Skip to main content

मांडणी

मांडणी — विषयांची नेटकी मांडणी करणारे मराठी लेख. विचारांची सुसूत्र मांडणी आणि विश्लेषण येथे वाचा.

नाशिकचा उद्योग ०३ : याज्ञिकीने तारले !

लेखक सुधीर मुतालीक यांनी शनिवार, 22/04/2017 16:14 या दिवशी प्रकाशित केले.

औरंगजेबाच्या मृत्यू नंतर म्हणजे इस १७०७ नंतर काही वर्षांनी पेशवाईचा ऱ्हास होई पर्यंत म्हणजे इस १८१८ पर्यंत नाशकात संपूर्ण मराठयांची राजवट होती म्हणजे पेशवाई होती. पेशवाई अवतरणे हा सर्वार्थाने एक प्रचंड मोठा बदल होता. पेशव्यांचा एकूणच मराठी मुलुखाच्या औद्योगिक उत्कर्षासाठी कसून प्रयत्न सुरु होता असे दिसते. पण त्या प्रयत्नांची दिशा आजच्या संदर्भातच नव्हे पण तत्कालीन जागतिक संदर्भात सुद्धा जी होती ती तशी का होती असा प्रश्न पडतो. युरोपातला उद्योग ज्वालामुखी सारखा अगदी तोंडाशी येऊन खदखदत होता.

कल जो पी थी अजी ये तो उसका नशा है, तुम्हारी क़सम आज पी ही नही |२|

लेखक संजय क्षीरसागर यांनी मंगळवार, 18/04/2017 06:51 या दिवशी प्रकाशित केले.

या जगात फक्त दोनच नशा आहेत, एक इश्क आणि दुसरी शराब. या ग़जलची खासियत अशी की शायर नशेतही आहे आणि तिच्या प्रेमातही आहे..... आणि कहर म्हणजे ती समोर आहे ! त्याला आता समजत नाहीये की आपल्याला चढलेला कैफ इश्काचाये की दारूचा. प्रेयसी नाराज होईल म्हणून तो तिला म्हणतो, की ही जी नशा आहे ती कालच्या दारूची आहे..... पण खरी नशा जी आहे ती तुझ्या प्रेमाची आहे ! त्याला दारूशी प्रतारणा करता येत नाही आणि प्रेयसीलाही समजावयाचं आहे कारण त्याची नशा दुहेरी आहे. दारुचा अंमल तर बेहोश करुन गेलायं पण तिच्या सहवासाची खुमारी त्याहून कमाल आहे.

माझे बँकानुभव

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 11/04/2017 20:57 या दिवशी प्रकाशित केले.

माझी बँक माझे अनुभव

आज बँक ही गोष्ट खरं तर या देशात सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी बनलेली आहे. अगदी करोडपती पासून रोडपतीपर्यंत प्रत्येकाचे बँकेत खाते असतेच. बँकेतले व्यवहार टाळण्याकडे कल असणारा आणि रोखीचा आग्रह धरणाराही पूर्णपणे बँक व्यवस्थेपासून अलिप्त राहू शकत नाही. उलट आमचे कोणत्याही बँकेत खाते नाही असे म्हणणार्‍या मनुष्याचा सत्कार करावा इतकी ती विशेष बाब आहे.

असो.

हे फक्त माणसातच !

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 07/04/2017 00:48 या दिवशी प्रकाशित केले.

रात्री मासे आणणाऱ्या एकाकी माणसाला
बोकेमांजरे चहुबाजूने घेरतात.
माणूस पळू लागला कि,
त्याच्यावर झेप घेऊन त्याला बोचकारतात.
त्याच्या हातातील मासे क्षणार्धात लंपास होतात.
मासे मिळताच बोकेमांजरे
माणसाला तिथेच सोडून देतात.
हे सगळे किती विश्वासाहार्य, predictable आहे!

मासे मिळाल्यावर,
मासे तर फस्त करायचेच
पण माणसाची आतडी बाहेर येईपर्यंत
त्याला ओरबाडत, बोचकारत रहायचे,
मग, रात्रीच्या भयाण शांततेत फिस्कारत हिंडायचे .......
हे मात्र फक्त माणसातच !

- शिवकन्या.

अंडरटेकर: End of an Era

लेखक दाह यांनी बुधवार, 05/04/2017 16:39 या दिवशी प्रकाशित केले.

अंडरटेकर हा जगप्रसिद्ध WWE कुस्तीपटू परवा निवृत्त झाला आणि एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटलं. त्याने त्याच्या वाढत्या वयामुळे निवृत्त होण्याचा निर्णय घेतला असेल पण यामुळे आपलंही वय बरच वाढलंय की असं वाटून गेलं. अख्ख लहानपण झपाटलेलं या माणसाने.

डान्स बार २

लेखक वरुण मोहिते यांनी शनिवार, 01/04/2017 15:10 या दिवशी प्रकाशित केले.

६०% -४०% असा हिशोब असायचा .म्हणजे ६०% त्या मुलीला जिच्यावर उडवणार आणि उरलेले ४०% बार मालकाचे .त्या ६०% मधून पण मुलींना ५०% मिळायचे कारण बाकी वेटर ,छोटे मोठे काम करणारे लोक ह्यावर १०% निघून जायचे .म्हणजे मी ५० हजार उडवले कि मुलीकडे २५ हजार .तर काही लाख एकाच दिवशी उडवल्याने बाईसाहेब आम्हाला पटलेल्या . बाकी प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकून आम्ही आघाडी घेतलेली .ती जरा डिसेंट वागण्याने .कारण माझ्या हाताने पैसे उडव वैगरे प्रकार मी केला नाही मी वेटर ला सांगायचो . काही मोठी लोकं यायची नुसती उडवून जायची .

ट्वीटव्याख्यान या उपक्रमातील सहभागाचा अनुभव

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 29/03/2017 12:17 या दिवशी प्रकाशित केले.

३-६ फेब्रुवारी या काळात ट्विटरवरील @marathiword या हँडलने ट्विटर्संमेलन हा उपक्रम आयोजित केला होता. हे या उपक्रमाचं दुसरं वर्ष होतं. मराठी साहित्य संमेलनाच्या जोडीने आयोजित होणार्‍या या उपक्रमाला पहिल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही जबरदस्त प्रतिसाद मिळाला. सोशल मिडियावरील मराठीचं अस्तित्व भक्कमपणे समोर येणं, मराठी मंडळींना सोशल मिडियावर व्यक्त होण्यासाठीची एक विशेष संधी, अवसर मिळणं ही या उपक्रमाची निवडक उद्दिष्ट.

Ingmar Bergman चे चित्रपट भाग-१

लेखक मारवा यांनी रविवार, 19/03/2017 18:30 या दिवशी प्रकाशित केले.

तर झालेले असे आहे की, एलिजाबेथ व्होगलर ही एक नाटकात काम करणारी अभिनेत्री आहे. एका प्रयोगादरम्यान ती अचानकच संवाद थांबवुन गप्प झालेली आहे. काही मिनिटात पुन्हा भानावर येते, नाटक पुर्ण करते. त्या दिवसानंतर मात्र तीने पुर्णपणे मौन धरलेले आहे. तिच्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय चाचण्यांतुन याचे काहीही निदान झालेले नाही, ती पुर्णपणे नॉर्मल आहे पण एकदम गप्प ती गप्पच.( चाफ़ा बोलेना चाफ़ा चालेना सारखी अवस्था ) तिची डॉक्टर सल्ला देते की चेंज म्हणून तु काही दिवस माझ्या समुद्रकिनारी असलेल्या कॉटेज वर जाऊन राहुन ये. तिला सोबत म्हणून एका तरुण नर्स सिस्टर "अल्मा" ला तिच्या बरोबर पाठवते.

टपली अन टिचकी

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 19/03/2017 09:57 या दिवशी प्रकाशित केले.

साधारण १ वर्षापूर्वी(१७ मार्च२०१६) कुबेर गुर्जींनी मदर तेरेसांवर लेख लिहून एकाच दिवसात तो मागे घेण्याची किमया केली होती. आज परत त्यांनी एक लेख लिहिला आहे. लिंक बघा
https://www.loksatta.com/…/singer-nahid-afrin-is-not-afrai…/…
म्हणजे तसा लेख बरा आहे पण त्यातले हे वाक्य वाचून उगाच भ्या वाटतंय. बाबाला परत लेख मागे घेणे, दिलगिरी व्यक्त करणे अशी कसरत करावी लागते का काय कुणास ठावूक! पण तसे करावे लागले तरी तो त्यांचा सभ्यपणा बरका! लगेच असहिष्णुता, अभिव्यक्तिस्वतान्त्र्यावर घाला म्हणून बोंब मारायची नाय... तर वाक्य हे असे