Skip to main content

मांडणी

नॉस्टॅल'जीया'

लेखक अज्ञात यांनी गुरुवार, 13/07/2017 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईत राहिलो नाही जास्तं... पण कूलर ऐंड कंपनी सारखी इराणी हॉटेलं... क्या बात है टाइप फीलिंग! उरल्येत फारच कमी म्हणा... अगदी बोटांवर मोजता येतील इतकीच्! त्यातली डुगडुगणारी जुनी लाकडी टेबलं/खुर्च्या... जुने पंखे, जुने आरसे, जीर्ण मेनुकार्ड, जुने सॉसचे लाल खंबे, गल्ल्यावर विराजमान जुना मालक... त्याचा जुना 'अती'ट्यूड... जुन्या टेबलवरच्या जुन्या काचेच्या खालचं जूनं कापड... जूना ऐशट्रे, जूने जुळे सॉल्टपेपर, जुन्या मधुबाला पासून जुन्या ऐर्नोल्डचे रैंडम जुने पोस्टर्स, जूना फिडोडीडो नी जुन्या चार्ली चैप्लिनचे जुने स्टीकर्स, ताज्या अंड्यांच्या जुन्या क्रेटची इमारत, बाजूला फ्रेश स्लाइस-

पीएमटी आणि तुकाराम मुंढे साहेब

लेखक आशु जोग यांनी सोमवार, 03/07/2017 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
बी जे मेडिकल कॉलेजला प्रोफेसर होता तेव्हापासून आम्ही श्रीकरला पाहतो आहोत. त्याच्या त्या लाल एम ५० वरून तो येजा करीत असे. पुढे तो आयएएस झाला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा तो आयुक्त होता तेव्हा नियमावर बोट ठेऊन काम करणारा अधिकारी म्हणून त्याची महाराष्ट्रभर ख्याती होती. नियमाबाहेर जाऊन कोणी काम करत असेल तर त्यावर श्रीकरची कारवाई ठरलेली. यामुळे त्यांना निनावी पत्रे आणि धमक्या यायला सुरुवात झाली.

(why is there nothing rather than something ???????)

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 30/06/2017 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

why is there something rather than nothing???????

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी बुधवार, 28/06/2017 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
देव,धर्म,मृत्युनंतरचे जीवन,अमानवी शक्ती व अनेक गोष्टी मानवाला आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही लहानपणी या गोष्टींवर विश्वास ठेवायचो,त्यांच्यात असलेल्या गूढत्वाच्या वलयात स्वतःला हरवून जाण्यात एक वेगळीच झिंग असते.बहुतांश लोक या नशेतून बाहेर येत नाहीत.

आजोळच्या आठवणींची सोनेरी पानं

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 26/06/2017 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
सचिन काळे यांचा 'आठवणींच्या हिंदोळ्यावर' हा लेख आणि पुरवणी लेख वाचल्यानंतर नॉस्टॅल्जिक झाले. गिरगावातल्या आजोळच्या आठवणी मनात जाग्या झाल्या. त्या तुमच्याशी शेअर करते आहे. आजोळच्या आठवणींची सोनेरी पानं आपल्या सर्वांच्याच लहानपणच्या आजोळच्या अशा काही ना काही आठवणी असतात. मामाच्या गावाला झुकझुक गाडीतून जातानाच गाण तर आपण सर्वानीच लहानपणी अनेकदा म्हंटल असेल. माझ्या बाबतीत सांगायचं तर माझं आजोळ गिरगावातल आणि माझा जन्म उपनगरातला. त्यामुळे आम्ही खरच कायमच लोकलने चर्नीरोडला उतरून मग चालत  जायचो सिक्का नगरला. आजोळी  माझी आज्जी, आजोबा, दोन मामा आणि एक मामी असे सगळे राहायचे.

'हमेशा तुमको चहा'

लेखक सरनौबत यांनी शनिवार, 24/06/2017 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
'हमेशा तुमको चहा' रविवार दुपार. जेवण करून वामकुक्षी साठी आदर्श वेळ. अचानक आपल्या पत्रिकेतील ग्रह फिरतात आणि ओळखीच्या कोणाचं तरी पुढच्या आठवड्यात 'कार्य निघतं'. 'आहेर म्हणून आपण पाकिटात पैसे घालून देऊ' असं ओठांवर आलेलं वाक्य पूर्वानुभवामुळे गिळावं लागतं. "फक्त मित्रांबरोबर बाहेर हिंडायला आवडतं, देण्याघेण्याचे व्यवहार अजिबात कळत नाहीत" वगैरे वाक्यं आपलीच वाट बघत असतात. लक्ष्मी रोड वर दुपारी (त्यातल्या त्यात) गर्दी कमी म्हणून दुपारी २ ला आपण अर्धांगिनी बरोबर 'आहेर म्हणून बाहेर' पडतो. पहिल्या २-३ दुकानात काहीच पसंत पडत नाही.

उतारवय ही संकल्पना हळुहळू बाद होतेय

लेखक अजय भागवत यांनी रविवार, 11/06/2017 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
हया शतक़ातील सर्वात मोठी क्रांति जर कोणती असेल तर ती, “वयोमानातील वाढ” ही मानावी लागेल. आपण आपल्या आजी-आजोबांच्या काळातील नागरिकांपेक्षा २५-३० वर्षे अधिक जगत आहोत. ही वाढीव वर्षे खूप मोठा कालावधी आहे - अगदी एक आख्खे दुसरे आयुष्य वाढल्यासारखेच आहे. परंतू, आपण अजुनही आयुष्याकडे पूर्वीच्याच नजरेने पाहतोय का? म्हणजे असं की, आयुष्य म्हणजे, जन्म, मग तारुण्यातील आपल्या जीवनाची चढती कमान आणि मग पन्नाशीनंतर शारीरिक-मानसिक उतार...

कहा गये वो लोग?--विलास

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शुक्रवार, 09/06/2017 23:07 या दिवशी प्रकाशित केले.
babukaka aajibai natha mangya sanjya ranshur आयला विलास तुझ्याबद्दल लिहिण्यासाठी आणि ते पण या मालिकेत लिहायला मी कधी मिपावर येईन असे वाटलेच नव्हते रे ? म्हणजे कधी तसा विचारच मनात आला नाही. कायतरीच भयानक वाटतंय बघ.

'संगीतज्ञानी इळैयाराजा'

लेखक उपयोजक यांनी शुक्रवार, 02/06/2017 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
ते ट्रिनीटी कॉलेज ऑफ म्युझिक, लंडन चे सुवर्ण पदक विजेते आहेत. BBC ने घेतलेल्या सर्वेक्षणात ते भारतातील सर्वोत्कृष्ट संगीतकार ठरले.त्यांच्या 'दलपति' या सिनेमातलं 'रक्कम्मा कय्य थट्टू' हे जगातलं ૪ थ्या क्रमांकाचं सार्वकालीन पसंती दिलेलं गीत! ६००० पेक्षा अधिक गाणी त्यांनी संगीतबध्द केली.१००० पेक्षा अधिक सिनेमांना त्यांनी संगीत दिलं.एस.जानकी,के.जे.येसुदास,चित्रा,एस पी बालसुब्रह्मण्यम् हे त्यांचे आवडते गायक.यांच्यासोबत सर्वाधिक गाणी त्यांनी संगीतबध्द केली.सर्वाधिक गाणी तमिळ भाषेत! तमिळ लोकसंगीत यांनी जागतिक पातळीवर नेलं.पारंपारीक तमिळ वाद्यांबरोबरच इलेक्ट्रॉनिक वाद्येही फार सुंदर पध्दती

एका गारुड्याची गोष्ट १४: बिनविषारी साप ! (समाप्त !)

लेखक जॅक डनियल्स यांनी बुधवार, 31/05/2017 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक वर्ष मध्ये निघून गेली, डिग्री झालीं, स्थलांतर झाले, नोकरी लागली आणि मग लिहिण्यासाठी हात सळसळू लागले. इ.स.पू. मध्ये मी बिनविषारी सापांच्या लेखाची सुरवात धामणी वरील लेखाने केली होती, आता या लेखात इतर बिनविषारी सापांबद्दल बोलतो. साधारणतः लोकासाठी कुठला पण साप "विषारीच" असतो आणि तो मारलाच पाहिजे असे विचार असतात. खरे म्हणजे जवळपास ८०% साप बिनविषारी आहेत. अगदी आपल्या आख्या (पुणे) शहरी आयुष्यात सारसबाग गणपतीच्या आरती मध्ये इखादी मुलगी वळून आपल्या कडे बघेल किंवा कुलकर्णी पंपावर पेट्रोलच्या रांगेत पेठीय मुलगी वळून हसेल पण आख्या आयुष्यात एक विषारी साप दिसणार नाही.