Skip to main content

मांडणी

नेताजींचे सहवासात पुस्तक परिचय - भाग ३(अ)

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 23/01/2014 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
नेताजींचे सहवासात 1 2 मित्रांनो, आज नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती आहे. त्या निमित्ताने या पुस्तकाचा परिचय भाग 3 सादर करीत आहे. आज तिथीनुसार स्वामी विवेकानंदांची जयंतीही साजरी होत आहे. (दिनांकानुसार दि 12 जानेवारी) भाग 3 (अ) - नेताजी निवास सिंगापूर बेटाच्या पुर्व किनाऱ्यावर समुद्रकाठी एकएका धनिकांचे ऐसपैस बंगले आहेत.

करड्या (शतशब्दकथा)

लेखक योगी९०० यांनी बुधवार, 22/01/2014 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
"आर ए करड्या... कुठं मेलास रं !!" सकाळपासनं करड्या दिसला नाही कोठेच.. सारखा ढुशी मारायचा प्वटात. आई लई ओरडायची पण करड्याची शिंगे लागली नाहीत कधीच.. सकाळपासनं म्याबी झ्याक बिझी व्हते. नव्या वहीनीला स्वैपाकात मदत केली. जेवण झाल्यावर मात्र करड्याची लई आठवण आली. दादाच्या लग्नाअगोदर दोन दिवस आधीच आमच्याकडं करड्या आला होता. तेव्हापासनं सारखा माझ्याबरोबरच असायचा, जीव लावला त्यानं. माझा बायफ्रेंड म्हणायचे त्याला सगळे.. एकटाच गेला असेल माळावर बोंबलत चरायला.. चकणीला विचारते.. "काय गं चकणे, करड्याला घेऊन गेली व्हतीस?" "आता करड्या करड्या करतेस..

ट्रोजन युद्ध भाग २.५ - पॅट्रोक्लसचा अंत्यविधी आणि प्रिआमची यशस्वी गांधीगिरी-हेक्टरचा अंत्यविधी.

लेखक बॅटमॅन यांनी शनिवार, 11/01/2014 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २.१ भाग २.२ भाग २.३ भाग २.४ पॅट्रोक्लसचा अंत्यविधी मागील भागात सांगितल्याप्रमाणे अकिलीसने हेक्टरची डेडबॉडी रथामागे फरपटत आणली आणि पॅट्रोक्लसच्या चितेजवळ तशीच ठेवून दिली आणि आगामेम्नॉनला

शतशब्द कथा (वृद्धाश्रम)

लेखक योगी९०० यांनी शुक्रवार, 10/01/2014 08:34 या दिवशी प्रकाशित केले.
अतिवास आणि खेडूत यांच्या लिखाणामुळे प्रेरीत होऊन एक शतशब्द कथा लिहायचा प्रयत्न करतोय...कोठेतरी वाचलेल्या एका संवादाचे हे एक छोटे रुपांतर आहे... चु.भू.द्या.घ्या. --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- "बाबा लवकर उशीर होतोय मला..." सातव्यांदा गुणेश खेकसला..”च्यायला रिक्षा/टॅक्सीचा आजच संप असावा आणि आजच बॉसने लवकर ऑफिसला बोलवावे.?” अरे बाबा, तुला उशीर होतोय तर मी एकटाच जातो. आता जवळच आहे.. नको नको, जड बॅग घेऊन या उन्हात तुम्हाला चालवेल? जमेल रे, हळू हळू जातो….

ट्रोजन युद्ध भाग २.४- अकीऽऽलिस! अकीऽऽलिस!! अकीऽऽलिस!!!

लेखक बॅटमॅन यांनी मंगळवार, 07/01/2014 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २.१ भाग २.२ भाग २.३ पॅट्रोक्लसच्या प्रेताभोवती तुंबळ कापाकापी होते. मागच्या भागात अकिलीसचा भाऊ पॅट्रोक्लस हेक्टरच्या हातून मरण पावला त्याचा वृत्तांत आलेला आहे. तो मेल्यावर माशा घोंगावाव्यात तसे त्याच्या प्रेताभोवती ट्रोजन घोंगावू लागले.

ट्रोजन युद्ध भाग २.३-इलियडमधील हेक्टरपर्व आणि पॅट्रोक्लसचा मृत्यू.

लेखक बॅटमॅन यांनी रविवार, 05/01/2014 05:02 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २.१ भाग २.२ सर्वप्रथम या लेखमालेतला हा चौथा भाग येण्यास कल्पनातीत उशीर झाला त्याबद्दल सर्व वाचकांची क्षमा मागतो. कधी हे नैतर ते अशी नाना खेकटी मध्ये आल्यामुळे फार वेळ गेला. पण गेले काही दिवस काम सुरू असून आता ही लेखमाला लौकरच वेग घेऊन संपेल याची ग्वाही देतो. पुढचा लेख तयार आहे, लगेच टाकणारही आहे. यापुढे असे होणार नाही.

दूध

लेखक कुमारकौस्तुभ यांनी सोमवार, 30/12/2013 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
आजच सकाळी दैनिक दिव्य मराठी त आलेल्या एका बातमीने लक्ष वेधुन घेतले. ती अशी की महाराष्ट्राचे कामगारमंत्री हसन मुश्रीफ़ यांनी कुठल्याशा कार्यक्रमात (राजकारण्यांच्या टीपीकल तुलादान इ. सारख्या) स्वत:वर दुधाचा अभिषेक करुन घेतला व दुधाची भरपुर नासाडी या कार्यक्रमात त्यांच्या निष्टावंत कार्यकर्त्यांनी केली. या घटनेवर डॉ. राणी बंग यांची प्रतिक्रीया आली आहे ती अशी की, राज्यातील बरीच मुले अन स्त्रिया कुपोषणाच्या जंजाळात अडकल्या असताना स्वत:वर दुधाचा अभिषेक करुन घेण्याचे कामगारमंत्री हसन मुश्रीफ़ यांचे कृत्य लज्जास्पद अन घृणास्पद असुन यामुळे पुरोगामी महाराष्ट्राला एक प्रकारे ठेच पोहोचली आहे.

मला जेवायला बोलावले तर बायको, बोलावणर्‍याच्या ग्रुहीणीस खास फोन करून सांगते

लेखक विदेशी वचाळ यांनी शुक्रवार, 27/12/2013 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस माझ्या इंजिनियरिंग च्या शिक्षणाचे होते. ९१ किंवा ९२ सालचे. मी नांदेड ला होतो. हे दिवस तसे मजेचेच असतात. "आम्ही काय कोणाचे खातो रे? तो राम आम्हाला देतो रे" असे म्हणत घरून आलेल्या ६०० रु च्या पत पुरवठ्यावर, नाक वर करून जगण्याचे दिवस. ह्या वयातले पाप्याचे पितर पण पहिलवनला लालकरात फिरत असते. तर ते दिवस होते. नांदेड चे गवर्नमेंट इंजिनियरिंग कॉलेज हे सरकारने ग्रामीण उत थॅना साठी सुरू केले होते. पण मुळे सगळी वेग वेगळ्या यूनिवर्सिटी मधून यायची. त्यामुळे खुद्द नांदेड ची मुले बोटा वर मोजली तरी काही बोटे तशीच उरायाची. बर वय म्हणाल तर "भलतेच बूभुक्षीत" वय असायचे. जेवणावळ दोन वेळचे जेवण द्यायची.

धुसरिका - व्युत्क्रम

लेखक जातवेद यांनी मंगळवार, 17/12/2013 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
कधितरी झाडांवर सावली पडेल पण मग सुर्य ढग फ़ाडून टाकेल अक्कलकोटला जाउन यावं म्हणतो विषयांतर करू नकोस विकासाच्या गतीची ऐशी तैशी चहा पिताना कपात बसली माशी नुस्तां वेंधळा आहेस असं म्हणुन गेली कालची फ़ॅटल एरर कोण काढली? सरता सरता काळ सरेना काय मस्त खेळती ही सेरेना मी दोन चार ठिकाणी अप्लाय् केलय टाटा माझा स्वीकार करा

~झालंया सगळ येगळ~

लेखक वैभवकुमारन यांनी सोमवार, 16/12/2013 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
झालंया सगळ येगळ आता ... रगात भी घालतंया घोळ आप -आपल्यात मीसळतानाभी वाचतया रक्तगटाची ओळ सगळं झालया तुटक-तुटक .. नात्याला कृत्रीमतेची ओल बोलणं फकस्त जवळ आलंया .. शब्द राहिल्याती अबोल भाऊ नाही मनात कुणी ... रडतीया चंद्राची ती कोर भाकरीनभी ओळ्ख बदललीया .. नग म्हणतीया चूल पिसेच वहित ठेवत नाही कुणी .. झालाय दु:खी तिकडे मोर पाया पडून मूर्ती चोरतुया ...इतका नास्तिक झालाय चोर आंब्याच भी बालपण गेलया ...आणलाया लहानपणीच मोहोर शब्दाच भी वय वाढलया .. लावत्याती कुणाच्याभी जीवाला घोर दुष्टाची ती चक्र रंगवुनी , पिवळ पिकलया ते ऊर पंख फुटलेकी कि पक्षी उडतुया , नग म्हनतुया घर झालंया सगळ येगळ आता ...