पद्म पुरस्कार… सन्मान की खैरात ?
देशातल्या सर्वोच्च अशा पद्म पुरस्कारांची घोषणा होते. लगेच त्यावरुन वाद होतात. काही काळ तरी आपली चांगली करमणूक होते. या वर्षाच्या सुरुवातीलाच ‘पद्म’ वरुन दक्षिणात्य गायिका एस. जानकी, कुस्तीवीर सुशीलकुमार यांच्या मानापमान सोहळ्याचीच जास्त चर्चा झाली. खरं तर त्यावेळीच म्हणजे जानेवारीत मी हा ब्लॉग लिहायला घेतला होता. पण नेहेमीप्रमाणेच आळस आणि पार्किन्सन्स लॉ या दोन्हींमुळे लिहिणं मागे पडलं.
आता पद्म पुरस्कारांवरुन पुन्हा चर्चा सुरु आहे. पुरस्कार मिळालेले दिग्गज पद्मरत्न, या पुरस्कारांसाठी आपल्या घरच्यांचीच कशी शिफारस करतात वगैरे बातम्या सुरु झाल्या.
मिसळपाव
Cubism चा प्रभाव आणि त्या बाहेर पडण्याचे प्रयत्न
याच काळात एक दुर्दैवी घटना घडली दालीच्या आई चा मृत्यु झाला. आणि वडीलांनी दुसरे लग्न त्याच्या आईच्या च बहीणीशी केले. या घटनेचा खोलवर परीणाम दाली च्या मनावर झाला. मात्र त्याची एकीकडे चित्रकलेत चांगली प्रगती सुरु होती. तो तेथील फ़ेमस Prado म्युझियम मध्ये तासन तास घालवित असे व तेथील युरोपियन मास्टर्स च्या पेंटीग्जचा बारकाइ ने अभ्यास करीत असे.