'शिग्रेट'!
लेखनप्रकार
'शिग्रेट'! शिग्रेट लागती काकाला.
मला दोन रुपय दिलं आन मनालं
"जांब्या, जारं बिस्टाल घीऊनं यं"
बिस्टाल दिड रुपायाची आन आठाण्याचं चाकलेट मला.
सुरकीच्या दुकानातनं म्या बिस्टाल घीतली आन एक काफी चाकलेट. लय गॉड आसतं. मज्जा. चिमणीच्या दातानं तायडीला ऊल्स. बाकी समदं मला.
पण हातात बिस्टाल. लय पांढरी, मागं मऊ मऊ गादी. घातली तोंडात. आहा! मज्जा! दोन झुरकं बी घेतलं. खोटंखोटं. चुटकी वाजवून राख पण झाडली. आहा! मज्जा!
मग काका दिसला. शिग्रेट दिली. त्यानं तोंडात घालून काडी वढली.
"तोंडात घालून आणली कारं?"
"न्हाय बी"
मग हातात घीऊन त्यानं बघीतली
"हि काय, समदा फिल्टर वला वला झालाय, लका त्वा तोंडातच घातली हुती, पळ भाड्या"
मग आमी पण सुटलो.
शिग्रेट तोंडात घातल्यावर म्हागच्या गादिला जीभ लावायची नसती, हे तवाच समजलं, जरा लवकरच न्हाय का?
वाचने
5505
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
=))
मस्त.
आंजी ची आठवण आलि... :))
मस्त जव्हेरभाऊ.
एखादे कॅरॅक्टर करुन टाका तयार मस्तपैकी आंजीसारखेच.
ड्यांबिस अन चाब्रे.
In reply to मस्त जव्हेरभाऊ. by अभ्या..
मज्जा!
भारी...
पोतडी खोला जरा..
:)
सहीये...:)
.
"म्हागच्या गादिला जीभ लावायची नसती" =]]
हाहाहा . . मस्तच . हे पहिल्या दोन झुरक्यात नाही समजलं तर काही उपयोग नाही
लोल .. मस्तच !
चांगली आहे..
एवढ्या कथा सुचतात कशा? डोळ्यांच्या ठिकाणी magnifying glass आहे तुमच्या!
_/\_
:-)
येव्हड्याशा गोष्टीतुन येव्हड सांगाता तुम्ही खरच. __/\__
आवडली.
मस्त
पु. ले. शु.
मस्त आहे!
म्हंजी आनुभव हाय....
पहिलि षिग्रेट आथ्वलि
=)) मस्त.