मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(नाट्य लिबर्टी)

अविनाशकुलकर्णी · · जनातलं, मनातलं
जगावं की मरावं हा एकंच सवाल आहे !! कुणी मिसळ देता का मिसळ ? हो मिसळ... मामलेदाराची चालेल... फडतरेची चालेल..वैद्याची चालेल.. प्रभांची पण चालेल. एका मिसळप्रेमीला तुफानाला कुणी मिसळ देतं का ?मिसळ... एक तुफान … कांद्या वाचून …. तर्री वाचून …. मिसळेच्या मायेवाचून …देवाच्या मिसळी वाचून … गावा गावातून हॉटेलात हिंडते आहे … मिसळ चापताना जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा धुंडतं आहे … कुणी मिसळ देता का रे ??? मिसळ ?..तर्रीवाली मिसळ..असा तवंग हवा तेलाचा तर्री वर....पावाच्या लाद्या हव्या.लिंबाच्या फोडी हव्यात...ग्लास भर ताक हवं.....पहिल्या घासात ठसका हवा..मिसळ..हो मिसळ .....कुणी मिसळ देता का रे ??? मिसळ ?.. मिसळ सम्राट.. निवृत्त मामलेदार मामा नाटेकर मिसळकर (नाट्य लिबर्टी)

वाचने 1737 वाचनखूण प्रतिक्रिया 5

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 22/04/2016 - 07:37
काका, तुम्ही कुठे आहात ? काय तरी चांगलं लेखन, कथा घेऊन या. -दिलीप बिरुटे