Skip to main content

मांडणी

मांडणी — विषयांची नेटकी मांडणी करणारे मराठी लेख. विचारांची सुसूत्र मांडणी आणि विश्लेषण येथे वाचा.

अरविंद बरोबर दीड तास!

लेखक संजय क्षीरसागर यांनी गुरुवार, 20/03/2014 13:24 या दिवशी प्रकाशित केले.

India Today Conclave 2014 मधे अत्यंत सधन, निष्पक्ष आणि विचारवंत लोकांसमवेत अरविंद केजरीवालांचा झालेला हा पूर्णपणे खुला संवाद तुमच्या-माझ्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतो. दीड तास लोकांचं अवधान एकचित्त आहे आणि कुणाही पूर्वग्रहरहित व्यक्तीचं तसं राहील यात शंका नाही.

नसतील शब्द जिवंत जर का

लेखक वैभवकुमारन यांनी सोमवार, 17/03/2014 14:08 या दिवशी प्रकाशित केले.

(व्याकरणामध्ये चुका झाल्या असतील तर समजून घ्यावे)

नसतील शब्द जिवंत जर का
अबोल राहतील नातीगोती
शब्दावाचून मुके अर्थ हे
रडत बसतील हळव्या पोटी

नसेल रुसवा नसेल फुगवा
नसतील ओळी सुंदर ओठी
शब्दावाचून ओठांच्या ह्या
होणार नाहीत गाठी भेटी

देवही तिकडे मलुन होतील
भजनावाचून वीझतील वाती
पुस्तक डोळे मीटुनी म्हणेल
माझी नाही राहीली ख्याती

बाळाला ही झोपवताना
अंगाईविना सरतील रात्री
कविवर्याच्या कल्पकतेला
शब्दावाचून लेगेल कात्री

लिहाव म्हणतो काहीबाही ...

लेखक फुंटी यांनी गुरुवार, 13/03/2014 14:06 या दिवशी प्रकाशित केले.

काहीतरी लिहाव अस्माबंध डोळे मिटून उमटेल तस.आठवेल तो शब्द लिहावा .कोंबडी अंड .धागे जुळवावेत सूक्ष्म.खोट लिहतो तसं .भेंडी .मुला उचल ती पाती ,वाचणार कुणी नाही तरी...बर्फ एम् आर आय काढून मेंदूचा .लिहाव ...विचार सापडतील रिपोर्ट मध्ये......किडा मेंदूचा ...भुंगा ,उवा,लिखा,खाजाव्तोय भुवई डावी..लावावा मलम खाजेवर...शांत ..ताडी..छोटा हत्ती ..रेंज..कड घेईन जत्रेत नवीन....कबुतर फडफडल....भडवा फोनेवर बोलतोय .फोन कशाला पायजे ...ओरड तसाच....पोपडे निघालेली खोली...मळलेली चादर ...बिछाना ...जंगल ..फुटीर उमेदवाराला चोपला....रिक्षातील बाईच पोस्टर...चाकोरी.ग्लानी...डुलकी...टीप ...शाळा सुटली...टपकला शब्द मनात की उ

MH370 - फ्लाईट डीलेड..

लेखक गवि यांनी मंगळवार, 11/03/2014 14:19 या दिवशी प्रकाशित केले.

व्हर्गा हा पावसाचा एक प्रकार आहे.. तो जमिनीवर पोचण्याआधीच वाफ होऊन नाहीसा होतो.

व्हर्गासारखं हवेत नाहीसं झाल्याचा भास देणारं मलेशिया एअरलाईन्सचं बोईंग विमान. सगळेजण या विचित्र घटनेविषयी सर्वत्र वाचत आणि ऐकत आहेतच. तरीही काही इतर नाही तरी महत्वाच्या वाटणार्‍या गोष्टींची एक यादीच का होईना, पण बनवण्यासाठी टंकणं अनिवार झालं.

या फ्लाईटसाठी वापरलेलं विमान म्हणजे बोईंग ७७७ - २०० ई आर. (777-200ER)

सिडनीस्थित मिपाकर आहेत का कुणी?

लेखक नानबा यांनी मंगळवार, 04/03/2014 13:29 या दिवशी प्रकाशित केले.

समस्त मिपाजनांना नानबाचा नमस्कार.

शिक्षण आणि नोकरीनिमित्त मुंबई, इंदौर, पुणे असा प्रवास झाल्यानंतर नव्या संधीच्या शोधात गेल्या आठवड्यात सिडनी शहरी येऊन टेकलो. परदेशाचं अप्रूप, नव्याची नवलाई, स्वच्छता आणि टापटिपीचं कौतुक अशा टिपीकल विचारसरणीत सुरूवातीचे काही दिवस गेल्यानंतर आता हळूहळू रोजच्या वाटेवर रूळतोय.

उभारी देणारे असे काही

लेखक पिंपातला उंदीर यांनी रविवार, 23/02/2014 11:03 या दिवशी प्रकाशित केले.

struggle शब्दाचा एक लोचा आहे . आपल्याकडे हा शब्द आर्टस ला admission घेणाऱ्या , नाटक -चित्रपट क्षेत्रात career करू इच्छिणार्यां आणि दहा ते पाच ची चाकोरी सोडून वेगळी वाट चोखाळणार्या लोकाना उद्देशुन वापरला जातो . मुळात मला अस वाटत की प्रत्येकजण हा त्याच्या / तिच्या पातळीवर एक struggle करतच असतो. म्हणजे बापाशी बिघडलेले संबंध पुर्ववत करण्यासाठी धडपडणारा पोरगा हा एक struggle च करत असतो . नौकरी मध्ये बॉस आपली ठासत आहे हे कळत असून पण नौकरी टिकवण्यासाठी धडपड करणारा मध्यमवर्गीय माणूस पण रोज संघर्ष करीतच असतो.

माझी मैत्रीण

लेखक दिव्यश्री यांनी मंगळवार, 18/02/2014 17:20 या दिवशी प्रकाशित केले.

कोणताही पूर्वग्रह न ठेवता हा लेख वाचावा .मी ५० /१०० प्रतिसादांसाठी (ट्यार्पी) लिहिलेले नाही.यामध्ये कोणतीही झैरात/झायारात/जाहिरात करण्याचा हेतू /उद्देश नाही. बाकी आपल्या अनुभवांचे अर्थातच स्वागत आहे.

माझी मैत्रीण ,जिने मला माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात वाईट आणि कठीण प्रसंगात मला साथ दिली ,आधार दिला, मला समजून घेतेलं आणि माझी खूप काळजी घेतली ती आमच्या प्यांटवाल्यांची आई ,अर्थातच माझ्या सासूबाई. :)