Skip to main content

मौजमजा

सुटलेल्या पोटाची कहाणी -३

लेखक Anand More यांनी सोमवार, 07/12/2015 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१ भाग-२ __________________________________________________________________________________ निश्चय केला, मनातल्या मनात भीष्म की कायशीशी प्रतिज्ञा केली, 'पोट आत घेणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी ते आत घेणारच'. प्रतिज्ञा केल्यावर जाणवले बहुतेक हा हक्क नसून कर्तव्य असावे, पण मग शाळेत नागरिकशास्त्राच्या तासाला, 'हा मुलगा वर्गाचा नागरिक नसलेला बरा' असेच सर्व शिक्षकांचे मत असल्याने मी कायम outstanding विद्यार्थी राहिलो होतो, त्यामुळे अश्या चुका होणारंच अशी स्वतःची समजूत काढून घेतली.

सुटलेल्या पोटाची कहाणी -२

लेखक Anand More यांनी शनिवार, 05/12/2015 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१ क्लासला दिवाळीची सुट्टी सलग पाच दिवस दिली होती. घरी निवांत होतो. तीन चार नवीन पुस्तकं आणून ठेवली होती. त्यामुळे खुशीत होतो. दिवाळीचा फराळ करत पुस्तक वाचत बसलो होतो. ही शेजारी येउन बसली आणि अगदी हलक्या सुरात लाडीगोडीने बोलू लागली.

सुटलेल्या पोटाची कहाणी -१

लेखक Anand More यांनी शुक्रवार, 04/12/2015 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
ही सगळी कहाणी सुरु झाली दिवाळी पासून . मला कल्पनाच नव्हती की मी या कहाणीचा हिरो आहे म्हणून. म्हणून आधी सगळे अनुभव टिपून ठेवले नव्हते. त्यामुळे आता जसे तुकड्या तुकड्याने आठवतायत तसे लिहितो. जर दोन तुकड्या मधलं अंतर जास्त वाटलं तर खुशाल समजा की चाळीशीच्या उंबरठ्यावर असल्याने मध्ये मध्ये येणाऱ्या विरक्तीच्या झटक्याने, मी या सर्व उपद्व्यापातून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत असीन. --------------- हा तर मी काय म्हणत होतो. २०१५ ची दिवाळी आली. ऑफिस मधल्या मुलींनी ऑफिस सजवायचा घाट घातला. त्यांचा उत्साह पाहून मी देखील हो म्हटलं. पोरींनी छान सजवलं ऑफिस. मी पण खूष झालो.

बाबा तू चुकला रे

लेखक मित्रहो यांनी मंगळवार, 01/12/2015 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
(हल्ली कुणीही उठतो आणि शिक्षणाला नावे ठेवतो. मी शिकलो नाही, अभ्यास केला नाही, पिरेड केले नाही, शिक्षणात ढ होतो हे सार अभिमानाने सांगतो.

साज़

लेखक मारवा यांनी शनिवार, 28/11/2015 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वात अगोदर एक म्हणजे मी संगीताचा कुठल्याही प्रकारचा जाणकार नाही. दुसरं सर्व लेख आठवणींवर आधारीत त्यामुळे डळमळीत. थोडी कुठे कुठे गल्ली चुकण्याचीही शक्यता आहेच.. तर आपल्या हीन्दी सिनेमांची गाणी म्हणजे अनेक प्रतिभाशाली संगीतकारांनी योगदान दिलेला आनंद खजिना आहे. कधीही जा दार उघडा दोन चार गाणी घ्या और गम भुला दो सारे संसारके. हा आपला सर्वांचाच अनुभव. तर या विवीध गाण्यांत विवीध संगीतकारांनी अत्यंत कलात्मकतेने व कुशलतेने अनेक वाद्यांचा वापर केलेला आहे. या धाग्याचा विषय हा वाद्यांचा जिथे अप्रतिम वापर झालेला आहे त्या गाण्यांविषयी बोलणं हा.

(जिलेबी कथा - लिहायचे नियम)

लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 27/11/2015 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
'पेरणी'साठी बियाणे! मिसळपावच्या आशीर्वादाने व मिपाकरांच्या साक्षीने आम्ही "धाग्यांच्याबागेत भेटेन तुला मी" या कथामालेची सुरूवातीच्या आधीच सांगता करत आहोत! प्रस्तुत लेख हा आजच प्रकाशित होणार आहे. तरीही हा लेख वाचून इथून पुढे आपला जिलेबीलेख/कविता/काथ्याकूट/पाकृ लिहायची काही पथ्ये! १. कथा शक्यतो १च भागात द्यावी किंवा जास्त स्क्रोल करायला लावून कुणाकडूनही 'भाग थोडे मोठे टाका' किंवा 'हात दुखला स्क्रोल करून' अशी प्रतिक्रिया मिळवून आपल्या अतिशहाणपणाचा प्रत्यय देऊ नये.

दोन वेडे - उपसंहार

लेखक DEADPOOL यांनी मंगळवार, 24/11/2015 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
मार्कवर देशद्रोहाचा खटला भरला गेला! त्याचा काहीही उपयोग नव्हता, कारण 'पूल ऑफ़ डेड' मधे त्याचा अंत झाला! डेड्पूल अमेरिकी सरकारच्या मानवताविरोधी कारवायांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देत होता! शेवटच्या लॉझगन्स कुठे वापरल्या जाणार हेही ठरलं होत! भारत अमेरिका युद्ध! जनरल सोन्याबापू ह्याच चिंतेत होते. कारण लॉझ्गन्स विरोधात त्यांच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते! "सर आपल्यासाठी पत्र आले आहे" बापूंनी चिंतेत पत्र हातात घेतले! "लॉझ्गन्स वर उत्तर!"पत्रात लिहिले होते! त्या पत्राबरोबर एक केमिकलची बाटली देखील होती!!!!

सुधांशु नूलकर काकांसोबत ओरिगामी कट्टा- २२ नोव्हेंबर २०१५

लेखक प्रसाद गोडबोले यांनी मंगळवार, 24/11/2015 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
सुधांशु नूलकर काकांसोबत ओरिगामी कट्टा- २२ नोव्हेंबर २०१५ नुकताच सुधांशु नूलकर काकांसोबत ओरीगामी कट्टा पार पडला. तेव्हा काढलेली काही प्रकाशचित्रे येथे मिपाकरांसोबत शेयर करीत आहे. तशी कट्ट्याला चर्चा बरीच झाली पण सध्या कसें आहें कीं संपादक विश्रांती घेत असल्याने , उगाच काही वाद उद्भवु नये अन आमचा आयडी ( ह्या कारणाने ) संपादित होवु नये म्हणुन कट्ट्याचा वृत्तांत लिहिण्याचा मोह आवरत आहे. मिपा धोरणानुसार चारोळी धागे उडवले जातात तसे होवु नये म्हणुन उगाचच वरील ३ आणि हे वाक्य खरडले आहे , एरव्ही हा धागा ह्त्म्ल वापरुन अन एक्सेलमधे प्रोग्राम लिहुन लिहिण्यात आलेला आहे. प्रचि क्

धडा

लेखक इडली डोसा यांनी रविवार, 22/11/2015 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
नऊ - दहा वर्षांपूर्वीची गोष्ट . आमच्या कंपनीत आमचा एक ट्रेक करणारा ग्रुप होता. पुण्याच्या आसपास छोटे मोठे ट्रेक करायचो. कधी सकाळी जाऊन संध्याकाळी परत तर कधी मुक्कामी. फार भारी वाटायचं. कुठंही ट्रेकला जाताना नवीन कोणी सोबत येत असेल तर त्याला काय काय सोबत घ्यायचं , काय करायचं , कसं वागायचं याच्या असंख्य सुचना आम्ही द्यायचो. ट्रेकिंग म्हणजे 'अपने बायें हात का खेल'' असं झालं होतं.अशातचं एका मित्राने बातमी आणली कि नाशिक जवळ कुठेतरी दहा पंधरा दिवसांनी एक ट्रेकिंगची स्पर्धा होणार आहे. स्त्री, पुरुष आणि मिश्र अश्या तीन गटांत स्पर्धा होणार होत्या. मग काय आमची ग्रुप जुळवा जुळविची तयारी सुरु झाली.

दोन वेडे - २

लेखक DEADPOOL यांनी बुधवार, 18/11/2015 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
हॉल! लॉझ बनवायची जागा! अनेक कामगार येथे काम करत. जगातली सगळी सुरक्षा अमेरिका येथे पुरवत होती. १००० सैनिक येथे तैनात होते.