Skip to main content

मांडणी

प्रिय घरास

लेखक शिव कन्या यांनी सोमवार, 18/09/2017 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय घरास, नाही, तुझी आठवण येत नाही. बाई आहे मी. जाईन तिथे चूल मांडीन. रांधेन. खाऊ घालीन. चार फुले लावीन. शेज सजवीन. संग करीन. पोरं जन्माला घालीन. संसार थाटीन. वाढवीन. इथेही नवे घर करीनच की. नव्हे नव्हे केलेच आहे. नाही, तुझी आठवण येत नाही. इथे मी पायी कुठे जात नाही. गाडीत जाते. पायी चालले असते तर थबकले असते. वळून पाहिले असते. मग एखादे घर तुझ्यासारखे दिसले असते. मग खिडकीतून आत शिरले असते. पडद्यामागे लपून बसले असते. नाही नाही ते आठवले असते. उगीच तो दिवस रडून घालवला असता. म्हणून मी इथे गाडीतून गालिच्यावर, गालिच्यावरून गाडीत एवढेच पाय खाली ठेवते.

पत्र...

लेखक प. शी. यांनी रविवार, 17/09/2017 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय, तु विचारत होतास, कि corporate life कशी आहे. मुळात नाटकात आणि यात जास्त काही फरक नाही. फरक फक्त इतकाच, कि नाटकात तु होतास आणि इथे manager आहे. नाटकाचे प्रयोग असायचे, इथे projects असतात. इथे ही उशिर झाला कि बोलणी बसतात, बर का... उलट ११ चे १२ झाले कि तु फार शिव्या घालायचास... इथ मात्र manager फक्त "Good Morning" असा टोमणा मारतो. इथली लोक यास sarcasm म्हणतात... इथे हि नाटकाप्रमाणे night shifts असतात... फरक फक्त इतकाच, नाटकात सोबती ला चहा असायची इथ मात्र coffee असते. पण इथे night shift ला झोप येते रे... कदाचीत इथल्या coffee त अापल्या चहा सारखी किक् नाही...

समांतर विश्व

लेखक ओरायन यांनी शनिवार, 16/09/2017 00:16 या दिवशी प्रकाशित केले.
समांतर विश्व : ऐक तर्क ( Parallel Universe) आपल्याला जवळपास सर्वांनी मानलेला वा गृहित धरलेला ' महास्फोटातून विश्वनिर्मिती ' ( Big bang theory)हा सिद्धांत माहिती आहे. ऐका बिंदुवत जागेतून महा प्रचंड स्फोट होऊन , प्रचंड उर्जा निर्माण झाली व त्याचबरोबर विश्व( Universe) निर्माण झाले. म्हणजेच अवकाश (Space) व काळ ( Time ) हे आस्तित्वात आले. ही क्रिया संपली का हो ? नाही..विश्व ( Universe) अजूनही वृद्धिंगत होत आहे. Universe is expanding.म्हणजे नविन अवकाश व वेळ निर्मिती चालुच आहे..त्याचा वेग संशोधकांना माहित झाला असून तो Hubble Constant मध्ये मोजतात.

संघर्ष : सुरुवात.

लेखक दिपक लोखंडे यांनी मंगळवार, 12/09/2017 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
०५ ऑगस्ट सकाळी : ७ वा. त्या दिवशी राधा खूप सुंदर दिसत होती तिचा तो निरागस चेहरा अबोला असूनही खूप काही बोलून जात होता. राधा अंघोळ करून केस झटकावत बाहेर आली पहाटेची तीव्र किरणे तिच्या चेऱ्यावर पडताच तिने डोळे बंद केले, तसा आनंद तिच्या समोर जाऊन थांबला. अचानक समोर आल्याने राधा थोडी दचकली (तशी राधा खूप धाडशी व जिद्दी होती प्रेमळ स्वभाव असल्याने तिने तिच्या ओवातिभोवती असणाऱ्या सर्व लोकांची मने जिंकली होती. आनंद ही त्यातलाच एक. इंजिनीयरिंग कॉलेज मधली ओळख..

निरभ्र आकाशातील ' मृग नक्षत्र'

लेखक ओरायन यांनी मंगळवार, 12/09/2017 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
'ओरायन ' म्हणजे खगोलीय भाषेत काय ? आपणांस माहित असेल कि जागतिक मान्यतेनुसार एकूण ८८ तारकासमूह (Constellation)आहेत. जगात वेगवगेळ्या पुरातन संस्कृतीमध्ये, (जसे ग्रीक, प्राचीन सुमेरियन, चिनी, भारतीय) अनेक तारकांचा बनलेल्या समूहाला वेगवेगळी नावे आहेत. तसेच त्यांची संख्या वेगवेगळी आहे. शिवाय तारकासमूहांतील ताऱ्यांची संख्या पण कमीअधिक आहे. आपल्याकडे नाही कां २७ नक्षत्रे आहेत ? आता सर्वाना मान्य होतील व जे सर्वसमावेशक असतील, असे तारकासमूह करण्याची वेळ आली होती. कारण सोईसाठी व सहजतेसाठी जगभर खगोलीय भाषा एकच हवी.

अत्तर

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 12/09/2017 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
कपडे कितीही मळले, जुने झाले, रंग उडून गेला वीण उसवून गेली घड्या विस्कटून गेल्या तरी कधीतरी लावलेले मायेचे भरजरी अत्तर मंदपणे दरवळत राहते! . . . माणसं अशी अत्तर असती तर..! शिवकन्या

पाटलाची मुलगी.. भाग ०२ (शेवट).

लेखक दिपक लोखंडे यांनी शनिवार, 09/09/2017 08:53 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ०१ पासून पुढे..... ( ठरवल्या प्रमाणे तिघेही ९:०५ ला तिथं हजर झाले.. संकेत मस्त इस्त्री करून फॉर्मल कपड्यात आला होता.. अनाहून पसरलेली शांतता मोडत मयुरी म्हणाली ) मयुरी : आता? राघव : निघुया? संकेत : हो. मयुरी : काय हो?. राघव, काय प्लॅन आहे? राघव : प्लॅन काहीच नाहीये, जे होईल ते बघून घेऊ. मयुरी : म्हणजे? राघव : अग "डर के आगे जीत है" मयुरी : पण जीत तर या सुकड्याची ना, आपलं काय? राघव : आपल्या मैत्रीची जीत. संकेत : नीघुया का? मयुरी : बघ या सुकड्याला किती घाई आहे जायची! राघव : ए.. चला बस आली निघुया आता. ( सकाळचे ९:५५ झाले होते. तिघही पाटलाच्या वाड्यावर पोहोचले ) मयुरी : आलो तर खरं.

पाटलाची मुलगी.. – भाग १

लेखक दिपक लोखंडे यांनी शुक्रवार, 08/09/2017 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
संकेत : मयुरी... या राघवचं तोंड झाक जरा.. मयुरी : ए तु गप्प बस ना रे राघव... राघव : मी कशाला गप्प बसू?.. या थेरड्याला सांग ना त्याच तोंड झाकायला... संकेत : ए थेरडा कोणाला म्हणतोे रे.. राघव : तुला म्हणतोय तुला.. मयुरी : अरे तुम्ही दोघंही शांत होता का जरा.. संकेत.. सांग.. काय प्रॉब्लेम आहे तुझा.. राघव : हं.. आता याचा पण प्रॉब्लेम ऐकावा लागेल.. परमेश्वरा... मयुरी : राघव चुप्प.. तु बोल संकेत.. संकेत : मी काय म्हणतो राघव : काय म्हणतोस तु?? संकेत : हेच्या आयलां... मयुरी : संक्या शांत हो..

भेट पावसाची..

लेखक दिपक लोखंडे यांनी शुक्रवार, 08/09/2017 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
भेट तुझी माझी पावसाची आठवण आहे बावऱ्या मनाची.. तु सजली आहेस लावून गजरा सह मोहक सुगंध देई मोगरा भुलून गेलो आहे सजनी प्रीत रंग पसरला गगणी ऐकुनी हे बोल तुझे वाटे मज वाजे बासुरी.. बघुनिया रूप तुझे घाव झाला हृदयावरी चंद्र ही निरखून पाही भेट तुझी माझी पावसाची.. – दिपक.
काव्यरस