Skip to main content

मांडणी

स्व. श्री. गोपाळ बोधे - तरुणपणीच्या मित्राला निधनानिमित्त अभिवादन

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 18/05/2014 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
1 हवाई छायाचित्रकार - श्री गोपाळ बोधे. सांगलीच्या चिंतामणराव कॉमर्स कॉलेजमधून शिकत असताना एक टंगाळे व्यक्तिमत्व धीटपणे उभे राहून आपल्या शंका, माहिती देत असे. सडपातळ अंगकाठी, दातांची पंगत पुढच्या रांगेत, हसून आपली ओळख बाळ बोधे म्हणून करून देई. त्याच्या पाठीमागे बाळचे विविध अपभ्रंश बोलले जात ते त्याला त्रास देत नसत. कालांतराने त्यांनी नेव्हीत सिव्हिलियन कर्मचारी म्हणून करियर सुरू केले.

मैत्र

लेखक सुवर्णमयी यांनी सोमवार, 28/04/2014 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व फोरम्स वर श्रावण मोडक याच्या लेखनाचे दुवे एकत्रित केलेले आहेत. त्याचे पुस्तक वा ईबुक कालांतराने होणार होतेच. कमीत कमी किमतीची वा फ्री ईबुक्स हा त्यांचा आणि साहित्यसंस्कृतीचा एकमत असलेला सुरुवातीपासूनचा महत्त्वाचा मुद्दा! त्या अनुषंगाने उचलेले हे आणखी एक पाऊल.- श्रावण मोडक यांच्या लेखनातली व्यक्तीचित्र आता ई बुक स्वरूपात उपलब्ध आहेत.लवकरच त्यांच्या कथा आणि काही नोंदी यांचे ईबुकही प्रकाशित होईल. त्याचे सर्व हक्क श्रीमती लीला मोडक यांच्याकडे आहेत.

रामबाण रामराज्य

लेखक आशु जोग यांनी सोमवार, 21/04/2014 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
भारत हा सेक्यूलर देश आहे असे असतानाही आमचे अनेक नेते देवळात काय जातात, देवाचा आशीर्वाद काय घेतात... काही विचारू नका... . लक्ष्मणासारखा भाऊ, रामबाण उपाय, रामराज्य असे शब्दप्रयोग आमच्या देशात आजही केले जातात... आपल्याला एखादी गोष्ट माहीत नसेल तर बिनधास्तपणे 'रामजाने' म्हटले जाते पण यामुळे हळव्या लोकांच्या भावना दुखावत असतील याची कुणालाच पर्वा नाही... असो... अशी रामबाण, रामराज्य सारखी आणखी काही उदाहरणे सांगता येतील का... .

किंग, क्वीन नि आणखी काही.

लेखक प्यारे१ यांनी शनिवार, 12/04/2014 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक स्त्रीच्या मनात एक क्वीन असते म्हणे. ती सापडण्याचा क्षण टिपणं आवश्यक असतं. पुरुष तरी का अपवाद असावेत? क्वीन सापडणं हा स्वत्व गवसण्याचा क्षण असावा असं तो चित्रपट पाहिलेल्या लोकांची मतं वाचताना जाणवलं. तसंच असेल! .................. सातवीच्या वर्गात असलेला पण वर्गात कधीच न बोलणारा मुलगा शिक्षकांच्या आग्रहामुळं एका वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतो. स्पर्धेवेळी सगळ्यांची भाषणं ऐकून हातपाय गळपटलेला, काय बोलायचं ते न आठवता जसं सुचेल तसं धाडकन बोलून खाली बसतो. नंतर स्पर्धेत तिसरा मिळालेला क्रमांक. इथं 'किंग' सापडत असेल का? ----------------- नुकताच दहावीला चांगले मार्क मिळवून कॉलेजला आलेला तो.

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार

लेखक आयुर्हित यांनी शुक्रवार, 11/04/2014 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
ही सत्यकथा आहे ओसाड व सर्व जंगलतोड झालेल्या व पाण्याचे सदैव दुर्भिक्ष असलेल्या एका दूरवर असणाऱ्या माळरानावरच्या एका पाड्याची, जेथे ५६ वर्षात स्वतंत्र भारत किंवा महाराष्ट्र शासनाचा कोणताही अधिकारी पोचला नसेल! ही सत्यकथा आहे एकट्या शिलेदाराची, जो आपल्या या छोट्याशा पाड्यातून सर्वात प्रथम उच्च शिक्षण घेवूनही सरकारी नोकरीच्या मागे न लागता आपल्या पाड्याला सुजलाम सुफलाम बनवणाऱ्या एका आदिवासी तरुणाची आणि त्याच्या उच्च ध्येयाची!

चलती का नाम गाडी-१: टोयोटा रिकॉल

लेखक खेडूत यांनी शुक्रवार, 11/04/2014 04:00 या दिवशी प्रकाशित केले.
मुलांना कार आणि मुलीना बाहुल्या खेळायला आवडतात असा एक समज असतो . मला लहानपणी गाड्या फार आवडत. पुढे या क्षेत्रात मागील काही वर्षे काम करायला मिळतंय तेव्हाचा आनंद काय विचारता! या मालिकेची सुरुवात खरं तर जून २०१३ ला जाग्वार वरील लेखाने केली होती. त्यावेळी मिपा अचानक बिघडल्याने उत्साह जरा कमी झाला अन नंतर राहून गेलं. तिथले अनेक माहितीपूर्ण प्रतिसाद पण उडून गेले. असो. आता पुन्हा प्रयत्न करतोय. चलती का नाम गाडी-१: टोयोटा रिकॉल दुकानात नारळ पण वाजवून घ्यायचा आणि खराब निघाला तर परतीच्या बोलीवर आणायचा. अशा काळात आम्ही लहानाचे मोठे झालो.

क्वीन - माझ्या मनातली

लेखक मधुरा देशपांडे यांनी गुरुवार, 10/04/2014 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
क्वीन बद्दल अगदी पहिल्या दिवसापासून सतत चांगले वाचायला मिळाले. पिरा ने जो लेख लिहिला तो तर प्रचंड आवडला. त्यावर आलेल्या अनेक प्रतिक्रिया देखील उत्तम होत्या. सगळं वाचून एक कल्पना करू शकत होते की साधारण काय असेल. चित्रपटाचा आशय हळूहळू उलगडत होता. मग त्यावर बरीच इतर चर्चा सुद्धा झाली. ती चित्रपटा इतकीच गाजली. अजूनही काही ना काही निघतच आहे. मग युरोपच का, त्यात पुन्हा अमके शहरच का किंवा चांगलेच अनुभव कसे इ. इ. त्यावर आलेले पुन्हा चांगले वाईट प्रतिसाद. हे सगळं वाचताना मला माझ्या आयुष्याताल्याच काही जुन्या घटना आठवल्या. त्या काळापुरती चित्रपट न बघताही मी रानीशी जोडले गेले.

क्विन...

लेखक पिलीयन रायडर यांनी मंगळवार, 01/04/2014 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
परवा खुप दिवसांनी थेटर मध्ये जाऊन पिक्चर पाहिला.. पॉपकॉर्न खात.. क्विन! आवडला.. जाम आवडला.. क्विन मध्ये कंगनाचा अभिनय.. कथानक.. संवाद.. गाणी वगैरे सगळच आवडण्या सारखं असलं तरी मला तो वेगळ्याच कारणांसाठी आवडलाय.. भारत वर्षातली.. दिल्लीकडची.. अत्यंत पारंपारिक वातावरणात वाढलेली एक मुलगी.. अगदी लहान सहान गोष्टी पण आई वडीलांना विचारुन करणार.. बाहेर जाताना भावाला घेऊन जाणार.. पुढे जॉब करायचा की नाही हे होणार्‍या नवर्‍याला विचारणार.. तिच्याच शब्दात सांगायचं तर .."तुम सिर्फ नाम लो.. मैने उन सबकी बात सुनी है.." कॅटेगरी.. तिचं लग्न मोडतं.. भारतात "लग्न" ही तशीही फार्फार डेंजर गोष्ट आहे..

मोदी खरच पंतप्रधान बनतील का !

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 25/03/2014 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मोदी हे देशाचे जवळ जवळ पंतप्रधान बनलेच आहेत अशा प्रकारे वातावरण तयार केले जात आहे. यात प्रवाहाबरोबर वाहणार्‍या मोदीसमर्थकांचा उन्माद विशेष लक्षात येण्याजोगा आहे... मोदींहूनही मोदी भक्त किंवा मोअर कॅथोलिक दॅन पोप अशी या ढोंगी समर्थकांची अवस्था झाली आहे असो तर प्रश्न असा आहे खरेच मोदी येतील का ? त्यासाठी भाजपा किती जागा मिळवील ? अकाली, सेना, पासवान अशांची मदत किती होइल... बेरीज कितीपर्यंत जाइल... प्रश्न अनेक आहेत. हे पाहता येणारे सरकार खिचडी सरकार असेल. ते २ २|| वर्षे टिकेल