मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मांडणी

देव पाहिलेला माणूस

ज्ञानोबाचे पैजार ·
किती भाग्यवंत मी, आज मला प्रत्यक्ष देव भेटला स्थितप्रज्ञासारखा उभा राहिलेला, रस्त्याच्या एका कडेला मी काही एकटाच नव्हतो, दिसला होता देव ज्याला माझ्या सारख्या बर्‍याच पामरांना, त्याने आज आशिर्वाद दिला काय देवा आज इकडे कुठे?

अरविंद बरोबर दीड तास!

संजय क्षीरसागर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
India Today Conclave 2014 मधे अत्यंत सधन, निष्पक्ष आणि विचारवंत लोकांसमवेत अरविंद केजरीवालांचा झालेला हा पूर्णपणे खुला संवाद तुमच्या-माझ्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतो. दीड तास लोकांचं अवधान एकचित्त आहे आणि कुणाही पूर्वग्रहरहित व्यक्तीचं तसं राहील यात शंका नाही. स्वतःवर झालेल्या टिकेला दिलेली उत्तरं. स्वतः दुसर्‍यावर केलेल्या आरोपांचं स्पष्टीकरण. झालेल्या चुकांची प्रांजळ कबुली.

नसतील शब्द जिवंत जर का

वैभवकुमारन ·
लेखनविषय:
(व्याकरणामध्ये चुका झाल्या असतील तर समजून घ्यावे) नसतील शब्द जिवंत जर का अबोल राहतील नातीगोती शब्दावाचून मुके अर्थ हे रडत बसतील हळव्या पोटी नसेल रुसवा नसेल फुगवा नसतील ओळी सुंदर ओठी शब्दावाचून ओठांच्या ह्या होणार नाहीत गाठी भेटी देवही तिकडे मलुन होतील भजनावाचून वीझतील वाती पुस्तक डोळे मीटुनी म्हणेल माझी नाही राहीली ख्याती बाळाला ही झोपवताना अंगाईविना सरतील रात्री कविवर्याच्या कल्पकतेला शब्दावाचून लेगेल कात्री

पहिल्या-वहिल्या रिसर्चचा अनुभव

आगाऊ म्हादया...... ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
ARM…(advanced research methods)…MPH(Masters in public health) studentsच्या आयुष्यातली एक महत्वपूर्ण पायरी...आरोग्यप्राप्ती साठी अनेकविध पद्धती चा वापर हा विषय घेऊन मार्गक्रमणा सुरु झाली...भरपूर डोकेफोड करून आम्ही data collection साठी सज्ज झालो...ward no.22(ताडीवाला रोड,लुम्बिनीनगर) आणि ward no.54(वडगाव धायरी) यांची जबाबदारी येऊन पडली....इतकी नाना प्रकारची माणसं भेटली की सगळे किस्से सांगत बसलो तर स्वतंत्र कार्यक्रम करावा लागेल...पण काही गोष्टी मात्र खरच मनावर कोरल्या गेल्या...लुम्बिनीनगर मध्ये ४ दिवस जात होतो वरील कामासाठी...तिथे रोज एका जागी बसून जेवण करायचो....एका दिवशी तिथे पाणीच नव

लिहाव म्हणतो काहीबाही ...

फुंटी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
काहीतरी लिहाव अस्माबंध डोळे मिटून उमटेल तस.आठवेल तो शब्द लिहावा .कोंबडी अंड .धागे जुळवावेत सूक्ष्म.खोट लिहतो तसं .भेंडी .मुला उचल ती पाती ,वाचणार कुणी नाही तरी...बर्फ एम् आर आय काढून मेंदूचा .लिहाव ...विचार सापडतील रिपोर्ट मध्ये......किडा मेंदूचा ...भुंगा ,उवा,लिखा,खाजाव्तोय भुवई डावी..लावावा मलम खाजेवर...शांत ..ताडी..छोटा हत्ती ..रेंज..कड घेईन जत्रेत नवीन....कबुतर फडफडल....भडवा फोनेवर बोलतोय .फोन कशाला पायजे ...ओरड तसाच....पोपडे निघालेली खोली...मळलेली चादर ...बिछाना ...जंगल ..फुटीर उमेदवाराला चोपला....रिक्षातील बाईच पोस्टर...चाकोरी.ग्लानी...डुलकी...टीप ...शाळा सुटली...टपकला शब्द मनात की उचल.

MH370 - फ्लाईट डीलेड..

गवि ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
व्हर्गा हा पावसाचा एक प्रकार आहे.. तो जमिनीवर पोचण्याआधीच वाफ होऊन नाहीसा होतो. व्हर्गासारखं हवेत नाहीसं झाल्याचा भास देणारं मलेशिया एअरलाईन्सचं बोईंग विमान. सगळेजण या विचित्र घटनेविषयी सर्वत्र वाचत आणि ऐकत आहेतच. तरीही काही इतर नाही तरी महत्वाच्या वाटणार्‍या गोष्टींची एक यादीच का होईना, पण बनवण्यासाठी टंकणं अनिवार झालं. या फ्लाईटसाठी वापरलेलं विमान म्हणजे बोईंग ७७७ - २०० ई आर. (777-200ER) ER म्हणजे एकस्टेंडेड रेंज. लांब प्रवासासाठी जास्ती अंतर एका दमात पार करता यावं म्हणून जास्त कपॅसिटीचे फ्युएल टँक्स बसवलेलं.

सिडनीस्थित मिपाकर आहेत का कुणी?

नानबा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
समस्त मिपाजनांना नानबाचा नमस्कार. शिक्षण आणि नोकरीनिमित्त मुंबई, इंदौर, पुणे असा प्रवास झाल्यानंतर नव्या संधीच्या शोधात गेल्या आठवड्यात सिडनी शहरी येऊन टेकलो. परदेशाचं अप्रूप, नव्याची नवलाई, स्वच्छता आणि टापटिपीचं कौतुक अशा टिपीकल विचारसरणीत सुरूवातीचे काही दिवस गेल्यानंतर आता हळूहळू रोजच्या वाटेवर रूळतोय. पण अभ्यास आणि कॉलेजनंतर गप्पाटप्पा मारण्यासाठी, सुट्ट्यांच्या दिवशी भेटीगाठी करण्यासाठी कोणी आपलं मिळालं तर त्याचा शोध घेतोय. आहे का कोणी मिपाकर सिडनीत? माझ्या माहितीत सध्या सिडनीत अंदाजे १.५ लाख मराठीजन वास्तव्याला आहेत. त्यांपैकी कोणी मिपाकर असल्यास मला संपर्क करा.

उभारी देणारे असे काही

पिंपातला उंदीर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
struggle शब्दाचा एक लोचा आहे . आपल्याकडे हा शब्द आर्टस ला admission घेणाऱ्या , नाटक -चित्रपट क्षेत्रात career करू इच्छिणार्यां आणि दहा ते पाच ची चाकोरी सोडून वेगळी वाट चोखाळणार्या लोकाना उद्देशुन वापरला जातो . मुळात मला अस वाटत की प्रत्येकजण हा त्याच्या / तिच्या पातळीवर एक struggle करतच असतो. म्हणजे बापाशी बिघडलेले संबंध पुर्ववत करण्यासाठी धडपडणारा पोरगा हा एक struggle च करत असतो . नौकरी मध्ये बॉस आपली ठासत आहे हे कळत असून पण नौकरी टिकवण्यासाठी धडपड करणारा मध्यमवर्गीय माणूस पण रोज संघर्ष करीतच असतो.