचा. हल्ली तो नेहमीच यायला लागलाय. त्याचे प्रश्नही नेहमीचेच झाले होते. हा व्याभिचारही ठरवुन केल्यासारखा वाटत होता. आता यातही निरसपणा आलाय का? तिनं स्वत:लाच विचारलं.
पण चेंज म्हणुन त्याने आज बियर आणली होती.
"ए आज तु घेतलीच पाहीजे, थोडीशीच, बघ ट्राय करुन" कमरेत हात घालत त्यानं तिला जवळ ओढलं. तिनंही लटकं नको नको करत थोडीशी घेतलीच. थोडी थोडी करत अर्धा ग्लास संपवला.
"मस्त आहे रे हे, पण चव नाही आवडली" छताकडं उत्तान बघत ती म्हणाली. ही नशा काही वेगळीच होती. राहीलेली त्यानं संपवली.
"मग आज काय ट्राय करायचं?" तिला असले प्रश्न आवडाचेच नाहीत. केवळ अबोल प्रणय. तिला हवाहवासा. शब्दांवाचुन सगळं त्याला कळलं पाहीजे. त्याच्या कुशीत ती तशीच झेपावली.
या रात्रीचा कैफ काही औरच होता. अंगभर रोमांच पसरलेले. उन्माद ठासुन भरलेला. आज त्याला ती वेगळीच वाटली. ज्वानीच्या आगीत बहरुन गेल्यासारखी. एखाद्या नववधुसारखी आज ती हुंकारत होती. तोही अगदी कसलेल्या कलाकारासारखा तिला सुखावत राहीला.
आसुससलेली ती, ऊत्तुंग तो, उधानलेला प्रणय आणि ही व्याभिच्यारी रात्र. या रात्रीचा क्षण नी क्षण ऊपभोगला गेला. धुंद प्रीतीचं गीत गातच ही रात्र सरली.
सकाळी तो ऊशीरापर्यंत बेडरुममध्येच पडुन राहिला. तिनंही लवकर ऊठुन सगळ आवरलेलं. छकुली ऊठायची वेळ झालीय, आता याला लवकर जायला सांगायला हवं. ती बेडरुममध्ये गेली. त्याला ऊठवायचा प्रयत्न केला. तोही डोळे चोळत चोळत जागा झाला. दरवाजा ऊघडाच होता.
आतली चाहुल लागुन छकुली पळत पळतच बेडरुममध्ये शिरली. त्याला बघुन ती गोंधळली. दोन हात पुढे करत त्याच्या पोटावर पडली. त्याचे गालगुच्चे घेत आश्चर्यानं म्हणाली
" अरे पप्पा, तु गेलाच नाही का टुरवर? मज्जा! आज आपण वॉटरपार्कला जाऊया, पिकनिक करायला"
(एका विनोदावर आधारित)
मिसळपाव
मस्तच.
पण काय हो साहेब , गेली
In reply to पण काय हो साहेब , गेली by दा विन्ची
मोबाईलवर मराठी टंकता येऊ शकते
मस्त
आवडली
कुठेतरी वाचली आहे असे वाटतेय.
In reply to कुठेतरी वाचली आहे असे वाटतेय. by पीशिम्पी
मी एक विनोद वाचला होता अशाच
वा वा वा छकुलीची तर लॉटरीच
In reply to वा वा वा छकुलीची तर लॉटरीच by द-बाहुबली
किम्बहुना छकुली बरीच सराइत
In reply to किम्बहुना छकुली बरीच सराइत by द-बाहुबली
बहुतेक क्लायमँक्स चुकला बघा
In reply to बहुतेक क्लायमँक्स चुकला बघा by जव्हेरगंज
चंद्रबिंदीची फॅशन जोरात
In reply to चंद्रबिंदीची फॅशन जोरात by अभ्या..
"जव्हेरजंग आणि मोजि यांचा
In reply to चंद्रबिंदीची फॅशन जोरात by अभ्या..
चंद्रबिंदी म्हणजे काय पटकन
फालतू
तुमची लेखन शैली चांगली आहे
In reply to तुमची लेखन शैली चांगली आहे by स्रुजा
+1
In reply to +1 by चांदणे संदीप
पॉईंट नोटेड!
सुंदर
मस्त लफडं !
In reply to मस्त लफडं ! by प्रसाद गोडबोले
नै नै तसं नै ते.
In reply to नै नै तसं नै ते. by जव्हेरगंज
कळ्ळं होतं हो आम्हाला ...पण
In reply to कळ्ळं होतं हो आम्हाला ...पण by प्रसाद गोडबोले
आवं, हा जुनाच माल हाय!
In reply to आवं, हा जुनाच माल हाय! by जव्हेरगंज
आधी वेगळा 'पुरुषविभाग' काढा.
In reply to मस्त लफडं ! by प्रसाद गोडबोले
@ प्रगो, द बाहुबलि
काही कळले नही
काहीही कळले नाही!
नाही कळली.
घंटा कळलं नाही.....
?????
एक जोडपं. त्यांची एक मुलगी.
In reply to एक जोडपं. त्यांची एक मुलगी. by प्यारे१
>>>>>कधीही आला तर त्याचे हे
In reply to >>>>>कधीही आला तर त्याचे हे by प्यारे१
शेवटी इस्कुट झालाच तर!!!!
In reply to एक जोडपं. त्यांची एक मुलगी. by प्यारे१
दोनच प्रश्न...
हम्म
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
ख्याक!!!!!
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
बाँबंच फोडलाय ना!
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
हे जबर्या आहे
छान आहे.
In reply to छान आहे. by शलभ
पेपरमध्ये विनोद वाचला होता.
मस्त.
नै जम्या.
नेक्स्ट पार्ट प्लीज देअर मस्ट
ही कथा वाचुन "मिर्च" चित्रपट