लेखकप्राजुयांनी गुरुवार, 14/02/2008 08:06 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव वर प्रेम करणार्या सगळ्या सभासदांना आणि वाचकांना व्हॅलेंटाईन्स डे च्या हार्दिक शुभेच्छा...!
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे
प्रेमामध्ये चिंब नहावे
जीवन हेच प्रेम असावे
प्रेमासाठीच जगत रहावे...
- प्राजु
लेखकछोटा डॉनयांनी बुधवार, 13/02/2008 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
* कांद्यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल पण 'रजनीकांत' कांद्याच्या डोळ्यात पाणी आणू शकतो ....
* तुम्ही 'रिसायकल बिन ' मधल्या फाईल डिलिट करू शकत असाल पण तो खुद्द 'रिसायकल बिन' डिलीट करू शकतो ........
* तो तुम्हाला 'कॉर्डलेस फोन' च्या साह्याने गळफास देउ शकतो ........
* तो पीयानो वाजवून त्यामधून 'व्हायोलीन' ची सुरावट काढू शकतो .........
* तो खोलीत प्रवेश केल्यावर तेथील अंधार दूर करण्यासाठी तो लाईट चालु करत नाही , त्याऐवजी तो अंधार बंद करतो .......
* त्याला एकदा 'हार्ट-ऍटॅक' आला होता , तेव्हापासून त्याचे ह
लेखकसरपंचयांनी गुरुवार, 07/02/2008 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार,
मिसळपाव वर अधिकाधिक सोयी उपलब्ध करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. अनेकांच्या ते लक्षात आले असेलही. तरीही येथे नव्या सोयी बद्दल माहिती दिली जाईल. तसेच काही अडचणी असल्यास त्या सुद्धा येथे मांडल्यास हरकत नाही.
सदस्य व्यवस्थापनासाठी सदस्यं संरचनेत थोडा बदल केलेला आहे. त्यामुळे तुमच्या काही सोई ज्या तुम्ही आधी वापरत होतात आणि आता त्या दिसत नाहीत असा काहिसा प्रकार असेल तर येथे तसे नमुद करावे. सोई पुर्ववत करण्यात येतील.
लेखकछोटा डॉनयांनी बुधवार, 09/01/2008 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच जाहीर करतो की "आलेल्या फॉरवर्डेड मेलमधून साभार"
परवाच्या सिडनी टेस्ट नंतर आयसीसी ला सूचवलेले काही नवे नियम :१. यानंतर पुढे कुठल्याही ऑस्ट्रेलियाचया मॅचसाठी रिकी पाँटिंग [ क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान, हाडाचा व ज्याच्या प्रामाणिकपणावर कोणिही शंका घेऊ शकत नाही, असा क्रिकेटचा सितारा ] याला कायदेशिररित्या चौथा पंच म्हणून मान्यता देण्यात यावी. या नव्या कायद्याप्रमाणे चौथ्या अंपायरचा निर्णय अंतिम असेल. आधीच्या निर्णयामध्ये सुध्धा बदल करण्याचा त्याला अधिकार राहिल.
लेखकछोटा डॉनयांनी शुक्रवार, 28/12/2007 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
"तारे जमिन पें" पाहिला की नाही? मला माहित आहे तिकिटे मिळत नाहीत ,तरिपण एकदा थेटरवर चक्कर टाकाच आणि बाहेर पडणार्या प्रेक्षकांकडे निट पहा. नेहमीसारखा गोंधळ, दंगा करत बाहेर पडणारा प्रेक्षकवर्ग आज असा शांत का दिसतो आहे. काही जण एकदम स्तब्ध दिसत आहेत, काहिजण एकदम हरवल्यासारखे चालत आहेत, काहिंच्या चेहर्यावर विचारांचे काहूर माजले आहे. काय झाले नक्की थेटरात? कशामुळे सर्वजण असे वागत आहेत?
लेखकछोटा डॉनयांनी गुरुवार, 20/12/2007 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
या चित्रपटाच्या प्रदर्शानानंतर चित्रपटस्रुष्टी सुध्धा नव्या साचात बदलत आहे याची जाणीव होते. याच्या आधी "डरना मना है, सलामे इश्क" यासारख्या चित्रपटातून हे प्रयत्न झाले पण प्रत्येक कधेचा कही ना काही धागा शेवटी एकत्र आला. पण "दस कहानियाँ " हा एकदम वेगळा अनूभव आहे. दहा वेगवेगळ्या कथा, एकाचा दुसरीशी काहीही संमंध नाही हे वेगळेपण.
माझा नजरेने घेतलेला आस्वाद .......
*** मॅट्रोमोनी ****
एका कंपनीच्या अति कार्यमग्न असणार्या "वाईस प्रेसिडेंटच्या" पत्नीची ही कथा. एकटेपणाला कंटाळलेली ही पत्नी मग स्वताच वेगळा मार्ग शोधते. अर्थातच पतीला अंधारात ठेवून.
लेखकआजानुकर्णयांनी शुक्रवार, 14/12/2007 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
चौगुले साहेबांच्या विनोदांना उडवण्यावरून मोठी धुळवड झाली आणि वातावरण तंग झाले. अनेकांनी तर त्यांना मलमूत्र ही गलिच्छ वस्तू आहे हे समजू लागल्यापासून मलमूत्र विसर्जनच कायमचे बंद करून टाकले आहे की काय अशी शंकाही माझ्या मनाला चाटून गेली. कित्येकांनी व्यक्तिगत निरोपाद्वारे चौकशी करून चौगुल्यांचे तथाकथित ओंगळ लेखन तुम्हाला कसे आवडते हा प्रश्न केला? मी जबाबदारीने वागावे व उगाच ट ला ट जोडू नये अशीही आगंतुक सूचना झाली.
पण हा प्रसंग व काही दिवसांपूर्वी वाचलेले लेख यांच्या घुसळणीतूनच मनात काही विचार आले.
फार दिवसांपूर्वी वाचलेल्या एका कथेतील काही भाग आठवतो.
लेखकसहजयांनी शुक्रवार, 14/12/2007 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
कळतील कुणा यातना
होतात आमच्या मना
मुक्त स्वांतत्र्याचा बहाणा
का तर मिळावा रोज घालाया धिंगाणा
साहीत्य निर्मीतीस कोण पुसेना
पण नवसदस्य नावाच्या हुशार कल्पना
पंचायत-मालक कोण कूठे समजेना
कोणाच्या खांद्यावरून कोण साधे निशाणा
शत्रुस अनासाये मिळे कराया ठणाणा
लेखन-वाचनाचा आनंद मिळेना
साहित्यप्रेमाच्या मोठ्या वल्गना
माय मराठी काय म्हणेल
कोणास नाही याची तमा
लेखकछोटा डॉनयांनी सोमवार, 03/12/2007 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच जाहीर करतो, इंटरनेट वरून साभार...............
आज फक्त २ गोष्टी काळजी करण्यासारख्या आहेत ......
एक म्हणजे तुमची तब्येत चांगली आहे का तुम्ही आजारी आहेत ?
जर तुमची तब्येत ठणठणीत असेल तर मग काळजी कशाची करता, मस्त जीवनाचा आनंद घ्या .......
पण जर तुमची तब्येत बरी नाही, तुम्ही आजारी आहात तर तुम्हाला २ गोष्टींची काळजी करायला हवी.....
एक तर तुम्ही बरे व्हाल का आजारपणातच मरून जाल ?
जर तुम्ही बरे होणार असाल तर काळजी करण्यासारखे काही नाही.........
पण जर तुम्ही आजारपणातच मरण्याची शक्यता असल्यास तुम्हाला काळजी करण्यासारख्या २ गोष्टी आहेत.....
लेखकआजानुकर्णयांनी गुरुवार, 15/11/2007 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
ही कथा खरे तर नेहमीच्या स्टँडर्डप्रमाणे लघुकथा आहे. मात्र काही आधुनिक कथांशी तुलना करता तिला कादंबरी किंवा अतिदीर्घ कथा म्हणणे योग्य ठरेल.
शिवाय नारदमुनी वगळता सर्व कथापात्रे (म्हणजे उरलेले एक) काल्पनिक.
नेहमीप्रमाणे पगाराचा करमुक्त भाग असणारा लीव्ह ट्रॅव्हल अलाउंस क्लेम करण्यासाठी रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले (अन्यथा त्या पैशावर त्यांना कर भरावा लागला असता.) मंडळी करांविषयी नंतर कधीतरी. मिसळपाववरच!
पृथ्वीवर त्यांना एक गोंडस डुक्कर दिसले. काय त्याचे सौंदर्य वर्णावे महाराजा.