समस्त मिपाजनांना नानबाचा नमस्कार.
शिक्षण आणि नोकरीनिमित्त मुंबई, इंदौर, पुणे असा प्रवास झाल्यानंतर नव्या संधीच्या शोधात गेल्या आठवड्यात सिडनी शहरी येऊन टेकलो. परदेशाचं अप्रूप, नव्याची नवलाई, स्वच्छता आणि टापटिपीचं कौतुक अशा टिपीकल विचारसरणीत सुरूवातीचे काही दिवस गेल्यानंतर आता हळूहळू रोजच्या वाटेवर रूळतोय.
पण अभ्यास आणि कॉलेजनंतर गप्पाटप्पा मारण्यासाठी, सुट्ट्यांच्या दिवशी भेटीगाठी करण्यासाठी कोणी आपलं मिळालं तर त्याचा शोध घेतोय. आहे का कोणी मिपाकर सिडनीत? माझ्या माहितीत सध्या सिडनीत अंदाजे १.५ लाख मराठीजन वास्तव्याला आहेत. त्यांपैकी कोणी मिपाकर असल्यास मला संपर्क करा.